👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८८
अकल्पित द्रुम आजी संयोगें घडलें । अपार आपणातें विसरलें गे माय ॥१॥ महुरलें महुरलें मन माझें मोहरले । भक्तिफळासी कैसें आलें गे माय ॥२॥ देठीहुनी सुटले पुढती कैसे जीवनासी आलें । बापरखुमादेविवर विठ्ठले ऐसें केलें गे माये ॥३॥
अर्थ:-
कल्पनातीत वृक्ष जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याशी आत्मस्वरूपाचा ऐक्यरूप संयोग आज घडल्यामुळे आत्मस्वरूपाचे अपारपण मी विसरून गेले. अशा आत्मस्वरूपाविषयी माझे मन त्रिवार खचित आनंदी झाले हेच भक्तीचे फल माझे पदरांत कसे पडले. देवाहून म्हणजे परमात्मस्वरूपापासून ज्ञानाने भ्रमिष्ठ होऊन संसारात पडलेला जीव, पुन्हां माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त
यानी परमात्मस्वरूप कस केले. असे माऊली सांगतात.
