गोपिकाबाई चरित्र भाग ५, (१७ ते १८)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


           १७२९ सालच्या दिवाळी सणाला शाहुमहाराज फराळासाठी भिकाजी रास्ते सावकारांकडे आले असतां,त्यांना घार्‍या डोळ्याची ५-६ वर्षाची चुणचुणीत मुलीला पाहुन,छत्रपती शाहु महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन,नानासाहेब पेशवेसाठी मागणी घातली……………

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! गोपिकाबाई !!!

!!!  गोपिकाबाई  !!!

भाग – १७.

          गोपिकाबाईंचे सारे बोलणे ऐकुन माधवरावांच्या डोक्यात स्फोट झाला. पुरे करा…खुप ऐकवले..आणखी ऐकवत नाही.त्यांची मजल इतकी पुढे गेली की, तुमच्या लग्नपत्रिका त्यांचे नांवावर?मग काय झाले?त्यांनीच आम्हाला लहानाचे मोठे केले.स्वतःचा जीव संकटात घालुन अनेक विरोध मोडुन काढत आम्हाला वाचवले,शिकवले,तुम्ही नाही.तुम्ही तर गंगापूरी बसुन आमची होणारी परवड, होणारी वाताहत बघत बसल्या.

         नानांनी बाकी सारे शिकवले,पण धनीपण नाही शिकवले.हा डाव लक्षात नाही आला लक्षात?आजीसाहेब! खुप झाले.सारे डाव तुमच्या लक्षात आले ना? तुम्ही काय केले आमच्यासाठी?दुसर्‍याचे उणेदुणे काढणे सोपे असते,पण आपल्या पायी काय जळते हे कोणी बघत नाही.हे कोणी पढविले?कोणी कशास हवे? आम्हाला अक्कल नाही?डोळे नाहीत? मग पाजळा ना तुमची अक्कल.ठीक!मग ऐका!आम्ही सिंह? पेशवे ना आम्ही?थोरले नसलो तरी माधवरावच ना?त्यातुन सवाई मग आम्ही कां भ्यावे?नका भिऊं. सांगा… ऐकतो आहोत आम्ही…

           सदाशिवभाऊंबद्दल नानासाहेबां चे कान कोणी फुंकले?विश्वासरावांस भाऊंचा पायगुंता व्हावा म्हणोन पानिपत वर कोणी धाडले?घरांत बखेडा कोणी माजवला?त्या बखेड्यात तीर्थरुपांनी जीव गमावला तो वेगळा.माधवा!हे तू बोलतोस?तुमचेसाठी आम्ही जोगवा देखील मागीतला.आमच्यासाठी जोगवा? नाही आजीसाहेब!जोगवा मागीतला तो पेशव्यांची अब्रू वेशीवर टांगण्यासाठी. आम्हास मसनदीवर बसवले आणि दुसर्‍याच दिवशी जोगवा बंद!घेतला वसा टाकुन दिला.कसला आला विधीनिषेध?

आमचा विधीनिबंध तुम्ही काढणार?तुम्ही?खरंच पेशव्यांचं कुळ झालं मर्कट आणि कारभारी झाले दरवेशी.शनिवार वाड्यात  ऐषोरामाचे तुकडे फेकले की, झाले संतुष्ट!तुम्हास कशास  हव्यात या पंचायती?तुम्ही तर काशीयात्रासुध्दा केली नाही.चिटकुन राहिलात इथे!आम्ही?हे पेशव्यांचं रक्त बोलतेय?

आजीसाहेssब काय म्हणायचेय तुम्हास आडुन बोलुन नुसत्या शंका कश्याला?कुजबुज कशाला?स्पष्ट ओरडुन सांगा की,आमच्याबद्दल तुमच्या मनी शंका आहे… विस्फारलेल्या डोळ्यांनी आवाक होऊन गोपिकाबाई माधवरावांकडे बघत च राहिल्या.आंधारलेल्या गच्च आभाळा त विजेचा कडकडाट झाला.सारे आसमंत तेजाळुन निघाले आणि त्या भगभगीत भाजल्या गेल्या.मस्तकात एकाएकी स्फोट झाला.क्षणभराने स्वतःला सावरुन म्हणाल्या,आतां आम्ही काय सांगतो ते नीट ऐकुन ठेवा.आमच्या महाप्रस्थानाची वेळ जवळ आली आहे. आमची अंत्यंक्रीया रास्तेमंडळींच्याच हस्ते व्हावी.उत्तम!ठीक!शेवटी माहेरचा मोह संपला नाही तर?जशी आपली मर्जी आम्ही कोण आपले?पेशव्यांशी तर आपले हाडवैरच!होईल आपल्या इच्छे नुसार.आतां रजा घेतो.तब्बेतीस सांभाळावे…येतो आम्ही…

         सवाई माधवराव कधी निघुन गेले, गोपिकाबांईंना समजलेच नाही.ताडताड पावलं टाकीत भणभणत्या डोक्याने वाड्याबाहेर पडलेल्या माधवरावांना समोर पालखीतुन पायउतार होणारे नाना फडणवीस आणि हरिपंत फडके दिसल्या बरोबर धावतच नानांच्या पालखीकडे जाऊन त्यांच्या अंगावर कोसळले.नाना आम्हास एकटे टाकुन कुठे गेला होता? आम्हास कां नाही नेले?नानांनी तोल सावरण्यासाठी माधवरावांना मिठी मारली असतां,माधवरावांच्या गळ्यांतील वैडुर्य रत्नांचीमाळ त्यांना टोचली.त्यांनी माधवरावांच्या चेहर्‍याकडे बघीतले… चेहरा विदिर्ण,तमतमलेला पाहुन,काय झाले श्रीमंत?कांही नाही.प्रस्थानाची तयारी करा…आतांच्या आतां पुण्याकडे निघणे आहे.श्रीमंत!आज संकष्टी..चंद्रोदयानंतर उपास सुटणार.. नाना! आम्ही निघणार,आतांच्या आतां!

जशी श्रीमंतांची मर्जी…

  नानांच्या चेहर्‍यावरचे हास्य बघुन हरिपंत फडक्यांच्या अंगातून शीराशिरी गेली.त्याच वेळी करकरीत तिन्ही सांजेला गंगापूरहुन खाश्यांच्या पालख्या सार्‍या लवाजमासहित पुण्याच्या दिशेने चालत्या झाल्या.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
         दि. २९-४-२०२१.

!!!  गोपिकाबाई  !!!

अंतिम भाग -१८.

          सवाई माधवरावांच्या पालख्या  गंगापूरहुन रवाना झाले त्याला चार महीने लोटले.त्यादिवसांपासुन गोपिकाबाईंनी जे अंथरुण धरले ते कायमचेच.आधीच वय झालेले,अन्नावरची वासना उडाली. खाण्याची इच्छा व्हायची पण गिळताच येत नव्हते.घशाचे स्नायु काम देईनासे झाले.तोंडात घास फिरायचा,लाळ सुटायची,लाळ तोंडातुन बाहेर यायची, पण घशात अन्न गिळल्या जात नव्हते. पाण्याच्या घोटाबरोबर गिळावा तर थोडे पाणी आंत व घास खाली पडायचा. शेवटी दूध पाण्यावर आहार आला. एवढसं दुध पण तेही गिळायला एक एक घटिका लागायची.थोडं फार अडखळत चालता,बोलतां येत होत,पण अन्न कांही गिळल्या जायचा नाही.जीभच आडवी  होऊन जायची.वैद्य,हकीम झाले.फिरंगी डाॅक्टर झाले पण कशाचाच उपयोग होत नव्हता.

          आताशी त्यांना भ्रमही होऊं लागला.कधी कांहीही करत,कांहीही बोलत.मधेच नारायणाचे अगतिकपणे धावणे आठवले की,तिरिमिरीतच उठायच्या की,तोल जाऊन पडत.देव घरांत कुणी शिरायचं नाही ही सक्त ताकीद असली तरी,त्यांचा तोल गेला की कुणबिनी धावत आंत शिरुन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करीत,पण त्यांना उठतांच येईना.त्यादिवसांपासुन त्यांना भ्रम झाला की,आपल्याला कुणीतरी धरायला येत आहे.मग त्या आणखीणच अंग आक्रसुन घेत.त्यांच्या आडव्या झालेल्या जीभेमुळे,त्या काय बोलतात ते कळेना.पुढेपुढे भमिष्टपणा जास्तच वाढत गेला.कोणी सावरायला आलं की, भेदरुन चळाचळा कापायच्या.अंगारे धुपारे,ताविज झाले,पण कशाचाच फरक पडत नसे.

          एकदाच फक्त एकदाच त्या पुर्‍या भानावर आल्या.मैनेकडुन कारभार्‍यांना बोलावुन घेतले.कारभार्‍यांना म्हणाल्या, आमची घटीका भरली.आम्हास पंचवटी मठात हलवा.आमची क्रीया तिथेच रास्त्यांना करायला सांगावी.पुढचे सपिंड पुण्यास पेशव्यांकडे…एवढेच आडव्या जीभेने बोलण्यास त्यांना घटीका लागली. घरघर सुरु झाली.श्वास मंदावु लागला तसे तुळशीपत्र,दुध तोंडात टाकण्यांत आले.अचानक त्यांच्या नजरेत ओळख परतली.आजुबाजुस नजर फिरवली तर, कारभारी,कुळंबीनी,भटजी,बैरागी सारे दिसले पण नेमक्यावेळी बंधु गंगाधरपंत रास्ते दिसले नाही.क्षणभरच!नंतर मात्र नजर विझु लागली.घाईने तोंडात गंगा टाकली पण,तोपर्यंत गिळणे बंद झालेले.

१७८८ साली श्रावण शुध्द द्वितियेला त्यांचे प्राणोक्रमण झाले.

       बंधु भिकाजी रास्तेंनी दहा दिवसांच्या सार्‍या विधि केल्यात.पुढचे सर्व विधी पेशव्यांनी पुण्यास केल्यात.

       गोपिकाबाई एक महान व्यक्तीमत्व!

राजकारणाची जबर माहिती.शब्दावर कायम ठाम असलेल्या गोपिकाबाईंचा महत्वाकांक्षी एवढा गुण सोडला तर, कदाचित पेशवाईचे स्वरुप वेगळे झाले असते.त्या शनिवारवाड्यात राहत्या तर, थोरल्या माधवरावांची जी फरफट झाली, कदाचित ती झाली नसती.कारण त्यांचा धाक जरबच तेवढा जबरदस्त होता. रघुनाथांवर कांहीतर आब राहीला असतां पण त्या मानी स्रीने शनिवारवाडा सोडुन कायम गंगापूरी जाऊन बसल्या.इकडे एवढे पुत्रांचे मृत्यु झालेत पण त्या फिरकल्या नाही.बरं राजकारणांतुन अंग काढले म्हणावे तर,तेही नाही.त्यांना खडान् खडा माहिती मिळण्याची अगदी काटेकोर व्यवस्था केली होती.व तिथुन सुत्रे हलवत होत्या.असो.शेवटी नियची च्या इच्छेनुसार घडणार्‍या घटना घडतातच.

     त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना करुन इथेच थांबणे क्रमप्राप्त !!

                  समाप्त!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि.  २९-४-२०२१.

गोपिकाबाई चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading