नक्र उद्धार अभंग नक्र बोले ऐके ह्र्षीकेशी

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

वारकरी भजनी मालिका
WARKARI BHAJNI MALIKA

1.                  नक्र उद्धार अभंग

1.      नक्र बोले ऐके ह्र्षीकेशी

नक्र बोले ऐके ह्र्षीकेशी । नाममात्रें तारिले गजेंद्रासी ।
काय कृपण झालें मजविशीं । आतां कैसा बा मोकलूनि जासी ॥१॥
कळलें तुझें देवपण आतां । सोडीं ब्रीद आपुले दीनानाथा ॥धृ॥

दीनानाथा म्हणविशी कशासाठीं । व्दैतभाव त्वां धरियेला पोटीं ।
कैसें पाप लाविलें माझे पाठीं । तुझें रुप देखिलें आजि दृष्टि ॥२॥
दीनानाथ बोलती वेद चारी । साधुसन्त गाताती नानापरी ।
सत्य ब्रीद मिरवत चराचरीं । सोडीं ब्रीद आपुले झडकरी ॥३॥

रज मात्रे तारिली अहिल्या शिळा । नामें करुनि उद्धरिलें अजामेळा ।
पापी कैसा मी घननीळा । तुझें रुप देखिलें म्यां आजि डोळां ॥४॥
न्याय ब्रीद घेईन तुझें आतां । पापी कैसा मी सांग दीनानाथा ।
कैसें पाप मारिलें माझ्या माथां । अझूनि लाज कां नये तुझ्या चित्ता ॥५॥
नक्र बोले देवासी हांसू आलें । निंदा नोहे स्तवन माझें केलें ।
दीनानाथें तात्काळ उद्धरिलें । विष्णुदास नामा कौतुके बोले ॥६॥

नक्र उध्दार अभंग समाप्त

भजनी मालिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading