👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७२
गायी चालिल्या वनाप्रती । सर्वे पेंद्या चाले सांगाती ॥ वळी गोवळिया कान्होबा । यमुने पाण्या नेई तू बा ॥ पांवया छंदे परतल्या गाई । विसरल्या चारा तल्लीन ठायी । ज्ञानदेव सवे सवंगडा लाठा । गाई हांकितो गोठणा तटा ॥३॥
अर्थ:-
गाई वनामघ्ये नेत असताना कृष्णासवे पेंदया चालला तेव्हा पेंदया म्हणाला हे कान्हा यांना तू यमुनेच्या तीरावर पाणी प्यायला ने तेव्हा कृष्णाने पावा वाजवायला सुरवात केली व त्या गाई चारा खायला विसरल्या व तल्लीन झाल्या. मी त्या सर्व संवगड्यांपैकी मोठा सवंगडी होऊन गोठ्यापर्यत नेण्याचे काम करतो असे माऊली सांगतात.