ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 553

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५५३

कासया प्रतिष्ठा व्यर्थ मानितोसी । सर्वत्र धरिसी समभावें ॥१॥ आत्मयासी जगतीं अवघाची एकला । जगांत संचला तद्रूपें तो ॥२॥ अणुरेणु तृण काष्ठादि पाषाण । सर्वत्रीं समान आत्मा तोचि ॥३॥ देह उच्च नीच आत्मा सर्व सम । मानिती विषम मंदमती ॥४॥ भेदाभेद दोन्ही सर्व एकाकार । म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण योगीं ॥५॥

अर्थ:-

सर्व ठिकाणी माझा समभाव आहे. अशी प्रतिष्ठा लोकांमध्ये विनाकारण कशाला मिरवितोस. त्या ऐवजी जर सर्वव्यापक एक ब्रह्म आहे. असे जर जाणशील तर जगव्यापक परमात्माशी तूं एकरुप होशील. परमात्मा अणु, रेणु, तृण, काष्ठ, पाषाण या सर्व ठिकाणी समान भरलेला आहे. तेच तुझेही स्वरुप आहे. उंच नीचपणा आत्म्याचा नसून देहादि उपाधिचा आहे. पण मंदमती लोक ती विषमता आत्म्याची मानतात. जगातील भेदाभेद हे सर्व एक ब्रह्मरुपच आहेत.असे जाणणारा तो पूर्ण योगी समजावा. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading