ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 96

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९६

तिहीं त्रिगुणी ओतिले । त्रिपुटिसी गोंविले । आणूनि बांधिले । चर्मदेही ॥ न सुटता शिणता हे । भवति वास पाहे । प्रपंच मोहता हे । काय करूं ॥ कृष्णनाम मंत्रु सुटे । विषय प्रपंचु तुटे । मोहनमुद्रा निघोटे । वैकुंठ रया ॥ सावधपणे विरूळा । जाणें तेथीची कळा । विज्ञानपणे सोहळा । निमथा गातू ॥ ज्ञानदेव सांगतु । हरिपंथे मुक्तिमातु । एकतत्व सांगातु जनीवनी ॥

अर्थ:-

सत्वरजतम ह्या गुणांनी, ज्ञानज्ञाताज्ञेय ह्या त्रिपुटीना एकत्र बांधुन चर्मरुपी शरिरात गोवले.ह्यातुन सुटण्यासाठी फुकटचा शिणतो, इकडेतिकडे पाहत वाट पाहतो तसातसा तो त्या मोहरुप संसारात गुंतत जातो त्याला मी काय करु.कृष्णनाम मंत्राच्या जपाने प्रपंच सुटतो विषय दुर जातात व वैकुंठ प्राप्त होते. हे करणारे सावध होऊन नामजपाची कला आत्मसात करतात असे विरळच आहेत त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त होऊन मोक्षाचे सोहळे भोगता येतात. सर्व जनांत वनांत मी ह्या एकतत्वाने घेतलेल्या नाममंत्राने मुक्ती प्राप्त होते असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading