
युध्दनीती निश्चित झाली.अत्यंत गुप्तपणे लढाईची तयारी सुरु झाली. मलिक काफूरचे गुप्तहेर चितोडगडच्या रस्त्यात पेरल्या गेले.राणा रतनसिंहाच्या राज्याची खडा न् खडा माहिती अल्लाउद्दीन पर्यत पोहचवली जात होती. चितोडला कुठुनही रसद किंवा मदत पुरवल्या जाणार नाही याची काळजी घेतल्या जाणार होती.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
18
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – १८.
युध्दनीती निश्चित झाली.अत्यंत गुप्तपणे लढाईची तयारी सुरु झाली. मलिक काफूरचे गुप्तहेर चितोडगडच्या रस्त्यात पेरल्या गेले.राणा रतनसिंहाच्या राज्याची खडा न् खडा माहिती अल्लाउद्दीन पर्यत पोहचवली जात होती. चितोडला कुठुनही रसद किंवा मदत पुरवल्या जाणार नाही याची काळजी घेतल्या जाणार होती.प्रत्येक दलप्रमुखा ला भरपूर द्रव्य देऊन विश्वासात घेतले होते.कुठल्याही मोहाने,कुणीही सैनिक फितूर होणार नाही,शिवाय शरण आलेल्या शत्रूची गय करायची नाही असा आदेश मलिकला देण्यात आला. अल्लाउद्दीनचे सैन्य लढतील ते त्यांना मिळत असलेल्या धनामुळे,निष्ठेने नाही.
उलट राणांचे सैन्य अखेरच्या क्षणापर्यंत निष्ठेने लढतील.
अल्लाउद्दीनला हार माहित नव्हती.पराभव त्याला सहन होत नव्हता. त्याचा कुणावरही विश्वास नव्हता.योजना बध्द युध्दपध्दती आणि नेमके आयोजन करीत असल्यामुळे तो सतत विजयी ठरत असे.शत्रूला बेसावध गाठून हल्ला करणे त्याचे वैशिष्ट्य होते.त्याला चितोड ची संपूर्ण माहिती कळल्यावर,कागदावर रेखाकृती आखल्या गेली.हमल्याचे नियोजन केले.वेढा कुठे आणि किती अंतरावर बसवायचा निश्चित केले.एका योजनाबध्द युध्दाची आखणी केल्या गेली.राघव चेतन मदतीला होताच.योग्य दिवस पाहून अल्लाउद्दीनची सेना चितोड गडाच्या दिशेने निघाली.
एका मदमस्त हत्तीवर बसून मलिक कपूर सेनेचे नेतृत्व करीत होता. त्याचे अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी सैनिक उमद्या अश्वावर बसून त्याच्या भोवताल होते.सैन्याच्या मध्यभागी एका सजवलेल्या पालखीत चिलखत, शिरस्राण घालून अल्लाउद्दीन बसला होता.पालखीच्या पाठोपाठ सोन्याची अंबारी चढवलेला विशाल हत्ती,ज्यावर बसून अल्लाउद्दीनने अनेक विजय प्राप्त केले होते.तो हत्ती व सुसज्ज असे सहा अरबी घोडे येत होते.त्याला वाटेल तेव्हा तो कधी गजावर तर कधी घोड्यावरुन प्रवास करीत होता.
अल्लाउद्दीनने राघव चेतनला अफाट संपत्ती प्रदान केली होती.अल्लाउ द्दीनच्या मागे राघव उत्कृष्ट सजलेल्या घोड्यावरुन प्रवास करीत होता.एका हिंदु राज्यावर स्वारी करण्यासाठी अफाट सैन्य घेऊन दिल्लीचा बादशहा म्हणवणा र्या एक लंपट सुलतान निघाला होता. कित्येकदा अंधार पडल्यावरही त्याची थकलेली कंटाळलेली सेना निमुटपणे मार्गक्रमण करीत राही.चितोडपासून सुरक्षित अंतरावर मुक्काम टाकल्या गेला अत्यंत मोक्याच्या जागी मजबूत दोरांनी बांधलेली भव्य अशी दोन दालनाचे भव्य निवासस्थान बनवले.चारही बाजूनी विश्वासू आणि पराक्रमी सैन्यप्रमुखांचे तळं होते.मुंगीलाही प्रवेश मिळणार नाही असे सुरक्षाकवच त्याच्या निवासस्थाना भोवती होते.
अल्लाउद्दीनच्या सैन्यात एक हिंदु रामशरण होता.त्याला महाराणी पद्मिनीं ना जिंकण्यासाठी मांडलेले युध्द नकोसं होते.एका स्रीला तिच्या पती,मुलांपासून तोडून स्वतःच्या जनानखान्यात कोंबण्या साठी सुरु केलेला हा खेळ रामशरणला बेचैन करत होता.वास्तविक तो राणा किंवा पद्मिनींना ओळखतही नव्हता.पण स्वतःच्या राज्यात सुखाने राहणार्या, प्रजेवर प्रेम करणार्या राजाशी शत्रृत्व पत्करुन त्याच्या राणीची मागणी करायची,स्वसामर्थ्यावर मोहापायी एका स्रीसाठी समृध्द राज्याचा नाश व्हावा हे त्याला पटत नव्हते.अशा विचारातच त्याने रात्र जागून काढली.ठरले!बेसावध असलेल्या चितोडगडच्या राणाला जागे करायला हवे.रामशरणने तलवार घेऊन बाहेर पडला.पण सजग रखवालदाराच्या जाळ्यात तो अलगद सांपडला.त्याला सुलतानपुढे हजर करण्यात आले.त्याच वेळी सोन्याच्या मोहरांची थैली घेतलला त्याचा विश्वासू मित्र नजरेस पडला.आणि काय घडले हे क्षणार्धात त्याच्या लक्षात आले.कारण त्याच्याजवळ हा बेत बोलला होता.मृत्यु अटळ आहे हे जाणून रामशरणने मनातील बोलण्याचा निश्चय केला.सुलतान साहेब या लढाईचा इरादा नेक नाही.म्हणून मी चितोडच्या राणा रतनसिंहाला सावध करण्यास निघालो होतो.परंतु….पुढच्याच क्षणी रामशरणचे हातपाय बांधून तापलेल्या सळईने प्रथम त्याचे डोळे काढले.अंगाची कातडी सोलली.व मृतप्राय झालेला देह तापल्या वाळूत फेकून दिला.रामशरणचे भयंकर मरण पाहून प्रत्येक सैनिकाचं मन व ह्रदय पिळवटून निघालं.अल्लाउद्दीनला विरोध करुन भयंकर मरण पत्करण्या पेक्षा लढून मरणे अधिक सोपे होतं.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-१-२०२२.
19
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – १९.
एक दिवस एकातांत महाराणी पद्मिनी आणि राणा गप्पा मारीत बसले होते.बाजुला मंचकावर कंवलजित व नागसेन एकमेकांच्या मिठीत शांत, निरागसपणे झोपलेल्या मुलांना कुरवाळी त पद्मिनी म्हणाल्या,अगदी राम लक्ष्मणा सारखे व त्यांची काळजी घेणारा थोरला भाऊ शोभेल असा बादल,यांचे निरतिशय प्रेम बघून मी अतिशय तृप्त झाले.आतां देवाकडे मागण्यासारखं कांही उरलं नाही.
खरं सांगू महाराणी,कित्येकदा मन भयभीत व्हायचे,वाटायचे सातासमुद्रा पार तुम्हाला तुमच्या मातापित्यांपासून एवढ्या दूरवर उचलून आणले,सारे सुख देण्याचे वचने खरी ठरतील की नाही ही धास्ती सतत मनांत असे.राजपूत राजाचे वचन कधी खोटे ठरेल का?पण महाराणी तुम्ही आम्हाला मनापासून साथ दिली. राणी नागमती सारख्या अहंकारी स्री ला जिंकलेस.साक्षात देवी लक्ष्मीच तुमच्या पावलांनी चितोडगडवर अवतरली. चितोडगड समृध्द झाले.तुम्ही आल्या पासून राज्यावर कोणतेही संकट आले नाही.
नाही महाराज याचे सारे श्रेय तुम्हाला आहे.प्रजेला नियोजनाची शिस्त लावल्यामुळे,धनधान्याची योग्यप्रकारे साठवणूक करणे,जलवाहिण्या बनवल्या मुळे स्रीयांचे पाणी भरण्याचे कष्ट कमी झाले.प्रशस्त रस्ते,वृक्ष लागवडीमुळे पांथस्थांची सोय,ठीकठीकाणी पानपोया हे सर्व तुम्ही केल्यामुळे आज चितोडगड वासी आनंदी,समाधानी व सुखी झालेत महाराणी तुमच्यासारखी नव्हे तुम्हीच आम्हाला जन्मोजन्मी पत्नी म्हणून लाभाव्यात.महाराणींचे गाल आरक्त झाले.मी पण ईश्वराकडे हीच प्रार्थना करीत असते.
महाराणी पद्मिनीकडे असंख्य दासदासी होत्या.त्या प्रत्येकाची त्या आस्थेने चौकशी करीत असत.गेल्या दोन दिवसांपासून सुनहरी नांवाची दासी कां आली नाही म्हणून जयंती दासीकडे चौकशी केल्यावर कळले की,सुनहरीचा नवरा अतिशय संशयी असून तिने अर्थाजनासाठी घराबाहेर पडलेले त्याला आवडत नाही.छोट्या छोट्या कारणांवरुन तिला मारझोड करतो.तीला मी बोलावले म्हणून निरोप दे! जयंती निघून गेल्यावर, पद्मिनी स्वतःशीच म्हणाल्या,स्रीयांचे जगणे सुसह्य व्हावे या दृष्टीने कठोर पावले उचलावे लागतील.त्यासाठी साम, दाम,दंड कोणताही उपाय करावा लागले तरी चालेल.
सुनहरी तुझी कांहीही चुक नसतांना कां अन्याय सहन करतेस? तूं तुझ्या पती समोर शांतपणे,पण ठामपणे मत मांडून,तू मिळवलेल्या पैशाने संसारा ला कसा हातभार लागतो हे नीट समजावून सांग.मी तुझ्या पाठीशी आहे. आणि राजमहालात काम करण्याची माझी आज्ञा आहे असेही तुझ्या पतीला सांग.आपण माझ्या पाठीशी आहात याने माझे बळ वाढले.हे सर्व घडत असतां राणी नागमती तिथेच होत्या.म्हणाल्या, पद्मिनी तुमचा पराक्रम,ज्ञान, आणि संयम शिवाय आत्मविश्वास यामुळेच तुमच्या अलौकिक सौंदर्यात भरच पडते.
पद्मिनी म्हणाल्या,चितोडगडाच्या प्रत्येक स्रीमनांत आत्मविश्वास जागवायचाय!आपल्या आजुबाजुचे जग वेगाने बदलत आहे.संकटांची वादळे भोवती घोंगावत आहेत.मुघलांच्या सतत स्वार्यांनी राजपूताना त्रस्त झालाय.आतां स्रीने मान खाली घालून बसण्याचे दिवस सरले.वेळ पडली तर हाती तलवार घेऊन चितोडच्या रणरागिनीने आपल्या पती, पुत्र,भावाच्या खांद्याला खांदा लावून विजेसारख्या लवलवत, तेज तलवारीने शत्रू कापून काढावा,बुरजावरच्या तोफा उडवाव्यात हे धारिष्ट्य त्यांच्या मनांत जागवायला हवे.
कांही दिवसांनी महाराणी पद्मिनी च्या नेतृत्वाखाली चितोडची स्रीसेना उभी राहिली.त्या स्वतः युवतींना तलवालीचे धडे देतच,पण बादल,गोराकाका आणि राणा रतनसिंहही या स्रीसेनाला वेळ देत. नागमतीदेवी या स्रीसेनेच्या प्रमुख होत्या. चितोडच्या अंतर्गत रक्षणाचे कार्य या स्रीसेनेकडे सोपवण्यात गेले.एकदा भगवान एकलिंगजींच्या मंदीरावर चोरांनी छुपा हल्ला करुन लूटु पाहणार्या टोळीला या स्रीसैन्याने चांगलाच धडा शिकवला.
आज महाराणी पद्मिनी सार्या चितोडचा अभिमान आहे.चितोडच्या घरां घरात त्यांची सन्मानाने पुजा केली जाते. खरच किती अल्पावधित सारे घडून आले सिंहलद्वीप वरुन आलेली राजकुमारी, स्वतःच्याच माणसांकडून होणार्या विरोधाने कोमेजल्या,पण न हरता, न थकता त्यांनी स्वतःचे जग बदलून टाकले
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २७-१-२०२५.
20
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – २०.
एका प्रसन्न सायंकाळी महाराणी पद्मिनी विचारांत मग्न असतांना,राणाजी येऊन म्हणाले,एवढ्या प्रसन्न वातावरणा त एवढा कशाचा गहन विचार करताहात मुखावर ही उदासी कां? कांही घडले कां राणाजींच्या हळूवार शब्दांनी महाराणीं च्या डोळ्यात अश्रू तरळले.म्हणाल्या उगाचच मन उदास वाटते,कारण नाही सांगतां येणार,पण कांहीतरी भयंकर घडणार,सुखाचे क्षण लवकरच संपणार, काळोखाच्या अंधार्या पावलांची चाहूल जाणवत आहे.अनाम भवितव्याचे अनावर संकेत मला कां छळताहेत कळत नाही.राणांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला,पण त्यांची अस्वस्थता कमी नाही झाली.
महाराज! आज देवीच्या मंदिरात ती वृध्दा भेटली.वृध्दा?कोण?मी चितोड गडमधे पहिले पाऊल टाकले,त्यावेळी एका वृध्देने मला दर्शन दिले होते त्या वेळी मला साक्षात पद्मावतीदेभीचा भास झाला होता.हे लाल कंगण सौभाग्य राखण्यासाठी सदेव हातात ठेवायला दिले होते.तीच वृध्दा जणूं माझी वाट बघत असल्यासारखी मंदिराच्या पायर्यां वर उभी होती.मला पाहतांच म्हणाली, मुली,कठीण परिक्षेचा समय आला आहे. तुला खंबीरपणे सर्वस्वाने उभे राहायला हवे. काळसर्प सारे सुख गिळून टाकणार आहे.तुला धीराने इतिहास पेलायचाय, धैर्याने स्वतःला घडव!
मी वंदन करायला झुकल्यावर तिनं माझ्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर कांही अननुभुत संवेदना सार्या शरिरात जाग्या झाल्या.प्रकाशाचे अगनित वर्तुळं अंगाअंगात भिनत असल्याचे जाणवले. नेत्र आपोआपच मिटले गेले.डोळे उघडले तेव्हा वृध्दा अदृष्य झाली होती.सगळी कडे शोध घेतला,पण कुठे विरघळली कळलेच नाही.
महाराणी, साक्षात पद्मावतीदेवींनी तुम्हाला नवी शक्ती प्रदान केली.राणीचे मुख तर्जनीने अलगद उचलून राणा म्हणाले,आम्ही असल्यावर,कुठल्याही संकटाची अस्पष्टशी सावली देखील तुम्हाला स्पर्श करणार नाही.संकटाला आमचा मृतदेहच ओलांडून तुमच्यापर्यत यावे लागेल…भयाने थरथरता हात त्यांच्या तोंडावर ठेवून म्हणाल्या, अशा कातरवेळी मृत्युच्या गोष्टी नका हो करुं…
चिंता करुं नका.तुमच्या प्रेमाचे वलय सदैव आमच्याभोवती सुरक्षाकवच म्हणून जोवर आहे,ते भेदून आमचा घात करण्याची कुठल्याही शस्राची प्राज्ञा नाही
रानीमांऽऽ हाक मारत कंवलसेन कक्षात आल्याबरोबर पद्मिनी वात्सल्यात बुडुन गेल्या.मातापुत्राचे ते प्रेमाचे विलोभनीय दृष्य पाहत असतांनाच गोराकाका आंत येऊन म्हणाले,महाराज, अल्लाउद्दीन खिलजीचे दिल्लीहून निघालेले सैन्य भिलवाडाजवळ येऊन पोहचले. खिलजी चा अत्यंत कडवा सेनापती महमंद काफूर करोडोंच्या सैन्याचे नेतृत्व करीत आहे.रणथंम्बोरचा विजय याच्याचमुळे खिलजीला मिळाला.शत्रूगोटात शिरुन भेद काढण्यात त्याचा हातखंडा आहे. गुजरात चढाईच्यावेळी करणसिंग वाघेला च्या प्रधानाला यानेच फितवले होते.
राणाजींनी दीर्घ श्वास घेतला. गोराकाका!चितोडगडाच्या सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त करा.सार्या सैन्यांना ताबडतोब बालावून घ्या.गडावर अन्नधान्य, दारुगोळाचा साठा किती उपलब्ध आहे?किती दिवस पुरेल ही माहिती मला तातडीने द्या.गडाच्याखाली पायथ्याशी असलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवा.ज्यांना कुठेही जाणे शक्य नसेल त्यांची व्यवस्था गडावर करा. राणाजी भराभर सुचना देत होते.कुठल्या ही भुलथापांवर विश्वास न ठेवता, अतिशय जागृत राहायच्या सुचना सर्वाना द्या.महाराज! अल्लाउद्दीनसोबत राघव चेतन असल्याची पक्की खबर आहे.
अल्लाउद्दीनने त्याला भरपूर द्रव्य तर दिलेच,त्याचबरोबर त्याची उत्तम तैनात ठेवली आहे.राघव चेतन,खिलजी च्या गोटातील खास असून त्याचे खाणे पिणे,उठणे,बसणे सर्व त्याच्यासोबत आहे अशी बातमी मिळाली.
अरेरेऽ! एका हिंदु ब्राम्हणाची ही काय अधोगती?ब्राम्हण्याचा लोप करुन त्याने साराच धर्मच नासवला. काका, राघवची अल्लाउद्दीनशी एवढी जवळीक
आपल्याला अतिशय धोकादायक आहे.
चितोडगडपासून इतक्या जवळ पडलेला अल्लाउद्दीनचा तळ नक्कीच सरळ नाही. आपला अत्यंत विश्वासू,ज्याला राघव चेतन ओळखणार नाही,अशा व्यक्तीला खिलजीच्या गोटात धाडून आतली खबर मागवा.
काका, चितोडगडची सुरक्षा व्यवस्था काय आहे?महाराज, चितोडग च्या प्रजेला पूर्ण वर्षभर पुरेल एवढे धान्याची कोठारे भरलेले आहेत.शत्रूला वर्षभर झुलवत ठेवू शकु एवढे तेज शस्रे शस्रागारात आहे.महासेनापती गोरासिंग च्या हाताखाली एक हजार सेनापती, तेवढेच पराक्रमी उपसेनापती,त्यांच्या हाताखाली दहा हजार सेनानायक,प्रत्येक सेनानायकाच्या अधिन दहा हजार अधिपती आहेत.महाराज,हे सर्व सैन्य अत्यंत पराक्रमी,राजाशी व राज्याशी अतिशय निष्ठावंत असून त्यांच्या नेत्याच्या एका शब्दासरशी प्राण पणाला लावायला क्षणभरही कचरणार नाही. गोराकाका निघून गेल्यावर,भावी संकट च्या चाहूलीने अस्वस्थ राणाजींना,पद्मिनीं ना भेटलेल्या वृध्देची आठवण झाली आणि एका निराशेने त्यांचे मन ग्रासले…
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २७-१-२०२२.
21
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – २१.
अमात्य येऊन म्हणाले, महाराज, खिलजीच्या तळावरुन एक दूत आलाय!
त्याला आदरपूर्वक दरबारात हजर करा. राणाजी! हम बादशहाके निकट सलाहाकार दिलावर हुसेन हुॅं।त्याने अतिशय आदराने राणाजींना कुर्निसात केला.चितोडगडमें आपका स्वागत है ।
महाराज! आपकेबारेमें बादशहा को पूरी जानकारी आहे.चितोडबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा आहे.हमें मंजूर हे । विनाकारण तेढ वाढविण्याची आमचीही इच्छा नाही. सुलतानसाबने भेजा प्यारभरा तोहफाचा स्विकार व्हावा.आणि त्याच्या इशार्या नीशी अत्यंत आडदांड दिसणार्या कठोर काळ्या सात सेवकांनी कमरेत वाकून राणाजींना मुजरा केला आणि मखमली कापडांनी झाकलेली तबके राणाजींना पेश केली,सातही सोन्याची तबके सुवर्ण मोहरा,अत्यंत मोल्यवान रत्न,हिरेमाणकां नी अनमोल रत्नांनी भरलेली होती. बादशहांनी ऐवढी तसदी कशाला घेतली त्यांचा मैत्रीचा संदेशच पुरेसा आहे.
महाराज हा प्रेमाचा नजराणा आहे मैत्री पक्की व्हावी या उद्देशाने चितोदगडा वर येऊन आपली प्रत्यक्ष भेट घ्यायची सुलतानाची इच्छा आहे.राणाजी क्षणभर थांबले.मग महासेनापतीकडे बघितले मग अमात्य सुजानसिंगला म्हणाले,दिलावर हुसूनच्या राहण्याची नीट व्यवस्था करा आणि चितोडगडच्या महाराजांच्या मैत्री चा नजराणा घेऊन तुम्ही स्वतः दिलवर हुसेनबरोबर सुलतानाच्या तळावर स्वतः जाऊन,प्रत्यक्ष भेटून त्यांना आमंत्रित करा.दुसर्याच दिवशी अमात्य सुजान सिंग,सुलतान अल्लाउद्दीनच्या भेटीस रवाना झाले.
सुजानसिंगानी आणलेला निरोप ऐकुन राणाजी म्हणाले,नाही..नाही हे कदापी शक्य नाही.एकवेळ राजपूत स्री मरण पत्करेल.पण परपुरुषाच्या सावलीलाही उभी राहणार नाही.महाराणी पद्मिनींची भेट घेण्याचा मनसुबा व्यक्त करतांना त्या बादशहाला शरम कशी वाटली नाही? महाराज, शांत व्हावे! आपल्याला भेटणे हा तो स्वतःचा सन्मान वाटतो म्हणाला. याच भेटीत महाराणी पद्मिनींचीही भेट व्हावी अशि मनिषा त्याने व्यक्त केली इतकेच! महाराणी विषयी त्यांच्या मनात अतिशय औत्सुक्य वाटले.त्याने अनेक प्रश्न मला विचारले, महाराणींच्या रुपागुणांची कीर्ती,त्यांनी निर्माण केलेल्या स्रीसेनेबद्दल ऐकल्याने त्यांच्या दर्शनाची अभिलाषा व्यक्त केली.केवळ बहिण भावाच्या नात्याने भेट व्हावी अशी त्याने विनंती केली.याभेटीनंतर तो इथून निघून जाणार,चितोडशी युध्दाचा कोणताही हेतू नाही.
संतापाने लाल तांबडे होत,महा सेनापती गोराकाका म्हणाले,नाही महाराज,सुलतानचा हेतू ठीक नाही.मैत्री पूर्ण राजकारणात महाराणींचा काय संबंध?त्या कुटील मानसाच्या मनांत वेगळेच कांहीतरी शिजत असावे.एकी कडे शब्दांचे घोडे नाचवतो आणि दुसरी कडे मोठ्या हमल्याची तयारी करीत असेल.त्याला अशी संधी देणे म्हणजे आ बैल मुझे मार” असे होईल.त्यापेक्षा त्याची घृणास्पद योजना अमलांत येण्या आधीच,वाट न बघतां त्याच्या तळावर हमला करु या!एका मुघल सुलतानाने चितोडच्या महाराणीच्या भेटीची इच्छा करणे म्हणजे,महाराणीचा,तुमचा, आणि चितोडचाही अपमान आहे,तो आम्ही कदापिही सहन करणार नाही.
अमात्य सुजानसिंह म्हणाले, मी फक्त सुलतानचीच भेट घेतली नाही तर, मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन, त्याच्या सैन्यतळाचे बारकाईने निरिक्षण केले.महाराज, अल्लाउद्दीनचे सैन्य अफाट आहे.आपले सैन्यबळ त्याच्या एक तृतीयांशही नाही.अत्यंत उत्कृष्ट तोफखाना,दारुगोळा,तलवारी धनुष्यबाण,शस्रे तयार करणारे असंख्य कारागिर अखंडपणे शस्रे बनविण्याचे काम सुरु आहे.तो सैनिकांच्या कुटुंबा साठी भरपूर पैसे देतो.धनाच्या लोभाने सुलतानाशी निष्ठा बाळगून आहे.एखाद्या सैनिकाने जर त्याच्या विरोधात पाऊल उचलले तर त्याला व त्याच्या कुटुंबाला भयंकर शिक्षा भोगावी लागते.त्यामुळे आपल्या प्रियजनांच्या जीवितभयानेही सैन्य त्याच्याशी बांधून राहतात.अमात्य सुजानसिंग म्हणाला, महाराज!मी प्रत्यक्ष अल्लाउद्दीनला भेटलो.त्याच्या बोलण्यात सच्चेपणा वाटला.त्याने स्वतःहून पुढे केलेला मैत्रीचा हात स्विकारायला हरकत नसावी.अन्यथा त्याची वक्र दृष्टी वळली तर सारे चितोड होरपळून जाईल…
सुजानसिंहऽऽऽ संतापाने गोरा काका म्हणाले,तुम्ही काय बोलता, तुम्हाला तरी कळते का?चितोडच्या महाराणीनी त्या मुघल बादशहाची भेट घ्यावी अस सुचवतांना तुम्हाला…की तुम्हालाही त्याने धन देऊन खरीदले?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २७-१-२०२२.


