ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.657

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६५७

अंतरींचा विस्तारू ब्रह्मीं पाल्हायिला । तेथे एक मनु सिद्धसाधक भला ॥१॥ तेणें केलें अनारिसें केलें अनारिसें । पाहों गेलें सरिसें हरपलें गे माये ॥२॥ तेथे ऋग् यजुःसाम भुलले । तें माझ्या ठायीं फुललें ब्रह्ममय ॥३॥ रखुमादेविवर अंतरब्रह्मीं तरंगु जाला । ब्रह्मउदधी सामावला मज घेऊनि माये ॥४॥

अर्थ:-

अंतरीचा परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विस्तार पाहु गेले असता तेथें तो परमात्माच मनाच्या उपाधि भेदाने सिद्ध साधक नटलेला आहे. अशा सिद्ध स्थितित पावलेल्या मनाने मला देहादि अनात्म धर्मापासून वेगळे केले. नंतर मी पाहू लागले तो माझे मीपणच हरपलें म्हणजे मला परमात्मस्वरूप प्राप्त झाले. त्या परमात्मस्वरूपाचा विचार करण्यांत ऋग्यजुःसाम हे वेद भुलुन गेले.ज्या परमात्मस्वरूपाविषयी ते भुलून गेले ते परमात्मस्वरूपच माझ्याच ठिकाणी सर्व ब्रम्हमय आहे. ऱखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे ब्रह्मरूपी समुद्रावर एक तरंग असल्यामुळे त्या समुद्रात ऐक्य पावला. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading