ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.700

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ७००

कवतुक पहावया निरंजना गेलीये । तंव निराकार जालें बाईयो वो ॥१॥ अकरासहित पांच पाची मावळलीं । आदि अंती उदयो जाली तेजाकारें ॥२॥ रखुमादेविवरु परतोनी देखें । तोही पारूषे तिये ठायीं गे माये ॥३॥

अर्थ:-

निरंजना म्हणजे परमात्मा त्याचे कवतुक पाहण्यांकरीतां त्याच्याकडे गेले. तो मी स्वतःच निराकार होऊन बसले. दहा इंद्रिये व मन ज्या पंचमहाभूतांची झाली ती पाच भूते आपल्या स्वरूपांत मावळली त्या पंचमहाभूतांच्या उत्पत्तीच्या पूर्वी असणारी जी ब्रह्मज्योति तिचा अंतःकरणांत ज्ञानरूपाने उदय झाला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्याकडे मी परतून पाहु लागले. तो ते ही माझ्या स्वरूपांमध्ये लय पावले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading