ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.696

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९६

मन वाचा बंदु निर्वाणी घांतले । निर्माण होतें माझे ठायीं माल्हाथिलें ॥१॥ चंचळ मन ब्रह्मीं निश्चळ जालें । अवघेचिं निमाले ब्रह्मार्पणीं ॥२॥ रखुमादेविवरू विठ्ठलु उघडा । व्योम पांघुरे फुडां देखोनी धालें ॥३॥

अर्थ:-

माझ्या ठिकाणी असलेले मन व वाणी यांना मी बंधनांत टाकून मोक्षमार्गाला लावले. तेंव्हाच तें चंचळ मन माझे स्वरूपं जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी निश्चळ झाले. त्या ब्रह्मापर्णाच्या योगाने मन मावळून गेले असे नाही तर सर्व जगत मावळले. मग रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल जे आकाशाचेही पांघरूण असलेले, त्यामना मी उघडा स्वच्छ पाहून तृप्त झालो असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading