ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.689

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६८९

कोटीची भरोवरी सरोनी गेली शरींरीं । संसाराची उरी कांही नुरेचि गे माये ॥१॥ लक्षाचा लाभ मज घडला गे माय । करणे उपायें चरण जोडले वो ॥२॥ चिंतनी चिंतितां काय चिंतावें । तें अवघेचि मनी रूप गिळावें गे माये ॥३॥ बापरखुमादेविवरू देहेंवीण आलंगिला । तो समर्थ माल्हाथिला बाईयो वो ॥४॥

अर्थ:-

प्रस्तुत शरीराला जिवंत राहाण्याला किंवा भोग भोगण्याला प्रारब्ध कर्माची सामुग्री असते. ती कोट्यवधी जन्मातील सामुग्री याच शरीरांत संपून गेल्यामुळेवपुन्हा पुन्हां जन्ममरणरूपी संसाराची स्थिती काही उरत नाही. अशी माझी स्थिती झाली. कारण जीवपदाचा लक्ष्य जो परमात्मा त्याची प्राप्ती झाली. काय पूर्वजन्मी पुण्य केले होते, की त्याचेच फल भगवंत्चरणाची प्राप्ती झाली आहे. आता माझ्याशिवाय दुसरे काही उरले नसल्यामुळे मनांमध्ये कोणत्या रूपाचे कुणी चिंतन करावे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, तो देहभाव ‘माल्हाथिला’ म्हणजे बाधित झाला. व तोच मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading