ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.954

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९५४

जायाची घोंगडी नव्हती निज । म्हणउनी तुज विनवितसे ॥१॥ एक पाहतां दुसरें गेलें । तिसरें झालें नेणों काय ॥२॥ चौथें घोंगडें तेंही नाहीं । रखुमादेविवरा विठ्ठला पायीं ॥३॥

अर्थ:-
जाणारे नाशिवंत देहादि अनात्मपदार्थ हे निज म्हणजे स्वकीय आत्मस्वरूप नव्हेत.म्हणून स्वकीय आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता तुझी विनवणी करीत आहे. स्थूल देहाचा विचार करीत असता तो तर गेलाच पण त्याचेबरोबर दुसरे लिंगशरीरही गेले. तिसरे जे कारणशरीर म्हणजे स्वस्वरूपाचे अज्ञान ते कुणीकडे गेले. याचा पत्ताही नाही. चौथे महाकारण शरीर तेही नाही. या सर्वांचा लय रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांचे चरणी झाला. असे माऊली सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading