ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.771

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७१

चैतन्य चोरूनि नेलें चित्त माझें सवें गेलें । पाहे तंव तन्मय जालें गे माये ॥१॥ देवें नवल केलें मन माझें मोहिलें । विसरू तो आठऊ जाला गे माये ॥२॥ यासी जाणावयालागी अनुउते पाहे । तंव त्रिभुवन तन्मय जालें गे माये ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलरायें । माझे सबाह्याभ्यंतर व्यापिलें गे माये ॥४॥

अर्थ:-

 परबह्म श्रीकृष्णाने माझे जीवचैतन्य चोरून नेले त्यामुळे चित्त सहज त्याच्याबरोबर जाऊन. त्याच्याकडे पाहाते तोच माझे चित्त तद्रुप होत गेले.काय देवाने नवल केले? माझे मन अगदी मोहून टाकले. आजपर्यंत परमात्म स्वरूपाविषयी विसर होता. तोच ज्ञान झाले. मला दुसरेपणाने जाणावयास गेले तो याने त्रिभुवन आत्मरूप करून टाकले त्या माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठलानी माझे सबाह्यअंतर व्यापून टाकले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading