ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 105

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०५

सांवळिये तेजीं भक्ति पसु ओल । इंद्रिया शरण चरणजीं ॥ निवालों वो माये अमृत रसनें । रामनामपेणें वैकुंठीचें ॥ आळवितां सगुण निर्गुण रुपडें । वचनें फोडोवाडें हातां येत । ज्ञानांजन लेवों ज्ञानदेवी निज । निवृत्तीनें गुज सांगितलें ॥

अर्थ:-

 सावळ्या तेजामुळे मनाला भक्तीची ओल येते. तसेच इंद्रिये त्याच्या चरणावर अर्पण होतात. मी त्याच नामाच्या अमृत वाणीने शांत झालो व त्याच नामाने वैकुंठ प्राप्त केले.त्याच्या सगुण व निर्गुण रुपाला भक्तीने आळविले तेव्हा तो उघड रितीने प्राप्त झाला. निवृत्तिनाथानी मला नामज्ञानांजन घातले व गुह्य ज्ञान दिले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading