महाराणी पद्मिनी चरित्र भाग ७, (२६ ते २९)

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

22

!!! महाराणी पद्मिनी !!!

                      भाग – २२.

         गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.रतनसिंहाचा मित्र व हितचिंतक म्हणून संकटकाळी कटु असला तरी योग्य सल्ला देणे माझे कर्तव्य आहे.

           सुजानसिंगजी शांत व्हा! रतन सिंह म्हणाले,डोक्यावर संकटाचे ढग गरगरत असतांना आपसात दुही माजवणे योग्य नाही.गोराकाकांना म्हणाले,काका,तुम्ही चितोडचे महासेना पती म्हणून तुमची जबाबदारी जास्त आहे.सर्वांना बरोबर घेऊन चलायचेआहे काका,सुजानसिंगवर शंका घेणे रास्त नाही.क्षमा महाराज!सुजानसिंगजी क्षमा करा.काका आपल्या बोलण्याने खरोखर च दुखावल्या गेलो.तरी मी स्वतःच्या अपमान,अहंकारापेक्षा चितोडची सुरक्षा महत्वाची समजतो.तेव्हा विसरण्याचा प्रयत्न करीन.काका,घाईगर्दीने व आततायीपणाने प्रश्न सुटत नाहीत.शत्रूचे अफाट बळ आणि त्याची रणनीती जाणून घेण्यासाठी योग्य पावले उचलावे लागतील.राणाजींच्या चेहर्‍यावर दुःख आणि अवमानाच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या.मला विचार करायला थोडा अवधी हवा.गोराकाका म्हणाले,पण अनाठायी संयम कदाचित आपल्यासाठी घातक ठरणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. सभा विसर्जित झाली.

             रात्री महाराणी पद्मिनींचा स्फटिकमहाल गंभीर होता,एक अनाम शांतता पसरली होती.पद्मिनींच्या कक्षात राणाजी व पद्मिनी आपपल्या विचारांत दोघेही दंग,होते.विलक्षण गंभीर,मनात विचित्रसी अस्वस्थता,असंख्य विचार, अनंत ताण,अनावर भावना घेऊन दोघेही गप्प बसले होते,काय बोलावे,कसं सांगावं सुचत नसल्यामुळे एकमेकांची नजर चुकवित होते.

        अखेर शांततेचा भंग करत राणाजी म्हणाले,महाराणी कांही महत्वाचे बोलायचे आहे.तुम्हाला माहित आहेच, दिल्लीच्या बादशहाने चितोडपासून भिलवाडाजवळ तळ ठोकला आहे. आम्ही मोठ्या संभ्रमांत आहोत.तुमच्या शी चर्चा झाल्याशिवाय निर्माण झालेला गुंता सुटायचा नाही. महाराज! उत्तरे स्पष्ट असतांना संभ्रम असण्याचा प्रश्नच येत नाही.दोन देशांच्या राजकारणांत महाराणींचा थेट संबंध येण्याचा प्रश्नच नाही.राजकिय मैत्रीसाठी,मसलतीसाठी दोन राजे भेटतात.चर्चा होते.भेटीत ठरलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करतात,तेव्हा त्या देशाच्या महाराणीचा कसलाही सहभाग नसावा.महाराणी कालपर्यंत आमचेही हेच मत होते. बादशहाने तुमच्या भेटीची इच्छा व्यक्त केल्यावर आमचा संताप पराकोटीला गेला होता.आम्ही फक्त त्वरेने प्रतिक्रीया दिली नाही.सर्वांगीन विचार करतां, चितोडच्या सुरक्षेसाठी आपण थोडे नमते घेतले तर….?

        म्हणजेऽऽ ? महाराणींचा स्वर उंचावला,शरीर ताठरले,संताप उमटला, चेहर्‍यावर अविश्वासाचे भाव पसरले. महाराजऽ.. आम्ही त्याची भेट घ्यावी असे तर सुचवायचे नाही ना?कदापी शक्य नाही…महाराणी!बादशहाने मैत्री चा हात पुढे केला आहे.तुमच्या कृृतृत्वाने प्रभावित होऊन तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली.आमच्याशी मैत्रीचे व तुमच्याशी बहिणीचे स्वच्छ नाते त्याला निर्माण करायचे असेल तर हरकत काय आहे?

         महाराज! त्याचा आजवरचा इतिहास पाहतां,त्याच्या बोलण्या वागण्यात जमीन अस्मानचे अंतर आहे. आम्हाला त्याचा विश्वास नाही.महाराणी आपण याअधी महाराज हमीरदेव, गुजरातचे करणदेव यांना भेटलात ना? महाराज! ते सारे राजपूत राजे असून आपले लोक,आपल्यासारख्या स्वच्छ व सरळ मनाचे सुसंस्कारी लोक आहेत. बादशहाचे कुटील वर्तन सार्‍या जगाला माहित आहे.पद्मिनीऽऽ महाराज व्यथित स्वरात म्हणाले,बादशहाची भेट घेण्यास आपणाला विनंती करणे आम्हालाही चांगले वाटत नाही,पण त्याने पुढे केलेला मैत्रीचा हात आपण स्विकारला नाही तर, चितोडगड युध्दाच्या आगीत होरपळून जाईल.आपल्या ताकदीच्या मानाने अल्लाउद्दीनचे संकट फार अवाढव्य आहे चितोडचा घास घेणे त्याला बिलकुल कठीण नाही.त्याने आधिच आपल्याला येणार्‍या मदतीचे सर्व मार्ग रोखून कोंडी केलेली आहे.त्याने मुक्कामाचा मार्ग विचारपूर्वक निवडला आहे.त्याच्याशी मुकाबला केल्याशिवाय आपले मित्रराजे मदतीस येऊ शकतील हे शक्य दिसत नाही.आपल्याला कुठलीही मदत,रसद मिळूं शकणार नाही याची त्याने योग्य काळजी घेतली आहे.

              क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

               दि.  २७-१-२०२२.

23

!!! महाराणी पद्मिनी !!!

                     भाग – २३.

        राणाजी पुढे म्हणाले, प्रजेला हवं असते, अन्न,वस्र,निवारा आणि सुरक्षा! ह्या मिळाल्या नाही तर कांही काळ राजाच्या किंवा राज्याच्या प्रेमाखातर दुःख सोसतील,पण अधिक काळ नाही. त्यातून मग स्वार्थ साधण्यासाठी फंद फितूरीचे मार्ग शोधल्या जातात आणि आतूनच पोखरलेला देशाचा सर्वनाश व्हायला वेळ लागत नाही.पद्मिनींच्या डोळ्यात पाणी तरळले.

           महाराज! हजारो स्रीयांना जनान खाण्यात डांबणारा तो नीच सुलतान बहिणीच्या पवित्र नात्याने कुणा स्रीकडे पाहूं शकतो यावर आमचा तरी विश्वास नाही.महाराज! आजवर आम्हाला आमच्या सौंदर्याचा फार अभिमान होता, आज त्याच सौंदर्याची आम्हाला शरम वाटत आहे.याच सौंदर्यामुळे आज सारं चितोड संकटात सांपडलं आहे.हा एक अभिशाप आहे याची जाणीव प्रथमच आम्हाला होत आहे,

           नाही पद्मिनी! त्यांच्या डोळ्या तील अलगद अश्रू पुसत राणाजी म्हणाले

 तुमचं अजोड सौंदर्य शाप नसून परमेश्वराने बहाल केलेली देणगी आहे, तिचा असा अपमान नका करुं.असं अद्वितीय सौंदर्य आणि तशीच अजोड बुध्दीमत्ता एकाच ठीकाणी असलेले तुमच्यासारखे स्रीरत्न ईश्वराला सुध्दा परत बनवता येणार नाही.तुमचे अश्रू आम्हाला कमजोर बनवतात.

           महाराज मनाचा खेळ मोठा विचित्र आहे.ज्याच्यावर आम्ही विसंबून जगायचं तोच महापराक्रमी पती..तोच रक्षणकर्ता आम्हाला शत्रूची तेही स्रीलंपट अशा शत्रूची भेट घेण्यास सांगतोय हे अजूनही मनाला पटत नाही.गैरसमज नसावा महाराणी!तुमच्यावरचे आमचे प्रेम तुम्ही जाणता.कठीण प्रसंगी महा पराक्रमी पांडवानांही शस्रत्याग करावा लागला होता.भरसभेत पत्नीचे वस्रहरण सोसण्याची नामुष्की स्विकारावी लागली होती.याचा अर्थ त्यांचे महाराणी द्रौपदी वर प्रेम नव्हते,किंवा त्यांचा पराक्रम त्यांना सोडून गेला होता असं नव्हे.परंतु त्यांची ती वेळ नव्हती.योग्य वेळ आल्या वर पांडवांनी द्रोपदीच्या अपमानाचा बदला घेतला तसेच आम्ही घेऊ हे एका राजपूत राजाचे वचन आहे.

           पद्मिनी, आपल्या विवाहप्रसंगी  तुमचे पिताश्री,महाराज गंधर्वसेनांनी आमची परीक्षा घेतांना एक प्रश्न विचार ला होता…राजाचे वैयक्तिक सुख, अहंभाव आणि प्रजेचे कल्याण यात निवड करण्याची वेळआल्यास कोणता निर्णय घ्याल?महाराणी! राजा म्हणजे देशाचे मन,प्रजा म्हणजे देशाचे ह्रदय आणि देश म्हणजे देह!मग देशाच्या हिता साठी प्रजेच्या कल्याणासाठी राजाने वैयक्तिक भावना बाजूला ठेवायला नको कां? पद्मिनी, स्री म्हणजे पुरुषाचा मानबिंदू आणि तुम्ही तर चितोडसारख्या श्रेष्ठ देशाच्या महाराणी आहांत आणि हे महाराणी पद तुम्हाला सहजी प्राप्त झालेले नाही.अनेक ज्ञात अज्ञात आणि छुप्या आणि उघड विरोधानंतर मिळवलं आहे.आणि तुम्ही या पदाला योग्य आहात हे सिध्दही केले आहे.बुध्दी कौशल्याने सर्व घर एकत्र केलं,सारं चितोड नव्याने घडवलय,सार्‍या राजपुतान्यात तुमच्याबद्दल औत्सीकता आहे.रावणाच्या लंकेची ही राजकन्या आहे तरी कशी याची उत्सुकता प्रत्येका ला आहे.तर मग तुमची कीर्ती बादशहा च्या कानी गेली असेल व भेटीची उत्सुकता निर्माण झाली असेल तर त्यात काय वावगे?

आज आपण अल्लाउद्दीनच्या दुष्ट विळख्यात सांपडलो आहोत,केवळ तुमच्या भेटीने प्रसन्न होऊन,चालता झाला,निघून गेला तर अस्मानी संकट टळेलही..आणि तसे झाले नाही तर..? तर.. तर..आपल्याला थोडा अवधी मिळेल.अपूर्‍या संरक्षण व्यवस्थेत युध्दाला सामोरे जाणे म्हणजे आत्मघात ठरेल.पद्मिनी,कदाचित भेटीमुळे संकट टळले जरी नाही तरी युध्द पुढे ढकलल्या जाईल व आपल्याला तयारीला वेळ मिळेल.ठीक आहे..चितोडची सुरक्षा व सुखासाठी आमच्या मनाविरुध्द कां होईना तुमचे ऐकेन…पण एक अट आहे.  मी सुलतानला प्रत्यक्ष न भेटता स्फटिक महालाच्या सरोवरात माझे पडणारे प्रतिबिंब त्याला पहायला मिळेल.माझ्या प्रत्यक्ष भेटीची कामना त्याने स्वप्नातही करुं नये.अट एकदम मान्य!ही अट त्याला मान्य नसेल मीही सहन करणार नाही.भगवान एकलिंगजीचं स्मरण करुन प्रत्येक चितोडवासी युध्दाला बाहेर पडेल.

        राणाजींनी आपल्या प्रिय पत्निला बाहुत घेतले.पद्मिनींनी मान त्यांच्या खांद्यावर टेकवली.पद्मिनी तुझे मन कळते गऽ पण राजाला स्वतःची सुख दुःख,अहंकार देश आणि प्रजेच्या सुरक्षा सुखापेक्षा मोठं नाही.श्रीरामाचा आदर्श सांगणार्‍या सिंहलद्वीपची मी कन्या आहे. तुमच्या प्रजेशी गुंतलेल्या निष्ठा आणि प्रेम जाणते व त्याचा अभिमान पण आहे तरीही मन भयग्रस्त आहे.

                 क्रमश
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

                दि. २७-१-२०२२.

24

!!!  महाराणी पद्मिनी !!!

                       भाग – २४.

           पद्मिनी तुमच्या रुकाराने आमचे मनोबल वाढले.खिलजी सारख्या बलाढ्य शत्रूशी मैत्री करुन जर संकट टळणार असेल तर…त्याला भेटून त्याने दिल्लीला जाण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न…. महाराज खिलजी अत्यंत घातकी,पाताळयंत्री आणि दुष्ट आहे. जे पाऊल उचलाल ते विचार करुनच..सारे ठीक होईल.चिंता करुं नका.राणाजींनी त्यांना हलकेच झोपवले शाॅल  त्यांच्या अंगावर पांघरली.मायेनं त्यांच्या मस्तका वरा हात फिरवला.लगेच त्या झोपेच्या अधिन झाल्या, पण राणाजींचे सैरावैरा धावणारे अस्वस्थ मन त्यांना झोपू देईना.

            माझ्यावरच्या विश्वासाने किती पटकन झोपी गेली माझी पद्मिनी!आपला पती कोणतेही संकट निभावून नेईल हा दुर्दम्य विश्वास तिच्या मनी आहे. खरच का भोवती गरगरत असलेल्या दुष्ट सावल्यांपासून तिचे रक्षण करुं शकेल? जमेल मला? मंद तेवणार्‍या ज्योतीला हात जोडत राणाजी म्हणाले,हे दीपमाते, अग्निरेखे, येऊ घातलल्या संकटापासून माझ्या पत्नीला,चितोडला वाचवण्याचा मला मार्ग दाखव!

          दुसर्‍या दिवशी राजमातेने आपल्या कक्षात दोघांना बोलावून म्हणाल्या, जे ऐकले ते खरे कां?रावळ राजवंशातले पराक्रमी पुरुष घरातील स्रीयांच्या आड लपून राजकारण करायला कधीपासून शिकले?आणि पद्मिनीऽ तुम्हालाही हे मान्य आहे?पद्मिनी कोणतीही गलत गोष्ट सहन करण्याचा तुमचा स्वभाव नाही.अन्याय सहन करणे तुम्हाला जमत नाही.तरीही तुम्ही मान्य केले? कां? कुठे गेला तुमचा पराक्रम? तुमचे तेज? स्वतःबद्दलचा ठाम विश्वास?नागमती उसळून म्हणाल्या, महाराज त्याचा भलताच हट्ट मान्य करतात आणि तुम्हीही ते दिव्य करायला तयार होता? कां?पद्मिनींचे डोळे भरुन आले.

          माते, चितोडच्या कल्याणाकरितां ही विनंती महाराणींना आम्ही केली.राणा म्हणाले,चितोडचा आत्मघात टाळण्या साठी येऊ घातलेलं संकट दूर सारण्या साठी,निदान कांही काळ पुढे ढकलले जावे यासाठी हे पाऊल उचलले.मी जे करतोय ते योग्य की, अयोग्य हे काळच ठरवेल.माझ्या बुध्दीला जे पटले ते महारानींना सुचवले.या मार्गाने जर हजारो घरांचे सुख नष्ट करणारे,लाखो वीरांना मृत्युच्या दाढेत लोटणारे,असंख्य स्रीयांचे सौभाग्य लुटणारे आणि अगनित बालकांना अनाथ करणारे सर्वनाशी युध्द चितोडच्या महाराणीच्या अस्पष्ट दर्शनाने जर टळत असेल तर गैर आहे असे वाटत नाही.राजकारण भावनेवर चालत नाही. जगाच्या कल्याणासाठी खोटे बोलावे लागले तर दोष लागत नाही हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी सांगीतलं.स्वसुखापेक्षा प्रजेचे हित,सुख अधिक श्रेष्ठ हे श्रीरामां नी स्वतःच्या उदाहरणाने सिध्द केले आहे माते,मी एवढा थोर नाही,पण प्रजेवर नितांत पुत्रवत प्रेम आहे.माझ्या पत्नीच्या प्रतिबिंबाच्या दर्शनाने जर माझा चितोड वर येऊ घातलेलं संकट टळत असेल तर.

           पद्मिनींच्या डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहत होत्या.राजमाता, मी फक्त पतीच्या आज्ञेचे पालन करीत आहे. त्या दुष्टाला मी प्रत्यक्ष भेटणार नाहीय! माझे नखही त्याला दिसणार नाही.माझ्या प्रतिबिंबाची छाया फक्त तो पाहूं शकेल. पतीच्या आज्ञेने चितोडसाठी हे दिव्य करायला तयार झाले.राणा म्हणाले, पद्मिनी त्यांच्या स्फटिकमहालाच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या मार्गातील आरशासमोर उभ्या राहतील,त्यांचे प्रतिबिंब सरोवरातील पाण्यात प्रतिबिंबित होईल, त्याच प्रतिबिंबाचे दर्शन खिलजी घेईल तेही कांही क्षणच… खिलजीने मान वर करुन पाहण्याचा अस्पष्टसा जरी प्रयत्न केला तरी त्याच क्षणी त्याचे मस्तक धडावेगळे होईल. कदाचित त्याने तसा प्रयत्न केलाच तरीही त्याला महाराणीचे दर्शन अशक्य आहे.कारण महाराणी जिथे उभ्या असणार ती जागा सर्व बाजुंनी बांधीव दगडांनी बांधलेली आहे.

         एक निःशब्द शांतता कितीतरी वेळ तिथे वेढून राहिली.एकाच घरातील प्रेमाणे जोडलेली ती चारही माणस एकमेकांच्या जवळ असूनही कितीतरी दूर होते.

             ठरल्याप्रमाणे पद्मिनींच्या दर्शना साठी हपापलेल्या सुलतानाने सगळ्या अटी मान्य केल्या. फक्त २५ सैन्यासह त्याने चितोडगडात प्रवेश करण्याचे ठरले दिवस वेळ ठरला.निवडक सैन्यासह अल्लाउद्दीन येणार्‍या पालखीच्या स्वागतासाठी अमात्य सुजानसिंह गडाच्या पायथ्याशी उभे होते.

               क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

              दि.  २७-१-२०२२.

25

!!! महाराणी पद्मिनी !!!

                   भाग – २५.

           अटीप्रमाणे पालखी बदलल्या गेली.खिलजी ज्या पालखीतून आला ती पालखी जागीच थांबवली गेली.ही पालखी चितोडचे चार कलंदर वाहत होते खिलजीबरोबर सामान्य सेवाकाच्या वेषात त्याचा सेनापती महमंद काफूर पालखीबरोबर येत होता.त्याने स्वतः निवडलेले अत्यंत विश्वासू व पराक्रमी सेनाप्रमुखांच्या पथकातील मोजक्या सशस्र सैनिकासह त्याच्या पालखीमागे चालत होते.सर्वजन गडाचे निरिक्षण अगदी बारकाईने करीत होते.खिलाजीं ची पालखी आत शिरली की,एक  एक दार बंद होत मोठमोठ्या लोखंडी अडण्या सरकावल्या जात होत्या.गड अत्यंत मजबूत,प्रवेशद्वारापासून हे सात सुरक्षा दरवाजे तोडणे कठीणच!दहा हत्तींनी टक्कर दिली तरी एकही दरवाजाला धक्काही लागणार नाही.चारही बाजूने उभे असलेले सैनिक भर उन्हातही एखाद्या कठोर पुतळ्यासारखे पापणीही न लावतां उभे होते.शत्रूला कळण्यापूर्वीच जीव घेणारे तीक्ष्ण भाले त्या रक्षकांच्या हातात चकाकत होते.

       पालखीत बसून खिलजी बाहेरचे निरिक्षण करीत असतांना मनाशी म्हणाला,ही सुरक्षा व्यवस्था नजरेस दिसणारी,याशिवाय न दिसणारी असंख्य रक्षक असतीलच.खिलजी स्वतःच्या मनाशीच म्हणाला,पण हे राजपूत राजे मनाने सरळ असल्यामुळे दगाफटका करण्याचे त्यांच्या मनांतही येत नाही, म्हणूनच तर यांची उन्नती होत नाही. आमच्या सारखे दूरच्या देशातून येऊन इथे सत्ता काबिज करणे यांना जमत नाही.हे असेच राहणार म्हणूनच तर आम्ही यांचेवर सहजपणे विजय मिळवू शकतो.

            खिलजीने मागे बघितले,काफूर चे लक्ष त्याच्याकडेच होते.काफूरच्यामागे येणार्‍या पथकातील कांही सशस्र सैन्य मधेच गायब झाल्याच्या कुणाच्या लक्षात ही आले नाही.योजनेप्रमाणे गडाला वळसा घालून खिलजीची पालखी रावळ महालात आली.सुजानसिंहासोबत खिलजी रावळमहालातील विषेश कक्षात पोहोचला.राणा रतनसिंग प्रतिक्षेतच होते राणाजींनी त्याचे स्वागत करुन विशेष आमंत्रिकांसाठी जवळच असलेल्या सुवर्णासनाकडे संकेत केला.आपको मिलकर बहोत खुशी हुयी राजेसाब असे म्हणून गळाभेटीस्तव खिलजीने हात पसरले.प्रसन्न हसत राणाजजींनी दोन्ही हात जोडत नमस्कार करीत म्हणाले, मोठ्या व्यक्तींना आदर दाखवण्याची आमची हीच पध्दत आहे.आपल्या आसनावर स्थानापन्न होत खिलजीने काफूरकडे नजर टाकली.सुलतानला किंचितही दगा फटका होऊ नये यासाठी

तलवारीवरील हात घट्ट करुन सावधपणे उभा होता.खिलजी कक्ष न्याहाळीत होता अत्यंत मौल्यवान स्फटिकपाषाणाच्या गुळगुळीत भिंतीवर सुवर्णाचे कोरीव काम,उत्कट रत्ने,माणके जडवून कलाकुसर केली होती.ही सर्व सजावट पाहून चितोडला भेट देणारा कोणीही पाहुणा या वैभवाने भारावून जाईल.

        सहजासहजी न दिसणार्‍या अत्यंत सुक्ष्म नलिका कक्षाच्या सर्व बाजूंनी धावत होत्या.खिलजीची नजर त्याकडे गेलेली पाहतांच,राणाजींनी सेवकास इशारा केला.त्याने एक कळ दाबतांच नाजूक तुषारांचा हलकासा शिडकाव होऊन सारा कमरा सुगंधाने भरुन गेला. वाऽऽ वाऽऽ !अति सुंदर! सुलतानसाब, इथली प्रत्येक वास्तू वास्तूतज्ञांच्या कौशल्याने जेवढी नटली आहे,तेवढीच कुणाला कळणार नाही अशा प्रकारे सुरक्षित पण आहे.राणाजींनी टाळी वाजववी व पुढच्याच क्षणी दोन भाले, तीन बाण खिलजीच्या आसनापुढे येऊन थांबले.खिलजी दचकला.मलिक काफूर तलवार उपसून धावला.राणा म्हणाले,ही शस्रे कुठुन आली,याचा उगम कुठे आहे हे शोधूनही सांपडणार नाही.आपल्याला फक्त इथल्या सुरक्षाव्यवस्थेची झलक दाखवली.दिलेले मैत्रीचे वचन आम्ही विसरलो नाही.खिलजी मनात म्हणाला, ह्या सगळ्या वैभवाबरोबर चितोडची सुंदर राणीही माझी व्हायलाच हवी!

         राणाजींनी उत्कृष्ट हिरेजडीत तलवार देऊन खिलजीचा सत्कार केला. राणाजी, चितोडगडमधील मोठा मिनार बघण्याची इच्छा आहे.जरुर!नको असलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणे राणाजींना जड जात होते.खिलजीला विशेष रस नव्हता.ज्यासाठी त्याने एवढा अट्टाहास केला, त्या पद्मिनीच्या दर्शना साठी तो अतिशय उताविळ झाला होता.

हम बहन पद्मिनी राणीसे मिलना चाहते.. अखेर तो क्षण आलाच…

               क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

                  दि.  २८-१-२०२२.

             

 

महाराणी पद्मिनी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading