ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 515

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५१५

रजापासूनियां जाहली उत्पत्ति । सत्त्वगुणीं स्थिति वाढविती ॥१॥ तमोगुणें करूनी पाविजे मरण । राहाटती त्रिगुण जगामाजीं ॥२॥ त्रिगुण त्यजुनी व्हावे निस्त्रेगुण । नाचरावे पुण्यपाप काहीं ॥३॥ तरीच ब्रह्मज्ञान गुरूकृपाप्राप्ती । जिता जिवन्मुक्ती ज्ञानेश्वर ॥४॥

अर्थ:-

ब्रह्मदेव रजोगुणाने जगाची उत्पत्ति करतो. विष्णु सत्त्वगुणाच्या योगाने स्थिति वाढवते. शंकर तमोगुणाच्या योगाने नाश करतो अशी त्रिगुणापासून जगाची राहाटी आहे. त्रिगुण टाकून देऊन त्रिगुणाच्या पलीकडे व्हावे. व त्याकरिता पापपुण्यजनक कर्माचे आचरण करू नये. अशी तुमची वागणूक झाली तरच गुरूकृपा होऊन तुम्हाला जीवंतपणीच मुक्तीच्या सुखाचा अनुभव मिळेल. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading