👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३०
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥ जाति वित्त गोत कुलशील मात । भजकां त्वरीत भावयुक्त ॥ ॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥
अर्थ:-
जप तप वेदोक्त कर्मेे सर्व नित्यनेम हे धर्माधिष्टित असुन त्यामुळे सर्वांमध्ये रामनामाचा भाव शुध्द रुपाने मनात बसतो. हा भाव सतत मनात ठेऊन संदेह टाकुन सतत रामकृष्ण नामाचा टाहो फुटावा.जाती, संपत्ती, कुळ ह्याचा आभिमान न धरता त्वरित भावनायुक्त मनाने हरिनाम घ्यावे. माझ्या मनात मी सतत हरिनाम जपल्याने मी वैकुंठालाच माझे घर बनवले असे माऊली सांगतात.
