ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.979

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९७९

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९७९

उजव्या आंगें भ्रतार व्याली । डाव्या आंगें कळवळ पाळी ॥१॥ कवण जाणे कवण हे खूण । कवण जाणे काय त्याला भूषण ॥२॥ दोहीं आंगींचे लेणे आपण ल्याली । ज्ञानदेव म्हणे विठो आमुची माउली ॥३॥

अर्थ:-
मायेने एका अंगाने म्हणजे शुद्ध सत्त्व प्रधानतेने ईश्वरास उत्पन्न करून आपण त्याचे आधीन राहिली म्हणून तो ईश्वर मायेचा भ्रतार झाला. व डाव्या अंगे म्हणजे दुसरे बाजूने म्हणजे मलिनसत्त्व प्रधानतेने जीव जगतादि उत्पन्न करून त्याची ‘कळवळ पाळी, म्हणजे रक्षण करतो. मूळ परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी ही माया ईश्वरभाव, जीव जगतादि उत्पन्न करून, हे त्याच्या भूषणाचे कारण कोण जाणे? माउली म्हणतात पांडुरंगराय आमची जी माऊली तिने मायेच्या दोन्ही अंगाने निर्माण केलेले अलंकार आपले अंगावर धारण केले. म्हणजे दोघांनाही अधिष्ठान श्रीविठ्ठलच आहेत. आणि तीच आमची खरी माऊली

आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading