👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७०
योगियां मुनीजनां ध्यानी । ते सुख आसनी शयनीं ॥ हरिसुख फावले रे ॥ गोकुळींच्या गौळिया । गोपी गोधना सकळा ॥ बापरखुमादेविवर विठ्ठले । ते सुख सवंगडीया दिधलें ॥
अर्थ:-
योगी व मुनीजन यांच्या ध्यानातील सुख गोकुळवासियांना घरात पडल्या पडल्या ते सुख मिळाले. ते गोकुळीच्या गवळ्यांनाच नाही तर गोपी, गाई व गोधनासकट सगळ्यांना मिळाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी ते सुख सर्वांना दिले असे माऊली सांगतात.