ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 518

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५१८

चौदा विद्या जरी पूर्ण अभ्यासिले । व्यर्थचि जाहले ज्ञानेविण ॥१॥ तीन वीस चारी कळा अनुभविले । व्यर्थचि जाहले ज्ञानेवीण ॥२॥ अष्टांगादि योग प्रयासें जोडले । व्यर्थचि जाहले ज्ञानेवीण ॥३॥ कर्मधर्मक्रिया नाना आचरले । व्यर्थची जाहले ज्ञानेवीण ॥४॥ ज्ञानेश्वर म्हणे ब्रह्म साधियलें । कीर आथीयलें ज्ञानेवीण ॥५॥

अर्थ:-

चौदा विद्या, चौसष्ट कला, अष्टांग योग व अनेक पुण्यकारक कर्माचरणे केली पण ब्रह्मज्ञान जर झाले नाही तर ते सर्व व्यर्थ आहे. एका ब्रह्मज्ञानावांचून काही जरी केले तरी ते सर्व व्यर्थ होय असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading