ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 95

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९५

सर्वव्यापक सर्व देही आहे । परी प्राणीयांसी सोय न कळे त्याची ॥ परमार्थ तो कडु विषय तो गोडु । तया अवघडु संसार ॥ नामाचे साधन जिव्हे लावी बाण । तया प्रेमें वैकुंठ जवळी असे ॥ सुलभ आणि सोपारे केलेंसे दातारे । आम्हीं एकसरे उच्चरिले ॥ ज्ञानियांसे ज्ञान ज्ञानदेवी ध्यान । कलिमल छेदन नाम एक ॥

अर्थ:-

 तो सर्व देहांत व सर्व देहांना व्यापणारा आहे पण प्राणी हे जाणत नाहीत. ज्याला परमार्थ कडु व विषय गोड वाटतात त्याला संसार अवघड आहे. जिव्हारुपी धनुष्याला नामरुपी बाण लावला की तो सतत जवळ राहतो. धारणाकरुन धिटाईने नामस्मरण करायला लागला की त्याच्या जवळ प्रेमवैकुंठ येते.आम्ही सतत त्याचा नामघोष केल्याने त्या दाताराने सर्व काही सुलभ व सोपे करुन टाकले आहे. ज्ञान्यांचे ज्ञान जे ज्ञानेश्वरांचे ध्यान आहे त्याच्या उच्चारणामुळे कलीच्या मळदोषाचे छेदन होते असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading