ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.908

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१४ वे, रूपके  विरहिणीअभंग ९०८

मनें करूनि कुटिल उकलुनि शृंगारे । ते लावण्याच्या अपारे पडिलें वो माये ॥१॥ माझें कुटिळपण गेले कुटिळपण गेलें । गोविंदें बोजाविलें निजरूप वो माये ॥२॥ बापरखुमादेविवरू माझें कुटिळ फेडूं आला । विटेवरी मालाथिला निजरूपें वो माये ॥३॥

अर्थ:-

मनाच्या कुटीलपणाने म्हणजे मी देह आहे या विपरीत समजुतीने पुष्कळ शृंगार करून शरीर लावण्याच्या अपार अभिमानांत होते. अशा स्थितीत मला श्रीकृष्णाने आत्मस्वरूपाविषयी निजबोध केल्यामुळे मनाचा हा कुटिलपणा नाहीसा झाला. माझ्या मनाचा कुटीलपणा गेला, कारण गोविंदाने माझे निजस्वरूपाचा बोध दिला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल याने माझी विपरीत बुद्धी नाहीसी करून विटेवर असणारा जो श्रीविठ्ठल त्याचे ठिकाणी माझे स्वरूपाचा लय केला.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading