ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.695

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९५

अद्वैत येणे अद्वैतपणे सांडिलें । थितें होतें तें माझें लया पैं गेले ॥१॥ नाही तेंचि पाहावया वायांवीण गेलें । तंव पाहाणेंचि जालें बाईये वो ॥२॥ बापरखुमादेविवरू जुनाट जुनघडा । तोहि म्यां सांडिला अरूपसंगें ॥३॥

अर्थ:-

येणे म्हणजे या अद्वैत परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी अद्वैतपणाही राहिला नाही त्यामुळे माझी जी देहात्मस्थिती होती ती लयाला गेली. मन, बुद्ध्यादिकांना जें विषय नाही. तें परमात्मतत्त्व सहज पहावयास गेले. तो ज्याला पहावयास गेले तें परमात्मतत्त्वच मी होऊन गेलें. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, अनादि जुन्यातला जुना असा जो परमात्मा त्याचाही मी संबंध टाकून दिला. याचा अर्थ देवाच्या ठिकाणचा देवपणा व जीवांच्या ठिकाणचा जीवपणा हे दोन्हीही भावा टाकून देऊन देवरूप झालें.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading