🕉🚩भागवत महात्म्य 🚩🕉भागवत महात्म्य सूची
संपूर्ण श्रीमद्भागवत महापुराण
भागवतपुराण : हिंदूंच्या अठरा महापुराणांपैकी सर्वाधिक लोकप्रिय असे महापुराण. ते संस्कृतात आहे. हे नुसते भागवत वा श्रीमद्भागवत ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
ह्याची रचना बारा स्कंधांत करण्यात आली असून त्यात ३३२ अध्याय व सु. १८ हजार श्लोक आहेत. त्याचा दहावा खंड सर्वांत मोठा, तर बारावा सर्वांत लहान आहे.
दहाव्या स्कंधाची पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे. विष्णुचा अवतार कृष्ण हा भागवताचा नायक असून त्याच्या भक्तीचे गुणगान त्यात केलेले आहे म्हणून हे एक वैष्णव पुराण मानले जाते. त्रिगुणांच्या आधारे केलेल्या वर्गीकरणानुसार त्याचा समावेश सात्त्विक पुराणांच्या वर्गात होतो. ह्या महापुराणात दिलेल्या परंपरेनुसार ते वासुदेवाने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने व्यासांना, व्यासांनी शुकदेवाला आणि शुकदेवाने परीक्षित राजाला सांगितले.
दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींची तपशीलवार व प्राधान्य देऊन केलेली वर्णने पाहता, त्याची रचना दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडूत झाली असावी, असे मत व्यक्त केले जाते, भक्ती हा भागवताचा मुख्य प्रतिपाद्य विषय असून ही भक्ती द्रविड देशात निर्माण झाली, अशा आशयाचा एक श्लोक भागवतमाहात्म्यात आढळतो. त्यामुळे भागवताची निर्मितीही द्राविड देशातच झाली असावी, असा तर्क केला जातो. तो श्लोक असाः
भक्ती स्वतःविषयी म्हणते –
“उत्पन्ना द्राविडे साहं वृद्धिं कर्णाटके गता l
क्कचितक्कचिन्महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता ll” (१.४८)
अर्थ : द्राविड देशात मी उत्पन्न झाले, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी वृद्ध झाले.
भागवताची एकाहून अधिक संस्करणे झाली असावीत, असेही दिसते.
सर्ग (जगाची निर्मिती), प्रतिसर्ग (प्रलय), वंश (राजवंश), मन्वंतरे (विशिष्ट कालखंड) आणि वंशा (श्या) नुचरित (ऋषिवंशातील वा राजवंशांतील व्यक्तींची चरित्रे) हे पुराणांचे पाच विषय मानलेले आहेत. तथापि भागवतपुराणाने पुराणांचे दहा विषय नमूद केले आहेत. ते असेः सर्ग, विसर्ग (जीवाची निर्मिती), स्थान (ब्रह्याडांचे वर्णन), पोषण (ईश्वराचा अनुग्रह), ऊती (कर्मवासना), मन्वंतरे (सृष्टिनियमांच्या मनूनामक अधिष्ठात्री देवतांच्या कारकीर्दी), ईशानुकथा (परमात्माच्या अवतारकथा), निरोध (प्रलय), मुक्ती आणि आश्रय (परब्रह्य). ह्या संदर्भात भागवतात आलेला श्लोक असा :
“अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः l
मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रय ll” (२.१०-१).
साध्यतत्त्व असलेला भगवान हा भागवताचा मुख्य विषय असून त्याच्या प्राप्तीसाठी भक्ती हे साधन होय, असे ह्या ग्रंथात सांगितले आहे. ही भक्ती कशी करावी, त्याचा भागवताने जो मार्ग सांगितला आहे, त्याला भागवत धर्म असे म्हणतात. भागवताच्या बारा स्कंधांत जे विषय आले आहेत, ते थोड्यकात पुढीलप्रमाणे :
प्रथम स्कंध : एकूण अध्याय सोळा. भागवतपुराणाची निर्मिती कशी झाली, त्याचे विवेचन. परीक्षिताचा जन्म व कर्तृत्व. शमीक ऋषीचा पुत्र शृंगी ह्याने परीक्षिताला दिलेला शाप. तक्षकाच्या दंशाने आपण मरणार हे कळल्यानंतर परीक्षिताने आपला पूत्र जनमेजय ह्याच्याकडे राज्यकारभार सोपवून सुरु केलेले प्रायोपवेशन. नारदमुनींचे चरित्र व द्वारकेचे वर्णनेही ह्या स्कंधात आलेले आहे.
द्वितीय स्कंध : एकूण अध्याय दहा. शुक्राचार्यांचे परिक्षितासाठी भागवतकथन सुरु. कृष्णावतरापर्यंतचे परमात्माचे अवतार. विराट पुरुषाचे वर्णन, पुराणांची दहा लक्षणे (विषय) ह्या स्कंधात सांगितिला आहेत. सृष्टीच्या उत्पत्तीसारखे विषय ह्यात आले आहेत. गुह्य असे ‘चतुःश्लोकी भागवत’ ही ह्या स्कंधात आहे.
तृतीय स्कंध : एकूण अध्याय तेहतीस. कौरव-पांडवकथा, कौरवाकडून पांडवांच्या झालेल्या छळाचे वर्णन, विदुर-मैत्रेय भेट, ब्रह्मदेवाच्या शरीरापासून स्वायंभुव मनू आणि शतरुपा ह्यांचा झालेला जन्म, विष्णूचे द्वारपाल जयविजय ह्यांचा हिरण्याक्ष व हिरण्याकश्यपू ह्या नावांनी दात्यकुलात झालेला जन्म. हिरण्याक्षाचा वरहरूपी भगवंताकडून झालेला वध, मनूने आपली देवहूती ही कन्या कर्दम ऋषीला अर्पण करणे, देवहूतीच्या पोटी जन्म घेतलेल्या पोटी जन्म घेतलेल्या कपिल मुनीने आपल्या मातेस सांख्यज्ञानाता केलेला उपदेश हे ह्या स्कंधातील काही विषय.
चतुर्थ स्कंध : ह्या स्कंधाचे अध्याय एकतीस. ह्यात स्वायंभुव मनूचा वंश, दक्षयज्ञाचा विध्वंस, ध्रुवचरित्र, पृथुचरित्र, वेन राजाची कथा, पुरंजन राजाची गोष्ट, वैराग्यवृत्तीमुळे होणारी मोक्षप्राप्ती ह्यांसारखे विषय आहेत.
पंचम स्कंध : एकूण अध्याय सव्वीस. ह्याचा बराचसा भाग गद्य आहे. मनुपुत्र प्रियव्रत ह्याचा वंशविस्तार, प्रियव्रताचा वंशज ऋषमदेव ह्याने ब्रह्यावर्त तेथे आपल्या पुत्रांना केलेला उपदेश, ऋषभदेवाचा पुत्र भऱत ह्याची कथा, सूष्टीवर्णन (त्यात पर्वत-नद्यांची रचन, विविध ठिकाणचे अधिपती आणि लोक, त्यांची उपासनादैवते, उपासनामंत्र इत्यादी).
षष्ठ स्कंध : एकूण अध्याय एकोणीस. स्वायंभुव मनूच्या वंशाचे वर्णन, अजामिळाची कथा, इंद्र-वृत्रासुराचे युद्ध, विश्वरुपाची कथा, मरुतांचे जन्म, पुसंवनव्रत इ. विषय ह्या स्कंधात आलेले आहेत.
सप्तम स्कंध : एकूण अध्याय पंधरा. ह्यात प्रल्हादचरित्र सांगितले असून वर्णाश्रमधर्माचे विवेचन केले आहे.
अष्टम स्कंध : एकूण अध्याय चोवीस. पुराणांच्या दहा विषयांपैकी मन्वंतर ह्या विषयांचे विवेचन ह्या स्कंधात केलेले आहे. गजेंद्रमोक्ष, समुद्रमंथन, बळीचा यज्ञ, मत्स्यावतारकथा आदी विषयही आहेत.
नवम स्कंध : एकूण अध्याय चोवीस. वैवस्वत मनूपासून झालेल्या सूर्य व चंद्र ह्या वंशांचे वर्णन ह्य संस्कृत आलेले आहे. प्रद्युम्न, पृषध्र, च्यवनऋषी, नाभाग, अंबरीष आदींच्या कथा दिलेल्या आहेत. भगीरथाने केलेल्या गंगावतरणाची कथाही ह्या स्कंधात आहे. विश्वामित्राची कथा, परशुरामाने केलेला क्षत्रियकुलसंहार हे विषयही त्यात अंतर्भूत आहेत.
दशम स्कंध : एकूण अध्याय नव्वद. पूर्वार्धात ४९, उत्तरार्धात ४१. भगवान गोपालकृष्णाचे चरित्र ह्या स्कंधात सविस्तरपणे दिलेले असून ते रसपूर्ण आहे. श्रीकृष्णाच्या बाळलीला, पूतना, शकटासूर, तृणावर्त ह्यांचा त्याने केलेला वध, यशोदेला त्याने घडविलेले विश्वरुपदर्शन, गोवर्धनोद्वार, कालियामर्दन, पुढे मथुरेत येऊन कृष्णाने केलेला कंसवध हयांसारखे विषय पूर्वार्धात आहेत. उत्तरार्धात कालयवनाची कथा, रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा आदी आठ स्त्रियांशी श्रीकृष्णाचा झालेला विवाह तसेच भौमासुराच्या बंदिवासात पडलेल्या सोळा हजार राजकन्यांची त्याने केलेली सुटका व त्यांच्याशी केलेला विवाह, उषा व अनिरुद्ध ह्यांचा विवाह, नृगराजाची कथा, जरासंधाचा नाश, युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ, शिशुपालवध, सुदाम्याची कथा आदि विषय आहेत.
एकादश स्कंध : एकूण अध्याय एकतीस. हा स्कंध मुख्यतः अध्यात्मपर आहे. नारदाने वसुदेवास केलेला भागवतधर्माचा उपदेश तसेच श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश ह्यात आलेला आहे. यदुकुलक्षय तसेच श्रीकृष्णाचे निर्वाण ह्या स्कंधात दाखविलेले आहे.
द्वादश स्कंध : एकूण अध्याय तेरा. श्रीकृष्णानंतर भरतखंडात होऊन गेलेल्या राजांचा थोडक्यात वृत्तांत आणि सनातन वैदिक धर्माचे विवेचन ह्या स्कंधात आलेले आहे. उपसंहारात्मक असा हा खंड आहे. युगांची लक्षणे, भक्तीचे माहात्म्य, प्रलय ह्यांसारख्या विषयांचा परामर्शही ह्यात घेतलेला आहे. तक्षकदंशाने परीक्षिताचा मृत्यू, जनमेजयाने केलेले सर्पसत्र, वैशंपायनाचा शिष्य याज्ञवल्क्य ह्याची कथा, मार्कंडेय कथा, देवपूजेच्या तंत्रोक्त पद्धतीचे विवेचन, इतर पुराणांहून भागवताचे वेगळेपण ह्यांसारखे विषय आलेले आहेत.
इतर पुराणांतून अठरा महापुराणांची नावे सांगताना भागवतपुराणाचा निर्देश भागवत ह्या शब्दाने केला जातो, तथापि सध्या श्रीमद्भागवत व देवीभागवत अशी दोन पुराणे आढळतात. त्या दोहोंपैकी महापुराण कोणते व उपपुराण कोणते ह्याबाबत सांप्रदायिकांत मतभेद आहेत. वैष्णव हे श्रीमद्भागवताला तर शाक्त देवीभागवताला महापुराण मानतात.
इतर कोणत्याही पुराणापेक्षा भागवतावर अधिक टीका झाल्या, हे भागवताच्या लोकप्रियतेचे एक गमकच होय. भागवताचा अर्थ लावणे ही विद्यावंतांच्या विद्येची कसोटी आहे, अशी म्हण रूढ झाली आहे. यावरून भागवतातील आशयाचे गांभीर्य व टीकांची आवश्यकताही स्पष्ट होते. विविध संप्रदायांच्या आचार्यांनी आपापल्या संप्रदायाला पोषक अशा टीका लिहिल्या असून काही टीका असांप्रदायिक वा स्वतंत्र स्वरूपाच्याही आहेत . अद्वैतवादी श्रीधरस्वामींची (सु. चौदावे शतक) भावार्थदीपिका ही टीका भागवतावरील उपलब्ध टीकांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. भागवताच्या रचनेशी ज्यांचे नाव जोडले जाते, त्या स्वत: बोपदेवांनी हरिलीलामृत वा भागवतानुक्रमणी, मुक्ताफल आणि परमहंसप्रिया नावाचे तीन ग्रंथ भागवतावर लिहिले असल्याचा निर्देश आचार्य बलदेव उपाध्याय यांनी केला आहे . सुदर्शन सूरींची (सु. चौदावे शतक) शुकपक्षीया आणि त्यांचेच अनुयायी असलेल्या वीरराघवांची भागवतचंद्रिका या विशिष्टाद्वैती, वल्लभाचार्यांची आपल्या शुद्धाद्वैताला अनुसरणारी सुबोधिनी, निंबार्कमतानुयायी शुकदेवाचार्यांची सिद्धांतप्रदीप आणि द्वैती विजयध्वज यांची पदरत्नावली या टीका प्रसिद्ध आहेत . द्वैत मताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य यांनी भागवततात्पर्यनिर्णय नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. सनातन गोस्वामींची फक्त दहाव्या स्कंधावरील बृहद् वैष्णवतोषिणी, जीवगोस्वामींची क्रमसंदर्भ आणि विश्वनाथ चक्रवर्तींची सारार्थदर्शिनी या तीन टीका चैतन्यसंप्रदायाच्या आहेत. फक्त दहाव्या स्कंधाच्या पूर्वार्धावर लिहिलेली पाच हजार श्लोकांची श्रीहरिनामक कवीची हरिभक्तिरसायन नावाची पद्यबद्ध टीका प्रसिद्ध आहे. मराठीमध्ये एकनाथ महाराजांची अकराव्या स्कंधावरील ओवीबद्ध टीका एकनाथी भागवत या नावाने विख्यात असून कृष्णदयार्णवांची दहाव्या स्कंधावरील हरिवरदा ही ओवीबद्ध टीकाही प्रसिद्ध आहे. इतर आधुनिक भारतीय भाषांतूनही भागवताचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.
यशवंत व्यंकटेश कोल्हटकर यांनी श्रीमद्भागवतादर्श… या मराठी ग्रंथात (१९२१) भागवतपुराणातील धर्म, तत्त्वज्ञान इ. विषयांचे विवेचन केले आहे. जे. मायर यांनी भागवतपुराणावरील जर्मन पुस्तकात (१९३१) त्या पुराणातील आर्ष रूपांचे विवेचन केले आहे. एस्. सुब्बाराव यांनी भागवतपुराणाचे इंग्रजी गद्यात भाषांतर केले असून ( १ ९ २८ ) त्यात अद्वैत, विशिष्टाद्वैत व द्वैत अशा तीन संप्रदायांना अनुसरून अर्थ दिले आहेत. स्वामी विज्ञानानंद यांनी केलेले इंग्रजी भाषांतर अलाहाबाद येथून १९२१ – २३ या काळात आणि जे. एम्. संन्याल यांनी केलेले इंग्रजी भाषांतर कलकत्ता येथून १९३०-३४ या काळात प्रकाशित झाले आहे . पं. टी. आर्. कृष्णाचार्य यांनी केलेली भागवताची सूची दोन भागांत प्रकाशित झाली आहे (१९३४ ). पी. एन्. सिन्हा यांचे भागवतातील महत्त्वाच्या भागांचे इंग्रजी भाषांतर स्टडी ऑफ दि भागवतपुराण ऑर एसोटेरिक हिंदुइझम (द्वि. आवृत्ती, १९५०) या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध संशोधनपत्रिकांमधून भागवतावर बरेच लेख प्रकाशित झाले आहेत. या लेखांतून भागवताची हस्तलिखिते, दशम स्कंधाची गुजराती श्लोकावृत्ती, भागवतातील प्रक्षिप्ते, भागवताने गौडपादकारिका व परमार्थसार या ग्रंथांकडून केलेली उसनवारी, भागवताची भाषाशास्त्रीय वैशिष्ट्ये इ. विषयांची चर्चा आहे .
भारताच्या सांस्कृतिक जीवनावर भागवताचा फार मोठा प्रभाव पडला आहे. भागवतधर्म व भक्तिसंप्रदाय यांच्या दृष्टीने भागवत हा एक प्रमाणग्रंथच आहे. काव्याच्या दृष्टीनेही त्यातील वर्णने भावपूर्ण व रसात्मक आहेत. दहाव्या स्कंधातील वेणुगीत, गोपीगीत, युगलगीत इ . गीते प्रसिद्ध आहेत. त्याच स्कंधातील ‘रासपंचाध्यायी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाच अध्यायांत रासलीलेचे भावोत्कट वर्णन आहे. त्याच स्कंधातील भ्रमरगीताचा इतका प्रभाव होता, की त्याच्या अनुकरणाने हिंदी, संस्कृत इ. भाषांतून असंख्य भ्रमरगीते लिहिली गेली.
प्रचंड वाङ्मय लिहूनही मन:शांती न लाभलेल्या व्यासांना भागवताच्या लेखनामुळे मनःशांती लाभली, असे म्हटले जाते. भागवत ही व्यासांची समाधिभाषा आहे; भागवत हे वेदान्ताचे सार आहे; भागवत ही विद्येची परमावधी वा अंतिम मर्यादा आहे; शब्दप्रधान वेद, अर्थप्रधान पुराण व रसप्रधान काव्य या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता भागवतात आहे, यांसारख्या विधानांवरून भागवताचे माहात्म्य स्पष्ट होते. भागवताच्या पुस्तकाची षोडशोपचार पूजा करण्याची व भागवताची आरती म्हणण्याची पद्धत, भागवताचे सप्ताह-पारायण करण्याची भारतभर रूढ असलेली प्रथा इत्यादींवरूनही भागवताचे जनमानसातील महत्त्वपूर्ण स्थान ध्यानात येते.
संदर्भ : १. कोल्हटकर, यशवंत व्यंकटेश, श्रीमद्भागवतादर्श वा श्रीमद्भागवताचा उपसंहार, पुणे, १९२१.
२. दामोदर सावळाराम यंदे आणि मंडळी, संपा. सुलभ सार्थ-श्रीमद्भागवत भाग १ ते ७, मुंबई.
मराठी विश्कोश वरून साभार ……
🕉🚩भागवत महात्म्य 🚩🕉भागवत महात्म्य सूची
संपूर्ण श्रीमद्भागवत महापुराण
श्रीमद्भागवत महात्म्य अनुक्रमणिका
श्रीपाद्मे माहात्म्यम् – अध्याय १ – देवर्षी नारदांची भक्तीशी भेट
श्रीपाद्मे माहात्म्यम् – अध्याय २ – भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न
श्रीपाद्मे माहात्म्यम् – अध्याय ३ – भक्तीच्या कष्टांची निवृत्ती
श्रीपाद्मे माहात्म्यम् – अध्याय ४ – गोकर्ण उपाख्यान प्रारंभ
श्रीपाद्मे माहात्म्यम् – अध्याय ५ – धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार
श्रीपाद्मे माहात्म्यम् – अध्याय ६ – सप्ताहयज्ञाचा विधी
स्कन्ध १ – अध्याय १ – शौनक आदी ऋषींचा सूतांना प्रश्न
स्कन्ध १ – अध्याय २ – भगवत्कथा आणि भगवद्भक्तीचे माहात्म्य
स्कन्ध १ – अध्याय ३ – भगवंतांच्या अवतारांचे वर्णन
स्कन्ध १ – अध्याय ४ – महर्षी व्यासांचा असंतोष
स्कन्ध १ – अध्याय ५ – भगवंतांच्या यश-कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र
स्कन्ध १ – अध्याय ६ – नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग
स्कन्ध १ – अध्याय ७ – अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी
स्कन्ध १ – अध्याय ८ – परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक
स्कन्ध १ – अध्याय ९ – युधिष्ठिर आदींचे भीष्मांजवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग
स्कन्ध १ – अध्याय १० – श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन
स्कन्ध १ – अध्याय ११ – श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत
स्कन्ध १ – अध्याय १२ – परीक्षिताचा जन्म
स्कन्ध १ – अध्याय १३ – विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे
स्कन्ध १ – अध्याय १४ – अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे
स्कन्ध १ – अध्याय १५ – कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण
स्कन्ध १ – अध्याय १६ – परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद
स्कन्ध १ – अध्याय १७ – महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन
स्कन्ध १ – अध्याय १८ – राजा परीक्षिताला श्रृंगी ऋषींचा शाप
स्कन्ध १ – अध्याय १९ – परीक्षिताचे अनशनव्रत आणि शुकदेवांचे आगमन
स्कन्ध २ – अध्याय १ – ध्यानविधी आणि भगवंतांच्या विराट स्वरूपाचे वर्णन
स्कन्ध २ – अध्याय २ – भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती वर्णन
स्कन्ध २ – अध्याय ३ – इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवद्भक्तीच्या माहात्म्याचे निरूपण
स्कन्ध २ – अध्याय ४ – राजाचे सृष्टिविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेची सुरुवात
स्कन्ध २ – अध्याय ५ – सृष्टिवर्णन
स्कन्ध २ – अध्याय ६ – विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन
स्कन्ध २ – अध्याय ७ – भगवंतांच्या लीलावतारांच्या कथा
स्कन्ध २ – अध्याय ८ – राजा परीक्षिताचे विविध प्रश्न
स्कन्ध २ – अध्याय ९ – ब्रह्मदेवाचे भगवद्धामदर्शन आणि त्यांना भगवंतांच्या द्वारा चतुःश्लोकी भागवताचा उपदेश
स्कन्ध २ – अध्याय १० – भागवताची दहा लक्षणे
स्कन्ध ३ – अध्याय १ – उद्धव आणि विदुर यांची भेट
स्कन्ध ३ – अध्याय २ – भगवंतांच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय ३ – भगवंतांच्या अन्य लीलाचरित्रांचे वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय ४ – उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषींकडे प्रयाण
स्कन्ध ३ – अध्याय ५ – विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रमवर्णन
स्कन्ध ३ – अध्याय ६ – विराट शरीराची उत्पत्ती
स्कन्ध ३ – अध्याय ७ – विदुराचे प्रश्न
स्कन्ध ३ – अध्याय ८ – ब्रह्मदेवाची उत्पत्ती
स्कन्ध ३ – अध्याय ९ – ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती
स्कन्ध ३ – अध्याय १० – दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय ११ – मन्वन्तरादी कालविभागाचे वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय १२ – सृष्टीचा विस्तार
स्कन्ध ३ – अध्याय १३ – वराह अवताराची कथा
स्कन्ध ३ – अध्याय १४ – दितीची गर्भधारणा
स्कन्ध ३ – अध्याय १५ – जय – विजय यांना सनकादिकांचा शाप
स्कन्ध ३ – अध्याय १६ – जय – विजयांचे वैकुंठातून पतन
स्कन्ध ३ – अध्याय १७ – हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय
स्कन्ध ३ – अध्याय १८ – हिरण्याक्षाबरोबर वराह – भगवानांचे युद्ध
स्कन्ध ३ – अध्याय १९ – हिरण्याक्षवध
स्कन्ध ३ – अध्याय २० – ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय २१ – कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान
स्कन्ध ३ – अध्याय २२ – देवहूतीबरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह
स्कन्ध ३ – अध्याय २३ – कर्दम आणि देवहूती यांचा विहार
स्कन्ध ३ – अध्याय २४ – कपिलदेवांचा जन्म
स्कन्ध ३ – अध्याय २५ – देवहूतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा
स्कन्ध ३ – अध्याय २६ – महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय २७ – प्रकृति – पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय २८ – अष्टांगयोगाचा विधी
स्कन्ध ३ – अध्याय २९ – भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा
स्कन्ध ३ – अध्याय ३० – देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय ३१ – मनुष्ययोनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय ३२ – धूममार्ग आणि अर्चिरादी मार्गाने जाणार्यांच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन
स्कन्ध ३ – अध्याय ३३ – देवहूतीला तत्त्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती
स्कन्ध ४ – अध्याय १ – स्वायंभुव मनूच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन
स्कन्ध ४ – अध्याय २ – भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष
स्कन्ध ४ – अध्याय ३ – सतीचा पित्याकडे यज्ञोत्सवात जाण्यासाठी आग्रह
स्कन्ध ४ – अध्याय ४ – सतीचा अग्निप्रवेश
स्कन्ध ४ – अध्याय ५ – वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षवध
स्कन्ध ४ – अध्याय ६ – कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवांकडून श्रीमहादेवांची मनधरणी
स्कन्ध ४ – अध्याय ७ – दक्षयज्ञाची पूर्तता
स्कन्ध ४ – अध्याय ८ – ध्रुवाचे वनात जाणे
स्कन्ध ४ – अध्याय ९ – वर मिळवून ध्रुवाचे घरी परतणे
स्कन्ध ४ – अध्याय १० – यक्षांकडून उत्तमाचा वध व ध्रुवाचे यक्षांबरोबर युद्ध
स्कन्ध ४ – अध्याय ११ – स्वायंभुव मनूने ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजाविणे
स्कन्ध ४ – अध्याय १२ – ध्रुवाला कुबेराचे वरदान आणि विष्णुलोकाची प्राप्ती
स्कन्ध ४ – अध्याय १३ – ध्रुववंशाचे वर्णन व अंगराजाचे चरित्र
स्कन्ध ४ – अध्याय १४ – वेनराजाची कथा
स्कन्ध ४ – अध्याय १५ – महाराज पृथूचा आविर्भाव आणि राज्याभिषेक
स्कन्ध ४ – अध्याय १६ – बंदीजनांकडून महाराज पृथूंची स्तुती
स्कन्ध ४ – अध्याय १७ – पृथूंचे पृथ्वीवर रागावणे आणि पृथ्वीकडून त्यांची स्तुती
स्कन्ध ४ – अध्याय १८ – पृथ्वीचे दोहन
स्कन्ध ४ – अध्याय १९ – पृथूंचे अश्वमेध यज्ञ
स्कन्ध ४ – अध्याय २० – महाराज पृथूंच्या यज्ञशाळेत भगवान श्रीविष्णुंचा प्रादुर्भाव
स्कन्ध ४ – अध्याय २१ – महाराज पृथूंचा आपल्या प्रजेला उपदेश
स्कन्ध ४ – अध्याय २२ – पृथूंना सनकादिकांचा उपदेश
स्कन्ध ४ – अध्याय २३ – राजा पृथूची तपश्चर्या आणि परलोकगमन
स्कन्ध ४ – अध्याय २४ – पृथूची वंशपरंपरा आणि प्रचेतांना भगवान रूद्रांचा उपदेश
स्कन्ध ४ – अध्याय २५ – पुरंजन आख्यानाचा प्रारंभ
स्कन्ध ४ – अध्याय २६ – राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे
स्कन्ध ४ – अध्याय २७ – पुरंजनपुरीवर चंडवेगाची चढाई आणि कालकन्येचे चरित्र
स्कन्ध ४ – अध्याय २८ – पुरंजनाला स्त्रीजन्म आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे
स्कन्ध ४ – अध्याय २९ – पुरंजनोपाख्यानाचे तात्पर्य
स्कन्ध ४ – अध्याय ३० – प्रचेतांना भगवान श्रीविष्णूंचे वरदान
स्कन्ध ४ – अध्याय ३१ – प्रचेतांना श्रीनारदांचा उपदेश आणि त्यांना परमपदाचा लाभ
स्कन्ध ५ – अध्याय १ – प्रियव्रतचरित्र
स्कन्ध ५ – अध्याय २ – आग्नीध्रचरित्र
स्कन्ध ५ – अध्याय ३ – नाभिराजाचे चरित्र
स्कन्ध ५ – अध्याय ४ – ऋषभदेवांचे राज्यशासन
स्कन्ध ५ – अध्याय ५ – ऋषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूतवृत्ती धारण करणे
स्कन्ध ५ – अध्याय ६ – ऋषभदेवांचा देहत्याग
स्कन्ध ५ – अध्याय ७ – भरताचे चरित्र
स्कन्ध ५ – अध्याय ८ – भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म
स्कन्ध ५ – अध्याय ९ – भरताचा ब्राह्मणकुळात जन्म
स्कन्ध ५ – अध्याय १० – जडभरत व राजा रहूगणाची भेट
स्कन्ध ५ – अध्याय ११ – राजा रहूगणाला भरताचा उपदेश
स्कन्ध ५ – अध्याय १२ – रहूगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान
स्कन्ध ५ – अध्याय १३ – संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रहूगणाची संशयनिवृत्ती
स्कन्ध ५ – अध्याय १४ – संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण
स्कन्ध ५ – अध्याय १५ – भरताच्या वंशाचे वर्णन
स्कन्ध ५ – अध्याय १६ – भुवनकोशाचे वर्णन
स्कन्ध ५ – अध्याय १७ – गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवांची स्तुती
स्कन्ध ५ – अध्याय १८ – भिन्न – भिन्न वर्षांचे वर्णन
स्कन्ध ५ – अध्याय १९ – किंपुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन
स्कन्ध ५ – अध्याय २० – अन्य सहा द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन
स्कन्ध ५ – अध्याय २१ – सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन
स्कन्ध ५ – अध्याय २२ – भिन्न – भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन
स्कन्ध ५ – अध्याय २३ – शिशुमारचक्राचे वर्णन
स्कन्ध ५ – अध्याय २४ – राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन
स्कन्ध ५ – अध्याय २५ – श्रीसंकर्षणदेवांचे विवरण आणि स्तुती
स्कन्ध ५ – अध्याय २६ – नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन
स्कन्ध ६ – अध्याय १ – अजामिळ उपाख्यानाचा प्रारंभ
स्कन्ध ६ – अध्याय २ – विष्णुदूतांकडून भागवत – धर्म – निरूपण आणि अजामिळाचे परमधामगमन
स्कन्ध ६ – अध्याय ३ – यम आणि यमदूतांचा संवाद
स्कन्ध ६ – अध्याय ४ – दक्षाकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव
स्कन्ध ६ – अध्याय ५ – श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप
स्कन्ध ६ – अध्याय ६ – श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप
स्कन्ध ६ – अध्याय ७ – बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरू म्हणून स्वीकार
स्कन्ध ६ – अध्याय ८ – नारायण कवचाचा उपदेश
स्कन्ध ६ – अध्याय ९ – विश्वरूपाचा वध, वृत्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषींकडे जाणे
स्कन्ध ६ – अध्याय १० – दधीची ऋषींच्या अस्थींपासून देवांकडून वज्र – निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण
स्कन्ध ६ – अध्याय ११ – वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत्प्राप्ती
स्कन्ध ६ – अध्याय १२ – वृत्रासुराचा वध
स्कन्ध ६ – अध्याय १३ – इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण
स्कन्ध ६ – अध्याय १४ – वृत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र
स्कन्ध ६ – अध्याय १५ – चित्रकेतूला अंगिरा आणि नारदांचा उपदेश
स्कन्ध ६ – अध्याय १६ – चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन
स्कन्ध ६ – अध्याय १७ – चित्रकेतूला पार्वतीदेवींचा शाप
स्कन्ध ६ – अध्याय १८ – अदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरूद्गणांच्या उत्पत्तीचे कारण
स्कन्ध ६ – अध्याय १९ – पुंसवन व्रताचा विधी
स्कन्ध ७ – अध्याय १ – नारद – युधिष्ठिर संवाद आणि जय – विजयाची कथा
स्कन्ध ७ – अध्याय २ – हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकशिपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन
स्कन्ध ७ – अध्याय ३ – हिरण्यकशिपूची तपश्चर्या आणि वरप्राप्ती
स्कन्ध ७ – अध्याय ४ – हिरण्यकशिपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन
स्कन्ध ७ – अध्याय ५ – हिरण्यकशिपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न
स्कन्ध ७ – अध्याय ६ – प्रल्हादाचा असूर बालकांना उपदेश
स्कन्ध ७ – अध्याय ७ – मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदांच्या उपदेशाचे प्रल्हादाकडून वर्णन
स्कन्ध ७ – अध्याय ८ – भगवान नृसिंहांचा अवतार, हिरण्यकशिपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती
स्कन्ध ७ – अध्याय ९ – प्रल्हादाने केलेली भगवान नृसिंहांची स्तुती
स्कन्ध ७ – अध्याय १० – प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुरदहनाची कथा
स्कन्ध ७ – अध्याय ११ – मानवधर्म, वर्णधर्म आणि स्त्रीधर्माचे निरुपण
स्कन्ध ७ – अध्याय १२ – ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम
स्कन्ध ७ – अध्याय १३ – यतिधर्माचे निरुपण आणि अवधूत – प्रल्हाद संवाद
स्कन्ध ७ – अध्याय १४ – गृहस्थाचे सदाचार
स्कन्ध ७ – अध्याय १५ – गृहस्थांसाठी मोक्षधर्मांचे वर्णन
स्कन्ध ८ – अध्याय १ – मन्वंतरांचे वर्णन
स्कन्ध ८ – अध्याय २ – मगराने गजेंद्राला पकडणे
स्कन्ध ८ – अध्याय ३ – गजेंद्राकडून भगवंतांची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे
स्कन्ध ८ – अध्याय ४ – हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार
स्कन्ध ८ – अध्याय ५ – देवांचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवंतांची स्तुती
स्कन्ध ८ – अध्याय ६ – देव आणि दैत्य यांचे मिळून समुद्रमंथन
स्कन्ध ८ – अध्याय ७ – समुद्रमंथनाला प्रारंभ आणि शंकरांचे विषपान
स्कन्ध ८ – अध्याय ८ – समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंतांचे मोहिनी अवतार धारण करणे
स्कन्ध ८ – अध्याय ९ – मोहिनीरूपी भगवंतांकडून अमृताचे वाटप
स्कन्ध ८ – अध्याय १० – देवासुरसंग्राम
स्कन्ध ८ – अध्याय ११ – देवासुरसंग्रामाची समाप्ती
स्कन्ध ८ – अध्याय १२ – मोहिनीरूपाने महादेवांना मोहिनी
स्कन्ध ८ – अध्याय १३ – आगामी सात मन्वंतरांचे वर्णन
स्कन्ध ८ – अध्याय १४ – मनू इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण
स्कन्ध ८ – अध्याय १५ – बळीराजाचा स्वर्गावर विजय
स्कन्ध ८ – अध्याय १६ – कश्यपांकडून अदितीला पयोव्रताचा उपदेश
स्कन्ध ८ – अध्याय १७ – भगवंतांचे प्रगट होऊन अदितीला वर देणे
स्कन्ध ८ – अध्याय १८ – भगवान वामनांचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन
स्कन्ध ८ – अध्याय १९ – भगवान वामनांचे बलीकडून तीन पावले जमीन मागणे, बलीचे वचन देणे आणि शुक्राचार्यांनी त्याला अडविणे
स्कन्ध ८ – अध्याय २० – भगवान वामनांच्या विराट रूपाने दोनच पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापणे
स्कन्ध ८ – अध्याय २१ – बलीचे बंधन
स्कन्ध ८ – अध्याय २२ – बलीकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचे त्याच्यावर प्रसन्न होणे
स्कन्ध ८ – अध्याय २३ – बलीचे बंधनातून सुटून सुतललोकात जाणे
स्कन्ध ८ – अध्याय २४ – मस्त्यावताराची कथा
स्कन्ध ९ – अध्याय १ – वैवस्तव मनुचा पुत्र सुद्युम्नाची कथा
स्कन्ध ९ – अध्याय २ – पृषध्र इत्यादि मनूच्या पाच पुत्रांचा वंश
स्कन्ध ९ – अध्याय ३ – महर्षी च्यवन आणि सुकन्येचे चरित्र व शर्यातीचा वंश
स्कन्ध ९ – अध्याय ४ – नाभाग आणि अंबरीषाची कथा
स्कन्ध ९ – अध्याय ५ – दुर्वासांची दुःखनिवृत्ती
स्कन्ध ९ – अध्याय ६ – इक्ष्वाकू वंशाचे वर्णन, मान्धाता आणि सौभरी ऋषींची कथा
स्कन्ध ९ – अध्याय ७ – राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा
स्कन्ध ९ – अध्याय ८ – सगरचरित्र
स्कन्ध ९ – अध्याय ९ – भगीरथचरित्र आणि गंगावतरण
स्कन्ध ९ – अध्याय १० – भगवान श्रीरामांच्या लीलांचे वर्णन
स्कन्ध ९ – अध्याय ११ – भगवान श्रीरामांच्या अन्य लीलांचे वर्णन
स्कन्ध ९ – अध्याय १२ – इक्ष्वाकुवंशाच्या अन्य राजांचे वर्णन
स्कन्ध ९ – अध्याय १३ – निमीच्या वंशाचे वर्णन
स्कन्ध ९ – अध्याय १४ – चंद्रवंशाचे वर्णन
स्कन्ध ९ – अध्याय १५ – ऋचीक, जमदग्नी आणि परशुराम यांचे चरित्र
स्कन्ध ९ – अध्याय १६ – परशुरामांकडून क्षत्रियांचा संहार आणि विश्वामित्रांच्या वंशाची कथा
स्कन्ध ९ – अध्याय १७ – क्षत्रवृद्ध, रजी इत्यादी राजांच्या वंशांचे वर्णन
स्कन्ध ९ – अध्याय १८ – ययाति चरित्र
स्कन्ध ९ – अध्याय १९ – ययातीचा गृहत्याग
स्कन्ध ९ – अध्याय २० – पुरुचा वंश, राजा दुष्यंत आणि भरताच्या चरित्राचे वर्णन
स्कन्ध ९ – अध्याय २१ – भरतवंशाचे वर्णन, राजा रंतिदेवाची कथा
स्कन्ध ९ – अध्याय २२ – पांचाल, कौरव आणि मगधदेशीय राजांच्या वंशांचे वर्णन
स्कन्ध ९ – अध्याय २३ – अनू, द्रुह्यू, तुर्वसू आणि यदुच्या वंशाचे वर्णन
स्कन्ध ९ – अध्याय २४ – अविदर्भाच्या वंशाचे वर्णन
स्कन्ध १० – अध्याय १ – भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन, वसुदेव – देवकीविवाह आणि कंसाकडून देवकीपुत्रांची हत्या
स्कन्ध १० – अध्याय २ – भगवंतांचा गर्भ प्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती
स्कन्ध १० – अध्याय ३ – भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव
स्कन्ध १० – अध्याय ४ – कंसाच्या हातून सुटून योगमायेचे आकाशात जाऊन भविष्यकथन
स्कन्ध १० – अध्याय ५ – गोकुळात भगवंतांचा जन्म महोत्सव
स्कन्ध १० – अध्याय ६ – पूतना उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ७ – छकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ८ – नामकरण संस्कार आणि बाललीला
स्कन्ध १० – अध्याय ९ – श्रीकृष्णाला उखळाला बांधणे
स्कन्ध १० – अध्याय १० – यमलार्जुनांचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ११ – यमलार्जुनांचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय १२ – अघासुराचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय १३ – ब्रह्मदेवांचा मोह आणि त्याचा निरास
स्कन्ध १० – अध्याय १४ – ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती
स्कन्ध १० – अध्याय १५ – धेनकसुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव
स्कन्ध १० – अध्याय १६ – कालियावर कृपा
स्कन्ध १० – अध्याय १७ – कालियाची कथा आणि गोपांचा दावानलापासून बचाव
स्कन्ध १० – अध्याय १८ – प्रलंबासुर उद्धार
स्कन्ध १० – अध्याय १९ – गाई आणि गोपांचा वणव्यातून बचाव
स्कन्ध १० – अध्याय २० – वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन
स्कन्ध १० – अध्याय २१ – वेणुगीत
स्कन्ध १० – अध्याय २२ – वस्त्रहरण
स्कन्ध १० – अध्याय २३ – यज्ञपत्न्यांवर कृपा
स्कन्ध १० – अध्याय २४ – इंद्रयज्ञ निवारण
स्कन्ध १० – अध्याय २५ – गोवर्धन धारण
स्कन्ध १० – अध्याय २६ – श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदांशी वार्तालाप
स्कन्ध १० – अध्याय २७ – श्रीकृष्णांना अभिषेक
स्कन्ध १० – अध्याय २८ – नंदांना वरुणलोकातून सोडवून आणणे
स्कन्ध १० – अध्याय २९ – रासलीलेचा प्रारंभ
स्कन्ध १० – अध्याय ३० – श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था
स्कन्ध १० – अध्याय ३१ – गोपीगीत
स्कन्ध १० – अध्याय ३२ – भगवंतांकडून गोपींचे सांत्वन
स्कन्ध १० – अध्याय ३३ – महारास
स्कन्ध १० – अध्याय ३४ – सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ३५ – युगलगीत
स्कन्ध १० – अध्याय ३६ – अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला व्रजात पाठविणे
स्कन्ध १० – अध्याय ३७ – केशी आणि व्योमासुर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती
स्कन्ध १० – अध्याय ३८ – अक्रूराचे व्रजगमन
स्कन्ध १० – अध्याय ३९ – श्रीकृष्ण – बलरामांचे मथुरागमन
स्कन्ध १० – अध्याय ४० – अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती
स्कन्ध १० – अध्याय ४१ – श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश
स्कन्ध १० – अध्याय ४२ – कुब्जेवर कृपा, धनुष्यभंग आणि कंसाची भीती
स्कन्ध १० – अध्याय ४३ – कुवलयापीडाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश
स्कन्ध १० – अध्याय ४४ – चाणूर, मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा व कंसाचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ४५ – श्रीकृष्ण – बलरामांचे उपनयन आणि गुरुकुलप्रवेश
स्कन्ध १० – अध्याय ४६ – उद्धवाचे व्रजगमन
स्कन्ध १० – अध्याय ४७ – उद्धव व गोपिंचा संवाद आणि भ्रमरगीत
स्कन्ध १० – अध्याय ४८ – भगवंतांचे कुब्जा आणि अक्रूराच्या घरी जाणे
स्कन्ध १० – अध्याय ४९ – अक्रूराचे हस्तिनापुरला गमन
स्कन्ध १० – अध्याय ५० – जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती
स्कन्ध १० – अध्याय ५१ – कालयवनाचे भस्म व मुचुकुंदाची कथा
स्कन्ध १० – अध्याय ५२ – द्वारकागमन, बलरामांचा विवाह व श्रीकृष्णांकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे
स्कन्ध १० – अध्याय ५३ – रुक्मिणीहरण
स्कन्ध १० – अध्याय ५४ – शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव व श्रीकृष्ण – रुक्मिणी विवाह
स्कन्ध १० – अध्याय ५५ – प्रद्युन्माचा जन्म आणि शंबरासुराचा वध
स्कन्ध १० – अध्याय ५६ – स्यमंतक मण्याची कथा, जांबवती आणि सत्यभामा ह्यांच्याशी श्रीकृष्णांचा विवाह
स्कन्ध १० – अध्याय ५७ – स्यमंतक हरण, शतधन्व्याचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा द्वारकेत बोलावणे
स्कन्ध १० – अध्याय ५८ – भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा
स्कन्ध १० – अध्याय ५९ – भौमासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंतांबरोबर विवाह
स्कन्ध १० – अध्याय ६० – श्रीकृष्ण – रुक्मिणी संवाद
स्कन्ध १० – अध्याय ६१ – भगवंतांच्या संततीचे वर्णन व अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मीला मारणे
स्कन्ध १० – अध्याय ६२ – उषा – अनिरुद्ध मिलन
स्कन्ध १० – अध्याय ६३ – श्रीकृष्णांबरोबर बाणासुराचे युद्ध
स्कन्ध १० – अध्याय ६४ – नृग राजाची कथा
स्कन्ध १० – अध्याय ६५ – श्रीबलरामांचे व्रजाकडे जाणे
स्कन्ध १० – अध्याय ६६ – पौंड्रक आणि काशिराजाचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ६७ – द्विविदाचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ६८ – कौरवांवर बलरामांचा कोप आणि सांबाचा विवाह
स्कन्ध १० – अध्याय ६९ – देवर्षी नारदांनी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहाणे
स्कन्ध १० – अध्याय ७० – भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या आणि जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताचे त्यांच्याकडे येणे
स्कन्ध १० – अध्याय ७१ – श्रीकृष्णांचे इंद्रप्रस्थाला जाणे
स्कन्ध १० – अध्याय ७२ – पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ७३ – जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंतांचे इंद्रप्रस्थाला परतणे
स्कन्ध १० – अध्याय ७४ – भगवंतांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ७५ – राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान
स्कन्ध १० – अध्याय ७६ – शाल्वाबरोबर यादवांचे युद्ध
स्कन्ध १० – अध्याय ७७ – शाल्वाचा उद्धार
स्कन्ध १० – अध्याय ७८ – दंतवक्त्र आणि विदूरथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून सूताचा वध
स्कन्ध १० – अध्याय ७९ – बल्वलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा
स्कन्ध १० – अध्याय ८० – सुदाम्याचे श्रीकृष्णांकडून स्वागत
स्कन्ध १० – अध्याय ८१ – सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती
स्कन्ध १० – अध्याय ८२ – श्रीकृष्ण – बलरामांशी गोप – गोपींची भेट
स्कन्ध १० – अध्याय ८३ – भगवंतांच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद
स्कन्ध १० – अध्याय ८४ – वसुदेवांचा यज्ञोत्सव
स्कन्ध १० – अध्याय ८५ – श्रीभगवंतांचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश व देवकीच्या सहा पुत्रांना परत आणणे
स्कन्ध १० – अध्याय ८६ – सुभद्राहरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंतांचे एकाच वेळी जाणे
स्कन्ध १० – अध्याय ८७ – वेदस्तुती
स्कन्ध १० – अध्याय ८८ – शिवांचे संकटमोचन
स्कन्ध १० – अध्याय ८९ – भृगूकडून तीन देवांची परीक्षा व मेलेल्या ब्राह्मणबालकांना भगवंतांनी परत आणणे
स्कन्ध १० – अध्याय ९० – भगवान कृष्णांच्या लीलाविहाराचे वर्णन
स्कन्ध ११ – अध्याय १ – यदुवंशाला ऋषींचा शाप
स्कन्ध ११ – अध्याय २ – श्रीनारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व नऊ योगीश्वरांचा संवाद ऐकविणे
स्कन्ध ११ – अध्याय ३ – माया, माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्म आणि कर्मयोगाचे निरूपण
स्कन्ध ११ – अध्याय ४ – भगवंतांच्या अवतारांचे वर्णन
स्कन्ध ११ – अध्याय ५ – भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंतांच्या पूजाविधीचे वर्णन
स्कन्ध ११ – अध्याय ६ – भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांची प्रार्थना व
प्रभासक्षेत्री जाण्याची यादव तयारी करीत असलेले पाहून उद्धवांचे भगवंतांकडे येणे
स्कन्ध ११ – अध्याय ७ – अवधूतोपाख्यान – पृथ्वी ते कबूतर या आठ गुरुंची कथा
स्कन्ध ११ – अध्याय ८ – अवधूतोपाख्यान – अजगर ते पिंगलेपर्यंत नऊ गुरुंची कथा
स्कन्ध ११ – अध्याय ९ – अवधूतोपाख्यान – कुरर ते भुंगा अशा सात गुरुंची कथा
स्कन्ध ११ – अध्याय १० – इहलौकिक व पारलौकिक भोगांच्या असारतेचे निरुपण
स्कन्ध ११ – अध्याय ११ – बद्ध, मुक्त आणि भक्तजन यांची लक्षणे
स्कन्ध ११ – अध्याय १२ – सत्संगाचा महिमा आणि कर्मानुष्ठान व कर्मत्यागाची रीत
स्कन्ध ११ – अध्याय १३ – हंसरुपाने सनक इत्यादींना दिलेल्या उपदेशाचे वर्णन
स्कन्ध ११ – अध्याय १४ – भक्तियोगाचा महिमा व ध्यानविधी
स्कन्ध ११ – अध्याय १५ – भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि लक्षणे
स्कन्ध ११ – अध्याय १६ – भगवंतांच्या विभूतींचे वर्णन
स्कन्ध ११ – अध्याय १७ – वर्णाश्रम धर्म निरुपण
स्कन्ध ११ – अध्याय १८ – वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे धर्म
स्कन्ध ११ – अध्याय १९ – ज्ञान, भक्ती आणि यमनियमादि साधनांचे वर्णन
स्कन्ध ११ – अध्याय २० – ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग
स्कन्ध ११ – अध्याय २१ – गुणदोषव्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य
स्कन्ध ११ – अध्याय २२ – तत्त्वांची संख्या आणि पुरुषप्रकृतिविवेक
स्कन्ध ११ – अध्याय २३ – एका तितिक्षू ब्राह्मणाचा इतिहास
स्कन्ध ११ – अध्याय २४ – सांख्ययोग
स्कन्ध ११ – अध्याय २५ – तिन्ही गुणांच्या वृत्तींचे निरूपण
स्कन्ध ११ – अध्याय २६ – पुरूरव्याची वैराग्योक्ती
स्कन्ध ११ – अध्याय २७ – क्रियायोगाचे वर्णन
स्कन्ध ११ – अध्याय २८ – परमार्थनिरूपण
स्कन्ध ११ – अध्याय २९ – भागवत धर्मांचे निरूपण आणि उद्धवाचे बदरिकाश्रमाला जाणे
स्कन्ध ११ – अध्याय ३० – यदुकुळाचा संहार
स्कन्ध ११ – अध्याय ३१ – श्रीभगवंतांचे स्वधामगमन
स्कन्ध १२ – अध्याय १ – कलियुगातील राजवंशांचे वर्णन
स्कन्ध १२ – अध्याय २ – कलियुगाचे धर्म
स्कन्ध १२ – अध्याय ३ – राजांचे वर्तन आणि कलियुगाच्या दोषांपासून वाचण्याचा उपाय – नामसंकीर्तन
स्कन्ध १२ – अध्याय ४ – चार प्रकारचे प्रलय
स्कन्ध १२ – अध्याय ५ – श्रीशुकदेवांनी केलेला अंतिम उपदेश
स्कन्ध १२ – अध्याय ६ – परीक्षिताची परमगती, जनमेजयाचे सर्पसत्र आणि वेदांचे शाखाभेद
स्कन्ध १२ – अध्याय ७ – अथर्ववेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे
स्कन्ध १२ – अध्याय ८ – मार्कंडेयाची तपश्चर्या आणि वरप्राप्ती
स्कन्ध १२ – अध्याय ९ – मार्कंडेयाला मायेचे दर्शन
स्कन्ध १२ – अध्याय १० – मार्कंडेयाला शंकरांचे वरदान
स्कन्ध १२ – अध्याय ११ – भगवंतांची अंगे, उपांगे आणि आयुधांचे रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन
स्कन्ध १२ – अध्याय १२ – श्रीमद्भागवताची संक्षिप्त विषय सूची
स्कन्ध १२ – अध्याय १३ – विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमदभागवताचा महिमा
श्रीस्कान्दे माहात्म्यम् – अध्याय १ – परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट, शांडिल्यमुनींच्या मुखातून
भगवंतांच्या लीलांचे रहस्य आणि वज्रभूमीच्या महत्त्वाचे वर्णन
श्रीस्कान्दे माहात्म्यम् – अध्याय २ – यमुना आणि श्रीकृष्णपत्न्यांचा संवाद, किर्तनोत्सवामध्ये उद्धवांचे प्रगट होणे
श्रीस्कान्दे माहात्म्यम् – अध्याय ३ – श्रीमद्भागवताची परंपरा आणि त्याचे माहात्म्य, भागवतश्रवणाने श्रोत्यांना भगवद्धामाची प्राप्ती
श्रीस्कान्दे माहात्म्यम् – अध्याय ४ – श्रीमद्भागवताचे स्वरूप, प्रमाण, श्रोता – वक्त्यांची लक्षणे श्रवणविधी आणि माहात्म्य
