ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.909

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९०९

माझी शंका फिटले । लाजा सांडिले । अवघे घातले । मज निरसूनियां ॥१॥ अठरा भार वनस्पती । सुरवर वोळंगती ॥ देवोदेवि आदिपती । कृष्ण काळा गे माये ॥२॥ ऐसा कृपानिधि सांवळा । की बापरखुमादेविवरू गोंवळा ॥ त्याचा मज चाळा । बहु काळ गे माये ॥३॥

अर्थ:-

माझ्या ठिकाणची मी देह आहे की आत्मा आहे अशा तऱ्हेची शंका नाहीशी होऊन गेली. मी देह नसल्यामुळे देहसंबंधी लज्जा राहिली नाही. विचाराने अंतःकरणनिष्ठ काम क्रोधादि सर्व मंडळींचा निरास करून टाकला. सर्व प्रकारच्या वनस्पती, सर्व देवगण ज्याच्या चरणी लागतात तो देवांचा अधिपति भगवान श्रीकृष्ण कृष्णवर्णाचा आहे. असा जो कृपानिधी सांवळ्या रंगाचा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल गायी वळणारे त्याचा मला बहुत काल छंद लागला आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading