👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७१
पावया लुब्ध झाल्या पावळा । गाई परे वळा रे कान्हा ॥ विसरल्या चार विसरल्या पार । तल्लीन साचार कृष्णमूर्ती ॥ पाणिया निघाल्या गाई चरती कळंबा ठायीं । हांकितसे लवलाही संवगडा ॥ ज्ञानदेवी गाई हाकितु पावे सोई । हरिनाम दोही सत्राविये ॥
अर्थ:-
कृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वरांनी त्या गाई मुग्ध झाल्या. त्यांना परत चाऱ्याकडे वळा. त्या गाई कृष्णाला पाहून तल्लीन झाल्या व चारा खायच्या विसरल्या नंतर कळंब वृक्षाच्या खाली असणाऱ्या गाईंना सवंगडी हाकारत होते.हरिनामाच्या गाई हाकल्याने त्या सवंगड्यांना सतरावी जीवन कळा प्राप्त झाली असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.170
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.172
