सार्थ अभंग क्र. १, समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथे माझे आर्त नको देवा ॥धृपद॥
ब्रम्हादिक पदे दुःखाची शिराणी । तेथे दुश्चिंत झणी जडो देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

Sant Tukaram Abhang Sartha Gatha

संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा

अभंग क्र. १
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथे माझे आर्त नको देवा ॥धृपद॥ ब्रम्हादिक पदे दुःखाची शिराणी । तेथे दुश्चिंत झणी जडो देसी ॥२॥ तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥



अर्थ

हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्‍या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो. ॥१॥ आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका. ॥२॥ हे देवा ब्रह्मादिक पदे व या सारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शीराणीचा आहे. ॥३॥ तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे ॥४॥

Sant Tukaram Abhang Sartha Gatha

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading