ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.980

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९८०

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९८०

देउळा आधी कळसु वाईला । पाहोनि गेलों आपुले दृष्टी ॥१॥ विपरीत गे माये देखियेलें । कांसवीचे दूध दोहियेलें ॥२॥ आधीं पुत्र पाठी वांझ व्याली । लेणे लेऊनि ठेलें साडेपंधरे ॥३॥ बापरखुमादेविवरू विपरीत सुपरीत जाणे । संत तिये खुणे संतोषतील ॥४॥


अर्थ:-
माऊली पदार्थाभाविनी जी अवस्था आहे. त्या अवस्थेत गेलेल्या पुरुषाच्या भूमिकेचे वर्णन करतात. पदार्थाभाविनी अवस्थेत स्वदृष्टिने पाहिले तर देउळा आधी म्हणजे देहादि देउळाची प्रतीति न येता,परमात्मरूपी कळसाची प्रतीति असते.परंतु हे लोकदृष्टिने विपरीतच झालेले पाहिले. कारण कासवीला दूध नसून दोहन केल्याप्रमाणे या स्थितीत देहादिप्रतीति नसून केवळ चैतन्य प्रतीति असते. कारण सत्त्वांपत्तिमध्ये बोधपुत्र झाला व अधिकार बलाने पदार्थाभाविनीत देहादि अनात्मपदार्थाची प्रतिती येत नाही. ज्या प्रमाणे वांझ प्रसवणे शक्य नाही तद्वत् पदार्थाभाविनीत देहादि अनात्मपदार्थ प्रतिती असते असे कोणी म्हणेल तर ते त्याचे म्हणणे वांझ व्यालीप्रमाणे आहे कारण त्या स्थितीत त्याने (परमात्मरूपी शुद्ध सोन्याचा अलंकार) धारण केलेला आहेत. हे लोकदृष्टिने विपरीत दिसले तरी माझे पिता व रखुमादेवीचे पति जे श्रीविठ्ठल तेच जाणतात आणि संत महात्में या खुणांनी संतोष पावतात. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading