ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.916

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९१६

न गमे हा संसारु म्हणोनी केला भ्रतारु । लोक अनाचारु म्हणती मज ॥१॥ चंचळ जालीये म्हणतील मज । कवणा सांगू हे जिवींचे गूज ॥२॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला वांचुनी नेणें । सतत राहणे याचे पायीं ॥३॥

अर्थ:-

मला या संसारांत करमेना म्हणून मी पहिला नवरा टाकून दुसरा भ्रतार(परमेश्वरालाच) केला. त्यामुळे हा अनाचार केला म्हणून लोक माझ निंदा करतील.परंतु सर्व संसाराचा वीट येऊन परमात्मस्वरुपाची प्राप्ती व्हावी. ही उत्कट असलेली माझी इच्छा हे माझे मनातील गुह्य कोणास सांगावे. व पटणार तरी कोणास आतां मात्र माझी अशी स्थिती झाली आहे. की परमात्मा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठला त्यांचा वांचून दुसरे कांही एक न पाहता सतत त्याचे पायी राहणे हेच आपले कर्तव्य आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading