ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग २, (५ ते ८)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


       राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! ऊर्मिला !!!

!!!  उर्मिला  !!

                     भाग – ५.

        सीता वरवर जरी शांत वाटत असली तरी,तीने उर्मिलेचा हात घट्ट पकडून ठेवला होता.तेवढ्यात रावण उठला.स्वयंवरात आगंतुक असला तरी इतरांना त्याचं आगमन आवडले नव्हते तरी राजशिष्टाचाराला अनुसरुन त्याची हावभगत केली होती.त्याच्या इच्छेनुसार धनुष्याला प्रत्यंचा चढविण्याचा पहिला मान त्याला देण्यात आला.अत्यंत उर्मट पणे पुढे आलेल्या रावणाने राजा जनक व सीतेला नम्रपणे हात जोडून अभिवाद न केले.नंतर  डोळे मिटून नतमस्तक होत मंत्रोच्चार करुं लागला.तो स्वतः कट्टर शिवभक्त असल्यामुळे नक्कीच तो शिवा ची आराधना करीत असावा असे उर्मिले ला वाटले.प्रार्थना होताच,दीर्घ श्वास घेत त्याने धनुष्याला हात घातला पण,धनुष्य तसूभरही हललं नाही.जोर देत वारंवार उचलण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ! त्या वेळी राजसभेतील सर्व राजांपेक्षा तो अधिक बलाढ्य होता.जमीनीवर आडवं ठेवलेलं धनुष्य उचलण्यासाठी रावणा सारखा धिप्पाड राजा गुडघ्यावर बसलेला बघून उर्मिलेला हसू आवरणे कठीण जात होते.तिने सभामंडपांत सर्वी कडे दृष्टी टाकली असतां बहूतांशी सारेच गोंधळलेले दिसले.रामाच्या कपाळावर किचिंत अढी होती.विश्वामित्रांच्या मुखा वर मात्र स्मित होते.लक्ष्मण हसू दाबण्या चा प्रयत्न करीत होता.त्याची हसतमुद्रा बघून त्याची आकर्षकता,स्नेहशितलता, नजरेत भरत होती.उर्मिला एकटक त्याच्याकडे बघत असलेले पाहून मांडवी ने तिला हलकेच धक्का दिल्यावर ती भानावर आली.

         रावण आतां संतापाने खदखदत होता.आटोकाट प्रयत्न करुनही शिव धनुष्य तसूभरही हललं नाही.सुरुवातीला  त्राग्याने सभोवताली नजर फिरवीत जे शब्द उच्चारले होते त्याचा डौल क्षणार्धात कोसळल्याचे लक्षात आले.तो म्हणाला,हे पवित्र शिवधनुष्य जागेवरुनही हलवू शकलो नाही,कदाचित माझ्या शिव भक्तीतच उणीव राहीलं असावं.पण लक्षात ठेवा,हे शिवधनुष्य माझेकडूनच हललं नाही तर कुणाकडूनच हलणार नाही.जनक राजा!अशाने तुझी कन्या जन्मभर अविवाहित राहील.तरी मी दुर्लक्ष करुन विवाह करण्यास तयार आहे

             त्याच्या दर्पोक्तीमुळे उर्मिलेच्या मनी क्षोम उसळला,श्वास घ्यायलाही ती विसरली.आपल्या तातांचा,बहिणीचा उपमर्द करण्याचं धाडस त्याला झालच कसं?या संतप्त विचाराने तिने मातेकडे कटाक्ष टाकला तर,भय चिंतेने  राणीचा चेहरा उतरला तर पिता शांत होते.

           हे लंकेश्वरा!जराही विचलित न होता,राजा जनक म्हणाले,रुद्र धनुष्याला आपण प्रत्यंचा चढवण्यांत अयशस्वी झाल्याने मलाही खेद आहे.आपणही कठोर शिवभक्त आहांत.आतां स्वयंवरा चा पण मागे घेणे केवळ अशक्य आहे. माझी कन्या जन्मभर अविविवाहित राहिल ही चिंता नका बाळगु.तीच्याशी विवाह करणारा पुरुष असामान्य असेल. धनुष्यावर प्रत्यंचा चढविणार्‍या पुरुषाची मी वाट पाहीन.

        जनकराजाचा अहंकार डिवचण्या च्या दृष्टीने त्याने दुसरी कन्या उर्मिलेची मागणी केली.हे पाहून संतापाने लक्ष्मण कांही बोलणार तोच रामांनी त्याला आवर घातला.सीतेकडे बघत रावण म्हणाला,केवळ तुझ्यामुळे झालेला अपमान मी कधीही विसरणार नाही असे म्हणून दाणदाण पाय आपटत त्याने सभा त्याग केला.बलाढ्य रावणाचा पराभव पाहून,मग पुढे येण्याचे भाडस कोणीही केले नाही.पराभव मान्य करत बरेचसे राजे निघून गेले.

         उरलेल्या राजांना आसन ग्रहण करण्याची विनंती करत,राजा जनक म्हणाले,आपण पुन्हा सुरुवात करु या.

उपस्थितांपैकी जवळ जवळ ३० राजे, राजपुत्रांनी प्रयास केला,पण धनुष्य हलले नाही.अपमानित व पराभूत होऊन प्रत्येकजणं जागेवर बसला.राजसभेतील वातावरण तापूं लागले.उद्वेग आणि संताप आवरत नव्हता.त्वेषाने प्रश्न केला गेला.या अशक्यप्राय पणाने सीता मिळत नसेल तर तुझी दुसरी कन्या किंवा पुतणी शी विवाह करण्यास तयार आहोत.असा  अशक्यप्राय पण ठेवून आमची क्षमता, स्वाभिमान,आदर या सर्वांचा अपमान करण्यास निमंत्रित केले कां?आपल्या पित्याची अगतिक अवस्था बघून स्वतः साठी व बहिणींसाठी आपणच लढावे हा विचार मनांत येतो तोच संतप्त लक्ष्मण सभेस सन्मुख होऊन धारदार आवाजांत गरजला,राजकन्यांचा अपमान करण्याचा परवाणा तुम्हाला कोणी दिला?

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि. १५-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                  भाग – ६.

          लक्ष्मण पुढे म्हणाला,या स्वयंवर मंडपांत अजून एक उपवर पुरुष हजर आहे.अयोध्यानरेश दशरथांचा जेष्ठ पुत्र राम! राम उठले.विश्वामित्रांना प्रणिपात करुन आशिर्वाद घेतला.जनकांसमोर नत मस्तक होऊन अनुमती मागीतली, राणी ला वंदन व राजकन्यांना अभिवादन करुन धनुष्याच्या दिशेने दमदार पावले टाकली.प्रथम धनुष्याला नमस्कार केला व श्रध्दापूर्वक धनुष्याला मध्यभागी पकडून अलगद हाती घेऊन प्रत्यंचा चढवली.आणि धनुष्याचे दोन तुकडे झाले.सभेत आनंद पसरला.राणी सुनयनाने औक्षणचे तबक पुढे केले.राणी च्या सर्व चिंता क्षणांत विरघळल्या.

           सांपडलेल्या मुलीला पक्षपाती वागणूक दिली असा ठपका येऊ नये म्हणून सीतेला अतिशय लाडात वाढवले.

उर्मिलेचा हक्क डावलल्यामुळे सुरवाती ला ती सीतेचा द्वेष करायची,पण सुनयना ने तिला खरे कारण समजावून सांगीत ल्या दिवसांपासून उर्मिलाने आपल्या बालपणाचा कायमचा निरोप घेतला. व सीता स्पर्धक नसून फक्त आणि फक्त बहिण आहे हे जेमतेम ७ वर्षाची असणारी उर्मिला कधीच विसरली नाही.

           सीतेने देखण्या रामाच्या गळ्यात वरमाला घालतांच जयघोष होत असतां, गडगडाटी आवाज करत एक ऋषी प्रवेश दारातून आंत प्रवेश केला.इतक्या लांबूनही उर्मिलेला ऋषींच्या मुखावर प्रचंड संताप पाहून क्षणांत सर्वांना भस्म करतील असे वाटले.एका हातात धनुष्य दुसर्‍या हातात परजलेला परशू हे रुप बघून सारे गर्भगळीत झाले.अत्यंत विनम्र होत,श्रध्दापूर्वक राजा जनक म्हणाले, ऋषीवर परशुराम मी आपले स्वागत करतो.क्षोम पावलेली व्यक्ती परशुराम आहे हे कळतांच उर्मिलेचा धीर सुटला.ते ते चिरंजीव असून त्यांना पराजित करणे केवळ अशक्यच!ते ब्रम्हक्षत्रिय होते. प्रत्यक्ष शिवाने प्रसन्न होऊन परशू प्रदान केला होता.त्यावरुन त्यांना परशुराम या नावाने ओळखल्या जात.कार्तवीर्य अर्जुनाने त्यांचे पिता जमदग्नी मुनींची निर्घूण हत्या केली म्हणून २१ वेळा क्षत्रियांच्या २१ पिढ्यांचा वंशच्छेद केला होता.

         जनकराजाकडे  जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाले,हे शिवधनुष्य कोणी भंग केले?आणि या शिवधनुष्याचे दोन तुकडे? हे मला शिवाकडून प्राप्त झालेले धनुष्य तुझ्या पुर्वजांना सुरक्षित सांभाळण्याची जबाबदारीवर सोपवले होते आणि आज मी काय पाहतो?कोण आहे तो?महामुनी!मी अपराधी आहे. जनक लिनतेने म्हणाले.माझी कन्या सीते  ला योग्य वर मिळण्याच्या हेतूने मी या पवित्र शिवधनुष्याचा उपयोग केला.परंतु हा पण पूर्ण करण्यात कुणालाही यश मिळालं नाही.महापराक्रमी रावणसुध्दा पराजित झाला.अयोध्येचा राजपुत्र रामा ने हा पण जिंकला.मुनीवर!सीता लहान असतांना,जीथे हे धनुष्य उचलायला शेकडो लोकांची मदत घ्यावी लागते,तेच धनुष्य सीतेने एका हाताने लिलया उचलले होते.तो प्रसंग शुभशकुन मानुन धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याचा पण स्वयंवरासाठी ठेवला.

        तेवढ्यात लक्ष्मण पुढे येऊन ऋषीं समोर नतमस्तक होत म्हणाला,तो असामान्य पुरुष माझा जेष्ठ भ्राता राम आहे.जे धनुष्य इतरांना तसूभरही हलवतां आले नाही ते एकट्या रामाने सहज उचललं,मात्र प्रत्यंंचा चढवतांना त्याचे दोन तुकडे झाले.कदाचित ते जीर्ण एवढं ऐकताच ऋषींचा संताप पराकोटीला गेला.आपल्या परशुवर पकड घट्ट केल्याची उर्मिलाने बघितले. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन,या मंगल प्रसंगी रक्तपात होण्याची शक्यता, व लक्ष्मणाचा शिरच्छेद करण्यासही हे संतप्त ऋषी मागेपुढे पाहणार नाही..ती स्वस्थ बसू शकत नव्हती.अनामिक भया ने उर्मिलेच्या मनांत ठाण मांडलं.या जीवन मरणाच्या क्षणी लक्ष्मणावर असलेल्या प्रेमाची तिला जाणीव झाली. ती मनांतून कितीही घाबरलेली असली तरी प्रेमासाठी ती ठामपणे परशुरामां समोर हात जोडून प्रणाम करीत म्हणाली मुनीवर आपल्या आगमनाने आम्हा सर्वां ना शुभाशीष प्राप्त झाले.कृपया आसन ग्रहण करावे.आणि खाली वाकून चरण स्पर्श केला.अनाहुतपणे आशिर्शाद दिला अखंड सौभाग्यवती भव! आशिर्वादाचा अर्थ लक्षात आल्यावर ऋषीचा क्रोध आणि पाजळलेला परशू पासून लक्ष्मण वाचला.

          लक्ष्मणाला ऋषी म्हणाले,या पवित्र धनुष्याचा उल्लेख तू निर्बुध्दपणे कसा करुं धजावलास?माझ्या या परशूने क्षणांत तुझं मस्तक धडावेगळं….आणि परशू लक्ष्मणावर उगारला,पण तेवढ्यात उर्मिलेला दिलेल्या आशिर्वादाची आठवण झाली.तेवढ्यात राम पुढे येत म्हणाले, हे महामुनी!तुमच्या क्रोधाचे कारण मी आहे.माझ्या निष्काळजीने हे धनुष्य भंंग झाले,पण त्याचवेळी मी पण जिंकला.क्षमा करावी.तेवढ्यात विश्वामित्र समोर येऊन म्हणाले, हे पौत्रा! तूं किर्तीवंत आहे.माझ्या बहिणीचा पुत्र माझा भाचा जमदग्नीच्या वधाचा सूड घेण्यासाठी तूं सर्व क्षत्रियांचा नाश केला आणि त्या कृतीच्या परिमार्जनार्थ तपस्या केलीस.या तरुण राजपुत्रांचा वध करुन काय मिळवणार? आवर स्वतःला…

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
              दि.  १५-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                    भाग – ७.

         दोन्ही हात जोडून परशुराम म्हणाले,मातामह!या राजपुत्रांना तुम्ही दैवीबल आणि आदिबल ही दिव्यास्र शिकवलीत.तत्वज्ञान आणि धर्माचं प्रगत ज्ञान दिलं.ताटका आणि सुबाहू सारख्या क्रूर राक्षसांचा विनाश यांच्या हातून घडविला.तुमचं त्यांना अभय आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर खरेच राम सर्वश्रेष्ठ आणि धनुष्यभंग करण्याइतपत अद्वितिय आहे तर,माझे पिता जमदग्नी ना प्रत्यक्ष ळिष्णूंनी दिलेल्या विष्णूंच्या धनुष्याला प्रत्यंचा चढविण्याचं आव्हान मी रामाला देतो.ही त्याची बलाची आणि कौशल्याची परीक्षा असेल.वास्तुशिल्प आकाराला आणणार्‍या विश्वकर्माने दोन हुबेहुब धनुष्याची जोडी निर्माण केली होती.त्यापैकी एक त्याने शिवाला व दुसरं विष्णुला दिलं होत.

          मुनीवर आपले आव्हान स्विकारार्य आहे.आणि रामाने त्यांच्या हातातील धनुष्य घेऊन,त्यावर प्रत्यंचा चढवली व त्यांच्या ह्रदयाचा नेम धरुन विचारले,सांगा आतां काय करु?हा बाण तुमचा प्राण घेऊ शकतो.परशुराम स्तब्ध! नतमस्तक होत गुडघ्यावर बसून त्यांनी रामाला प्रणाम केला.संताप जाऊन चेहर्‍यावर नम्रता व भक्तीभाव आला. तुम्ही कोण आहात समजलं प्रभू.तुम्ही माझे उत्तराधिकारी  आहात.आजवरची माझी सारी तपस्या तुम्हाला अर्पन करुन पुन्हा महेंद्र पर्वतावर जाऊन तपश्चर्येला सुरुवात करतो.तुमच्या बाणाने माझ्या आजवरच्या तपःशक्तीचा वेध घ्या.माझं तपःसामर्थ्य तुम्हाला प्राप्त होवो असं म्हणत त्यांनी रामाला भक्तीभावाने प्रदक्षिणा घातली व आले तसे निघून गेले

रामाने आकाशाच्या दिशेने बाण सोडला. ढग इतस्ततः विखुरले.विजांचा कडकडाट झाला.

           हे दृष्य पाहून सर्व उपस्थित निःस्तब्ध झालेत.स्वतःला सावरत जनक राजाने राम-सीतेच्या विवाहाची घोषणा केली.सर्वत्र आनंद पसरला.नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून उर्मिला अजून सावरली नव्हती.लक्ष्मणाचा जीव वाचव ण्याच्या नादात तिच्या भावना उघड झाल्या होत्या.एकमेकांना वाटणार्‍या प्रेमाचं प्रदर्शन झालं होतं.अबोलपणे हे नातं त्यांनी स्विकारलं होतं.

         जनकराजांनी ताबडतोब अयोध्येत दूत पाठवला.आणि विश्वामित्र आणि मिथिलेचे राजगुरु शतानंद यांनी मिळून विवाहाचा उत्तर फाल्गुन नक्षत्राचा सुमुहुर्त निश्चित केला.जेमतेम पंधरवाडा हाती होता.

             सीता दुखावल्या स्वरांत उर्मिलेला म्हणाली,तू लक्ष्मणावर अनुरक्त आहेस हे कां लपवलेस?मी रामांबद्दल भरभरुन बोलत होते आणि तूऽऽ? नाही गं!तसं कांहीच नाही.मलाच खात्री नव्हती.ठीक आहे.बरं तातांना सांगु का मी?तुझा विरह होणार म्हणून मी फार दुःखी होते.आतां दोघीही एकत्रीत राहिलो की,यापेक्षा दुसरा आनंद कोणता असेल?उर्मिलेला सीतेला नाराज कराय ची इच्छा नव्हती.लक्ष्मणाच्या मनात काय आहे हे कुठे तिला माहित होते?राम आणि लक्ष्मणाच्या स्वभावांत किती फरक आहे?राम सौम्य,मैत्रीपूर्ण वागणारा तर लक्ष्मण आढ्यतेखोर,उर्मिला आक्रमक,तर सीता सौम्य याच अहंकारामुळे दोघांनीही आपापले प्रेम व्यक्त केले नव्हते.

          लक्ष्मण असं कां वागत होते?त्यांच्या नजरेतील वाचलेले भाव चुकीचे होते का?अशा व्यक्तीच्या प्रेमात पडलीच कशी?त्यांच प्रेम तरी आहे ना?तसं नसतं तर स्वयंवरदिनीची त्यांची ती नजर? रावणाने केलेला अपमान,त्यावेळचा संताप?तसेच इतर राजपुत्रांनी तीची इच्छा व्यक्त केली तेव्हाही मदतीला धावून आले..हे प्रेम नव्हते का?कां ते मनाविरुध्द प्रेमात पडले?

           दुसर्‍या दिवशी सकाळी सीता, मांडवी व श्रुती मंदिरांत गेल्या.उर्मिलेला उशीर झाल्याने ती लगबगीने उपवनाच्या दाट झाडीपर्यंत आली तोच तिला सीता येतांना दिसली.दूरुन राम लक्ष्मण!अचानक लक्ष्मण थबकले आणि इशार्‍या ने रामालाही थांबायला सांगून त्यांच्या दिशेने येणार्‍या सीतेच्या ह्रदयाचा वेध घेऊन बाण सोडला.हे बघून उर्मिला जागीच स्तब्ध झाली.संताप,भीती आणि शोकामुळे तोंडातून शब्द निघाला नाही. छातीतून निघणार्‍या रक्तस्रावाला कसंबसं दाबून धरत सीता खाली कोसळली.हे बघतांच उर्मिला किंचाळत तिच्या दिशेने धावली,तोच लक्ष्म

णाने तिला थांबायला सांगीतले,पण त्यांच्या कडे दुर्लक्ष करुन,जखमी सीतेच्या दिशेने  धावत निघाली असतां,लक्ष्मणाचा विळखा तिच्याभोवती पडला.चिडून म्हणाले,ऐकू येत नाही?जाऊ नको म्हटल्यावर?रक्ताच्या थारोळ्यात पडले ल्या सीतेला बघून अत्यंत तिरस्काराने म्हणाली,असं कां केले?कां सीतेला ठार केलेत?काय बिघडवलं होतं तिने तुमचे?

                   क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि.  १६-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!
                     भाग – ८.

           आणि अचानक उर्मिलेला लक्ष्मणाच्या कमरेला लटकवलेला खंजिर दिसला.तो काढून त्यांचेवर वार करण्यास सुरुवात करणार त्यापूर्वीच लक्ष्मणाने तिचे मनगट आवळले की,हातातील खंजिर गळून पडला.तिने जळजळीत नजरेने त्यांचेकडे बघीतले.तिला खुप जोराने ओरडावेसे वाटत होते,पण कंठच शुष्क झाला.डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

             अतिशय हळुवारपणे लक्ष्मण म्हणाले,चल तुला खरा प्रकार दाखवतो  असे म्हणून उर्मिलेला घेऊन लक्ष्मण सीते जवळ घेऊन गेले.सांग तू कोण आहेस? उत्तर देण्याऐवजी तिला हसलेले बघून, तात्काळ लक्ष्मणाने तिच्या पाठीत बाण मारला.ती जोरांत कळवळून ओरडली. तेवढ्यात सीता,मांडवी,श्रुती येतांना दिसल्या.लक्ष्मणाने पुढे येण्यापासून सर्वांना थांबवले.समोर घडलेली घटना बघून राम दिग्मुढ झालेत.सीतेचे रुप धारण केलेल्या त्या मरणोन्मुख व्यक्ती कडे सर्वजण आवाक होऊन पाहत असतांनाच तो मुळ रुपात आला.तेवढ्या त रक्षकांसह राजा जनक येऊन पोहोचले   

त्याला ओळखून जनक म्हणाले….

        अरेऽ हा तर बाणासूर राक्षस!मी सीतेचे स्वयंवर करुं नये असा निरोप याने धाडला होता.काल परत विवाह करु नये म्हणून निरोप आला होता.मी पोकळ धमकी समजून दुर्लक्ष केले.इथे येण्याचे साहस करेल असे वाटले नव्हते.बोलणे सुरु असतांनाच,बाणासुराने सर्वाचे लक्ष चुकवून दाट झाडीत झेप घेतली.त्याला पलायण कां करु दिलेस?संबंधीत व्यक्ती ला सांगावे म्हणून…कांही व्यक्तींना मात्र त्यांचा आरोप उर्मिलेला जाणवला.ती धुसमसत लक्ष्मण गेल्या दिशेने पाहू लागली.त्यांच्या मिठीचा उबदार स्पर्श, त्यातून जाणवलेली आश्वासकता,तिच्या नावाचा अपभ्रंश करुन,मिला म्हणून मारलेली हाक…या सर्वांचा अर्थ काय होता?काय सांगू पाहत होते?आपण बहिणीसाठी त्यांना ठार मारायला तयार होती,त्यांच्या ऐवजी तिने बहिणीची निवड केली असे तर त्यांना सुचवायचे नव्हते ना?

           या घटनेनंतर सहा दिवसांनी जनकराजांनी पाठवलेला दूत निरोप घेऊन आला.चारही कन्यांसह सत्वर बोलावल्याचा…यात कांहीच वावगं नव्हत.राजसभेत निर्णय घेतांना जनक राजा नेहमीच आपली पत्नी,कन्या, धाकटा भाऊ,पुतण्याशी चर्चा करीत असे परंपरेने चालत आलेल्या या पध्दतीचा प्रत्येक जण सन्मान राखत असे.

           राम-सीतेच्या होणार्‍या विवाहा बद्दल राजा दशरथाने आनंद व्यक्त करुन इतर तीन पुत्रांसाठी तिन्ही मुलींचा हात मागीतला.अयोध्येचे चारही राजपुत्र शौर्य, बुध्दीमान,दयाळू विशेष म्हणजे इतरांचा आदर करणारे असल्यामुळे आपल्या तिन्ही कन्यांच्या संमतीने जनकराजाने स्विकृती दिली.दोन्ही राज्यांत प्रजाजनां च्या उत्साहाला उधाण आले.

             पित्याच्या सांगण्यानुसार विवाहापूर्वी विश्वामित्रांचा आशिर्वाद घेण्यास त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्या. ते उर्मिलाला मिष्कीलपणे म्हणाले,तू ज्या पध्दतीने परशुरामांकडून आशिर्वाद प्राप्त केलास,ते लक्षात घेता मला अगदी तोलून मापून शब्द उच्चारावे लागेल.तूं अतिशय शूर आहेस.तू जी इच्छा करशील ते प्राप्त करण्याचे धैर्य तुझ्यात आहे.तरीसुध्दा एक लक्षात ठेव,पुढचा प्रवास सोपा नसेल.चौघीं बहीणीमधे तूं सर्वाधिक खंबीर आहेस,तू जे पेरशील ते प्राप्त न होता,तुला जे प्राप्त होईल तेच तूं पेरशील.उर्मिलेला त्यांचे बोलणे उमगले नाही.तेच पुढे  म्हणाले,मी मिथिलेत एका विशिष्ट उद्देशाने आलोय!अयोध्येच्या चार राजपुत्रांशी तुम्हा चौघां बहिणींचा विवाह व्हावा या माझ्या योजनेमागे योग्य कारण आहे.वेळ आली की,कळेलच.त्यांच्या गुढ बोलण्याने उर्मिलेला वाटले,काळ आणि दैवाऐवजी घटनाक्रमच त्यांच्या हातात असावा.हा त्यांचा आशिर्वाद की,पुढे घडू पाहणार्‍या घटनांची नांदी?

          उर्मिला अंधश्रध्दाळू किंवा रुढी परंपरेवर अनाठायी विश्वास ठेवणारी नव्हती.तत्वज्ञानाची चांगली जाण होती तीला.मनांत आले संतप्त देवाला प्रसन्न करण्यासाठी एखादा यज्ञ करावा का? तिचे मन वाचल्यागत विश्वामित्र म्हणाले, बाळा,तुझे मन यज्ञकांडात रमणार नाही, पण धर्मही कधी सोडणार नाहीस.स्वतः ची नातीगोती तू कशी जपतेस,कर्म कशी पार पाडतेस यावर तुझं पुढचं जीवन अवलंबून आहे.शेवटी एकच सांगतो, तुझ्यामुळे सर्वांना सौख्य आनंद मिळून तुझ्या प्रेमाचा विजय होईल.हे बोलतांना त्यांच्या डोळ्यात दुःखद छटा चमकून गेली.त्यांना आपल्या गमावलेल्या प्रेमाची आठवण झाली असेल कां?

                   क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि.  १६-१-२०२२.

ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading