ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 35

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३५

निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणी सापडली ॥ आंगणीं चिंतामणी जळधरु सिंपणी । अमृतसाजणी जीवनकळा ॥ सुमनाचे शेजे विरहिणी विराजे । शयनी सुलजे आरळ सेज ॥ माजयांने हटी मुखकमळ टेंकीं । निळिये अवलोंकीं कृष्णमूर्ति ॥ कमळणी आमोद सुस्वाद मकरंद । चंदनाची अभेद उटी अंगी ॥ कर्पूरपरिमळे दिव्य खाद्य फळें । ठेऊनि सोज्वळे वाट पाहे ॥ मन तो निळिये गोविंदचिये सोसे । विरहिणी पाहे वाटुनी ऐसे ॥ ज्ञानदेवी निळिये वाटुनि गोविंदीं । कृष्ण निळिये पदी ठाव जाला ॥

अर्थ:-

 मोत्याच्या सारणीतुन निळी रात्र वाहात आहे. अशी निळ्या मोत्यांची खाणच सापडली. तो चिंतामणी होऊन हृदयात अमृताचे शिंपण करतो. ती विरहिणी त्या पुष्प शय्येवर पडुडली आसुन ती तळमळत आहे. त्याने निळे मुखकमळ एकदा दाखवावे असे तिला मनोमन वाटते. ती विरहिणी मधाची चव व कमळाचा सुगंध घेऊन चंदनाची उटी लाऊन बसली आहे. कर्पुर मश्रीत उटी लाऊन ती रसरशित फळे घेऊन त्याची वाट पाहात आहे. तीचे मन त्या गोविंदाच्या सोसाने आतुरले असुन ती विरहिणी विरहात तळमळत आहे. त्या निळ्या गोविंद च्या निळ्या कृष्णपदात निळेपणे मनाला ठाव दिला आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading