👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११६
राम नाम वाट हेचि पै वैकुंठ । ऐसी भगवतगीता बोलतसे स्पष्ट ॥ अठरा साक्षी साही वेवादत । चौघांचेनि मतें घेईन भागु ॥ शेवटिले दिवसीं धरणे घेईन । बापरखुमादेविवरा बळेंचि साधीन ॥
अर्थ:-
श्रीमत् भगवतगीता स्पष्ट सांगते की श्रीरामाचे नाम हीच वैकुंठाची वाट आहे अठरा पुराणे साही शास्त्र व चार वेद यांचेही तेच मत आहे म्हणून मी सतत रामनाम घेईन.रखमाईचे पती व माझे पिता यांचे नाम माझ्या अंतःकाळापर्यत अट्टाहासाने घेईन व त्या बळावर त्या परमात्म्याला आपलासा करुन घेईन असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 115
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 117
