ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 82

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ८२

जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरि‌उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥ नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

अर्थ:-

 हा हुशार हा अनाडी हे भगवंत जाणत नाही.तो फक्त कोण सतत नामजप करते तेच पाहतो.व त्याला मोक्ष देतो.ज्याने नारायण हरि ही नामे जपली त्याला कळीकाळाची फिकिर करण्याचे कारण नाही. जो सतत नाम घेतो तो प्रमाणभूत होतो. ज्या हरिचे वर्णन वेदांना करता आले नाही ते जीवजंतुना कसे समजणार? सतत नारायण नामाचा पाठ केला तर सर्वत्र वैकुंठ निर्माण झाले आहे असे दिसते. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading