ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 36

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३६

निळिये सारणी वाहे मोतियाचे पाणी । चिंतामणी अंगणी पेरियेला ॥ कैसा हा माव करुं गोविला संसारु । कृष्णसंगे धुरंधरे तरलो आम्ही ॥ हिरियाची खाणी दिव्य तेज मणी । सांपडला अंगणी सये मज ॥ सूर्यकर रश्मी चंद्र अहमस्मि । प्रकट झाल्या रश्मी जेथूनियां ॥ कल्पतरु चोखु चिंतामणी वेखु । मना माझी हरिखु देखियेला ॥ ज्ञानदेवी वल्ली विद्युल्लता सलिलीं । फळपाकें दुल्ली दुभिनल्या ॥

अर्थ:-
निळ्या मोत्यांच्या पाटातुन अंगणात पेरलेल्या चिंतामणीला पाणी दिले. त्या संसाराच्या मायेतुन आम्ही त्या कृष्णकृपेने तरलो. तो हिऱ्याच्या खाणीतील दिव्य मणी मनाच्या अंगणात सांपडला. चंद्र व सूर्य ह्यातुन प्रगट झालेल्या रश्मी त्याच्या पासुनच तयार झाल्या आहेत. कल्पतरु व चिंतामणी समान असलेला तो पाहिला की मला आनंद वाटत आहे. विद्युलतेच्या कडकडाटात होणाऱ्या वृष्टीमुळे फळ व फुले खुप येतात तसाच आनंद श्रीकृष्ण दर्शनाने होतो असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading