ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.787

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८७

पांचासहित लयातीत जालिये वो । प्रेम भक्ति अनुसरलें काळ्या रूपासी ॥१॥ ठायींचाची काळा अनादि बहु काळा । म्हणोनी वेदा चाळा लाविला गे माये ॥२॥ बापरखुमादेविवरें जन्मावेगळे केलें । म्हणोनी भाज जालें बाईये वो ॥३॥

अर्थ:-

माझ्या शरीराला उपादानभूत असलेली पंचभूते किंवा माझ्या स्वरूपाला आच्छादन करणारे पंचकोश यांचा विचारदृष्टीने सर्व भूतांचे उपादान कारण जे अज्ञान त्यात लय होतो. त्या अज्ञानाच्या पलिकडे असलेला जो श्रीकृष्ण परमात्मा तद्रुप मी झाले. पूर्वसंस्काराने त्या काळ्याच्या ठिकाणी असलेली प्रेम भक्ति त्या प्रेमभक्तिने पुन्हा त्या काळ्यारूपास मी अनुसरले. हा ठायीचाचि अनादि कालाचा व स्वरूपेकरून काळा म्हणजे नामरूपातीत शुद्ध असल्यामुळे समजण्यास फार कठीण आहे. फार काय सांगावे सर्वज्ञ वेदालाही त्याने आपले स्वरूप समजावून घेण्याचा चाळा लाविला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या भुलीमुळे त्याने मला जन्मविरहित केले मी त्यांची बायको झाले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading