ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.658

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६५८

निर्गुणाचे हातीं व्यवहारू पडिला । दाईजपणा मुकला साभिलाषे ॥१॥ निरंजन वनीं धरीन मुरारी । भाग अभ्यंतरीं घेईन देखा ॥२॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु सोवळा । भागा मज आला हरिहरू ॥३॥

अर्थ:-

निर्गुण परमात्मस्वरूपाच्या हाती सर्व जगत व्यवहार अध्यस्त असल्यामुळे जीवाचे आणि त्याचे एकपणाचे नाते मूळचेच आहे. परंत देहादिकांशी तादात्म्य पावल्यामुळे दीनपणा आला आहे. वास्तविक जीव हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो त्याचा दाईज म्हणजे त्यापैकीच आहे. त्या परमात्मस्वरूपाचा अभिलाष धरल्यामुळे त्याच्या प्राप्तीने आप्तेष्टपणाचा तो पृथक संबंध गेला.असा निरंजन वनांत सगुणरूपाने वास करणारा जो मुरारी त्याला धरून त्याचा भाग मनांत आणील. माझे पिता व रखुमादेवीचे पती, जो हरिहरात्मक सोवळा श्रीविठ्ठल तो माझ्या भागाला आला असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading