👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९९
चक्राकार चक्ररूप चक्रधरू म्हणवी । पाहतां अंतरी न दिसे कांहीं ॥१॥ पाहतां पाहतां मी पर ठाया गेलें । तेथें एक देखिलें महद्भूत ॥२॥ रखुमादेविवरू महद्भूतावेगळा । त्याहूनि तो मनी मानला गे माय ॥३॥
अर्थ:-
चक्राकार, चक्ररुप, चक्रधरु ही भगवंतांची नावे आहेत अशा नावांचा परमात्मा मी माझ्या अंतःकरणांत पाहू गेले तेव्हा तो दिसला नाही. शेवटी विचार करता करता पलीकडे गेले. तो विचाराच्या पलीकडे महद्भूत पाहिले. त्या महद्भूताहूनही माझे पिता व रखुमादेवीचे पती जे विठ्ठल ते वेगळा आहेत. असा त्यांच्याहून पलिकडे अधिक असणारा जो श्रीविठ्ठल तो माझ्या मनाला चांगला पटला. असे माऊली सांगतात.
