ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 57

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५७

आजि देखिलें रे आजि देखिले रे ॥ सबाह्य अभ्यंतरी । अवघा व्यापकु मुरारी ॥ दृढ विटे मन मुळी । विराजीत वनमाळी ॥ आजि सोनियाचा दिनु । वरी अमृतातें वरिषे धनु ॥ बरवा संतसमागमु । प्रकटला आत्मारामु ॥ बाप रखुमादेविवरू । कृपासिंधु करुणाकरू ॥

अर्थ:-

अंतर्बाह्य व्यापुन असलेला तो मुरारी आज मी पाहिला.त्या विटेवर दृढ उभा असलेला तो वनमाळी आहे. आज माझ्यासाठी त्यामुळे सोन्याचा दिवस आहे. तो मेघ स्वरुप होऊन आमच्यावर अमृताचा वर्षाव करतो. त्या संतसमागमालाठी तो आत्माराम प्रगट झाला आहे. तो कृपा करणारा कृपासिंधु रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading