संत सोपानदेवाचे संपूर्ण चरित्र पहा
संत सोपानदेव जयंती…
संत ज्ञानेश्वरादी भावंडात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान संत सोपानदेव यांचे. ते यांतील सर्वात थाकटे भाऊ होते. त्यांच्या पाठीवर मुक्ताबाई ही धाकटी बहीण. ही भावंडे सतत एकमेकांसोबत राहिली, वावरली. त्यांचे जीवन एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. आपल्या जन्मापासून समाधीपर्यंत ती एकमेकांना सोडून राहिलीच नाहीत. जणू ही चार मानवी शरीरे असली, तरी त्यांचा आत्मा एकच असावा, एवढे त्यांचे वावरणे एकात्म होते. सोपानदेवांचे चरित्र अभ्यासताना ही बाब विशेषत्वाने लक्षात घ्यावी लागते.
विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर यांच्यानंतरचे आणि संत मुक्ताबाई या बहिणीच्या अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव होत. आई वडिलांनी देहत्याग केला, त्यावेळी ही भावंडे लहान होती. सोपानदेवांचे वय तर अजाणतेच म्हणावे लागेल. अगदी संत ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ अर्थात ‘भावार्थदीपिका लिहिली, तेव्हा म्हणजे शके १२१२ (इ.स. १२९०) मध्ये त्यांचे वय अवघे पंधरा- सोळा वर्षांचे होते. सोपानदेव आपले थोरले बंधू निवृत्तीनाथापेक्षा सहा वर्षांनी, संत ज्ञानदेवांपेक्षा तीन वर्षांनी धाकटे होते, तर संत मुक्ताबाई पेक्षा तीन वर्षांनी मोठे होते.
संत जनाबाईंच्या अभंगास प्रमाण मानल्यास सोपानदेवांचा जन्मशक ११९६ (इ.स. १२७४) गृहित धरावा लागतो. त्यांचे बालपण प्रारंभी आई वडिलांच्या छत्रछायेखाली गेले असले, तरी तरी हे प्रेम त्यांना अतिशय अल्पकाळ मिळाले होते. त्यांनतरचे त्यांचे बालपण निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्याच सान्निध्यात गेलेले आहे. सोपानदेवांना आपल्या आई वडिलांकडून सुसंस्कृत जीवनाचा वारसा मिळाला होताच, शिवाय त्यानंतर थोरल्या भावंडांनीही त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेले आहे. आई वडिलांच्या समवेत त्र्यंबकेश्वराची यात्रा त्यांनी अतिशय लहानपणी केली. त्यावेळी निवृत्तीनाथांच्या गर्भगिरीच्या जंगलात हरवण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनात विस्मरणीय ठरला असावा.
पुढे भावंडासोबत शुद्धिपत्र मिळविण्यासाठी त्यांनी पैठणला प्रयाण केले. परतीच्या प्रवासात नेवासा येथे या भावंडांचा प्रदीर्घ मुक्काम पडला होता. नंतर भावंडासोबत पंढरपुरची वारी आणि नामदेवादी संतांबरोबर तीर्थटनही त्यांनी केले. अशाप्रकारे त्यांना बालपणातच एकप्रकारची भटकंती करून जीवन कंठावे लागले होते.
संत सोपानदेव : शिष्यपरिवार.
सोपानदेव वयाने लहान असले, तरी
संकलन:
सदानंद पाटील, रत्नागिरी.
