ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.917

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९१७

अद्वैत अंबुला परणीला देखा । दुसरा विचार सांडिला ऐका ॥१॥ सांडिणी सांडिला पैं घराचारु । दुसरा विचारु नाही केला ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलेंसी घराचार । ठकला व्यवहार बाईयांनो ॥३॥

अर्थ:-

अखंड अद्वैत स्वरुप जो परमात्मा हा नवरा समजून त्याच्या बरोबर विवाह केला. आणि दुसरा प्रापंचिक सर्व विचार टाकून दिला. सांडण्याला योग्य असा घराचार सोडून देऊन परमात्म स्वरुपांशिवाय दुसरा विचार केला नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या बरोबर ऐक्य झाले असता सर्व घराचाराचा व्यवहार टाकला असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading