👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०४
सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण । धृति धारणा धन वर्ते जया ॥ सामान्यत्व हरि समसेज करी । चित्त वित्त घरीं हरिपाठें ॥ आकार निराकारी त्रिपथ शेजारीं । हरि भरोवरीं घेतु विरूळा ॥ ज्ञानदेवाजिणें अवघें ज्ञान होणें । विज्ञानीं राहाणें गुरुकृपा ॥
अर्थ:-
सर्वत्र समान व भावयुक्त राहुन जर नाम घेतले तर धर्माचे धारण होते व नामधनाचा वर्षाव होतो. ह्या हरिपाठामुळे हरि सामान्य होऊन त्याच्या बरोबर सम सेज करतो म्हणजे जागृत अवस्थेत तसेच झोपेतही बरोबर राहतो व त्याचे चित्त व वित्त सगळेच हरिरुपाला प्राप्त होते. निराकारातील त्रिगुण व मायेतील जगताचा आकार ह्यांना बाजुला सारुन हरिनामात रतणारा विरळाच असतो. असे हे ज्ञान प्राप्त झाले की सहज संसाररुपी विज्ञानात राहण्याची बाधा गुरुकृपेने दुर होते असे माऊली सांगतात.
