ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 115

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११५

अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे । हरिनाम नाटे तें बरवें ॥ जें नाटे तें नाम चित्ती । रखुमादेवी पती श्रीविठ्ठलाचें ॥ शरीर आटे संपत्ति आटे । हरिनाम नाटे तें बरवें ॥ बापरखुमादेविवरांचे नाम नाटे । युगें गेली परी उभा विटे ॥

अर्थ:-

अंडज,जारज,स्वेदज,उव्दिज या चार खाणीतील सृष्टी नष्ट होते पण परमात्म्याचे नाव नष्ट होत नाही. रखमादेवीचा पती श्री विठ्ठलाचे नाम नष्ट होत नाही म्हणून चित्तात धरावे. शरीर व संपत्ती ही संपणारी आहे पण विठ्ठलाचे नाम उत्तम असून नष्ट होत नाही.रखुमा देवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठलाचे नाम नष्ट होत नाही याचा पुरावा म्हणजे युगानुयुगे विटेवर उभा असणारा श्रीविठ्ठल आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading