ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.677

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६७७

मनाची वाती लाऊं गेलीये ज्योती । ते अवधीच प्राप्ती ज्योतिरूपें ॥१॥ तेथें ब्रह्म गर्भा आलें ब्रह्म गर्भा आलें । लय लक्ष उरलें बाईयें वो ॥२॥ रखुमादेविवरू अप्रमेय देखिला । तोही इच्छितां हरपला माझ्या ठायीं ॥३॥

अर्थ:-

मनाची वात करून ज्योत लावायला गेले. म्हणजे परमात्मस्वरूपाचा विचार करावयाला गेले. तो ज्ञानरूप जो परमात्मा त्याचीच प्राप्ती झाली. त्या मनाच्या गर्भात ब्रह्म प्रादुर्भूत झाले. यामुळे लयाचे लक्ष जे ब्रह्म तेवढेच उरले. अप्रमेय म्हणजे अविषय जे रखुमादेविचे पती

श्रीविठ्ठल त्यांना मी पाहिले. शेवटी त्याची इच्छा करायला गेले तो ते ही माझ्या ठिकाणी हरपून गेले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading