👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके पाळणा अभंग ८७३
अठरा दिगांतीहुनी पाळणा आणिला । तेथें एक निर्गुण बाळ पहुडला ॥१॥ बाळा हे नाही बाळा हे नाहीं । अंगुष्ठ पिउनी घेई निरालंबी ॥२॥ निरालंबी सादू आळवी ब्रह्मीं । तेथें एकु बाळ बोभाये निरंजनीं ॥३॥ बापरखुमादेविवरू आदि अंतीं । त्याहुनी परती मज गति केली ॥४॥
अर्थ:-
अठरा दिगंती म्हणजे, अठरा पुराणाचा शोध करून एक पाळणा आणला. आणि त्यांत निर्गुण बाळ परमात्मा निजले. बाळाजवळ कोणी एक नाही. ‘अंगुष्टमात्र’ म्हणजे स्वरूपानंद घेऊन निरालंब स्थितित निजले आहे. ज्या निरालंब स्थितीत बाळक निजले आहे त्याचे चिंतन करून त्याला आळव. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या स्वरूपांशिवाय आरंभी किंवा अंती मला दुसरी गती नाही. असे माऊली सांगतात.
