ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.678

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार ६७८

अष्टही अंगे नवही व्याकरणें । सप्तही त्वचा भेदोन गेले गे माय ॥१॥ तेथे वेदां वाट न फुटे वेदां वाट न फुटे । येरासी कैचे पुरपुढे गे माये ॥२॥ रखुमादेविवरू मज फावला । देखोनी वोरसला पर पाहीं ॥३॥

अर्थ:-

शरीराची आठ अंगे, नवद्वारे, सप्तत्वचा या सर्वांचा भेद करून मी ज्याठिकाणी गेलो. त्याठिकाणी जाण्यास वेदालाही वाट सापडत नाही. तेथें बाकीच्या बोलक्या लोकांची पुटपुट काय सरती होणार? पराचाही पर असणारा रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मला प्राप्त झाले. त्यांना पाहून मजवर आनंदाचा वर्षाव झाला. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading