
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५५९
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥१॥ पतीतपावन मान समोहन । ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥२॥ ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन । ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥४॥
अर्थ:-
आमची उपास्य देवता जो श्रीविठ्ठल तो सगुण निर्गुणाहून विलक्षण ब्रह्म आहे. तसेच तो पतितपावन, मनाला मोहून टाकणारा विठल आहे. ध्याता, ध्यान व ध्येय याहून वेगळा तो अनादि सिध्द असा आहे. सच्चिदानंद स्वरुप अनादि सिद्ध जे ब्रह्म तोच आमचा श्री विठ्ठल आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 558
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 560
