
गांधार देशीच्या सुबल राजाला एक सुलक्षणी,अद्वितीयरुप,चारित्र्य संपन्न अशी गांधारी नांवाची राजकन्या होती. ती बालपणापासुनच श्रध्दाळु, धार्मिक असुन भगवान महादेवावर नितांत श्रध्दा होती.महादेवांची भजन पुजन,उपासना करणे हे तिचे नित्याचेच काम! कडक व्रतसाधना केल्याने………………………….
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! गांधारी !!!
!!! गांधारी !!!
भाग – २१.
अखेर गांधारीचा शाप श्रीकृष्णावर लोटल्या गेला.श्रीकृष्णाने शापाचा हसत स्विकार करीत म्हणाला, क्षात्राणी! हे असच घडणार हे पुर्णपणे मी जाणुन होतो.वास्तविक माझ्या योगबलाने तुझा शाप निष्र्पभ करुं शकतो.पण तुझ्यातील पातीव्रत्य तपोबल खोटे ठरु नये म्हणुन मी तु दिलेला शाप स्विकारत आहे.श्रीकृष्ण उसळुन तिव्रपणे म्हणाला वास्तविक तुझ्याच अनेक अपराधामुळे च हा संपुर्ण विनाश घडला.सर्व गोष्टी तुला माहित होत्या. तुझे पुत्र अत्यंत दिर्घ द्वेषी,निष्ठुर,दुष्कर्मी दुराग्रही,मनात सतत जळत राहणारी सूडबुध्दीने पांडवांवर सतत अन्याय केला.ह्या सर्व दुर्घटना प्रथमपासुन तूं जाणत असल्या मुळे या सर्व अन्यायाची जबाबदारी तुझ्यावर येते. कां नाही आवरले तूं मुलांना?आणि स्वतःच्या निष्र्कीयतेचा दोष कां माझ्यावर लादतेस? गांधारी पुरे कर! हा तुझा शोक नसुन अनर्थ निर्माण करणारी ही शोकरुपी कृत्या आहे.तिच्या शापाच्या शस्राची म्यान रिकामी करुनच फेकुन दिली.
एकुनच सर्व घटना फारच वेदनादाई ठरल्या.नंतर युधीष्ठिराने ऋषींच्या उपस्थितीत सर्व वीरांचे अग्निसंस्कार करुन सर्वजण परतलेत.
हस्तिनापूर राज्यावर पांडवश्रेष्ठ युधीष्ठिराचे राज्य सुरु झाले.राजदाम्यत्य धृतराष्र्ट व गांधारी अत्यंत आदराने वागवत असे व इतरांनाही वागावे अशी त्याने आज्ञा काढली.शिवाय कुंती, द्रौपदी,सुभद्रा याही स्रीया गांधारीची आनंदाने सेवा करीत.गांधारी व धृतराष्र्ट समाधानी होते,पन पुत्रशोक मधुन मधुन उफाळुन येतच असे, व भीमाच्या अनिष्ट चिंतन त्यांच्या मनांत सुरु होई, अशा प्रकारे कधी शांत तर कधी अशांत मना च्या अवस्थेत आयुष्याची पंधरा वर्षे संपली.धृतराष्र्टाला आतां विरक्ती आली वानप्रस्थाश्रम स्विकारुन तपःसाधना करायची इच्छा युधीष्ठीराला बोलुन दाख वली.युधीष्ठीराला पटेना.शेवटी महर्षी व्यासांच्या मध्यस्थीने धृतराष्र्ट,गांधारी, संजय,विदुर वनवासास जाण्यास तयार झाले. कार्तिक पोर्णिमेला गांधारी धृतराष्र्टांनी आपल्या सर्व धनसंपतीचे दान करुन मृगचर्म,वल्कले धारण करुन राजभवनाबाहेर पडले.सर्व नागरीक, राजस्रीया हुंदके देत वर्धमान नगर द्वारा जवळ पोहोचल्यावर धृतराष्र्टाने सर्वांना माघारी जायची विनंती केली,पण कुंती धृतराष्र्ट-गांधारीची सेवा करण्यासाठी त्या दोघांबरोबर वनवासाला जायला निघाली. तीला जाण्यापासुन परावृत्त करण्याचा पुत्रांनी आटोकाट प्रयत्न केला,पण कुंती आपल्या निश्चयावर ठाम राहिली.
अखेर पांडवांनी तिघांना प्रदक्षिणा घालुन निरोप दिला.कुंती,गांधारी, धृतराष्र्ट,विदुर,संजय पांच जण वन वासाला निघालेत. फिरत फिरत महर्षी व्यासांच्या आश्रमात आलेत.व्यासपुजा करुन त्यांच्याकडुन वनवासाची दीक्षा घेतली.आणि शतायुयाच्या आश्रमात धृतराष्र्ट,गांधारी,कुंती या तिघांनी पूर्णपणे वनवासी जीवन पत्करले. तिघे ही आपल्या साधनेत मग्न असतांनाच त्यांच्या भेटीस हस्तिनापुरहुन संपुर्ण राजवंश भेटीला आलेत.या आनंदात भर म्हणुन ऋषीमुनी,महर्षी व्यास,देवल, नारद,विश्वासू,तुंबरु,चित्रसेन इतर अनेक ऋषी आले.सर्वांसोबत ज्ञानयज्ञ सुरु झाला.सर्वजण आनंदात एकत्रीत एक महिना कसा निघुन कसा गेला कळलाच नाही.
महात्मा विदुरांनी देहत्याग करुन आपला देह युधीष्ठीरामने विसर्जित केला व आपला अवतार संपवला.
एक दिवस व्यास धृतराष्र्टाला म्हणाले, राजन्! विदुराने देहत्याग केला. तुला सुध्दा जन्ममरणाचा फेरा चुकणार नाही.तत्पुर्वी तुझ्या मनांतील शोक,संशय नष्ट होणे आवश्यक आहे. तरी तुझी इच्छा सांगीतल्यास मी पुर्ण करीन.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गांधारी !!!
अंतिम भाग – २२.
महर्षी व्यासांचा आगळा दिलासा मिळाल्यावर धृतराष्र्ट म्हणाला, माझ्या मुलांच्या अन्यायाला पाठीशी घातल्या मुळे महायुध्द होऊन एवढा सर्वनाश झाला.याचा पश्चाताप होऊन दुःख, शोकाने अस्वस्थपणे मन कुरतडत होते. पण आपण सर्व आलात,सत्संग घडला. आता परलोकगनास मनोभावे पुर्णपणे सिध्द आहे. त्याचे बोलणे ऐकल्यावर गांधारी म्हणाली, भगवान! आज १६वर्षे झालीत पुत्रशोक होऊन, पण विसरल्या जात नसल्यामुळे चित्त स्थीर होत नाही! त्यामुळे आम्ही दोघेही मनांत झुरतच आहोत.क्षणभर थांबुन करुणेने व्यासां कडे पाहिल्यावर,व्यास म्हणाले, निःशंक पणे तुझी इच्छा कथन कर, मी तुझी इच्छा पुर्ण करतो.
गांधारी म्हणाली,भगवान्!आपल्या तपोबलाने दुसरी सृष्टी निर्माण करुन, दुसर्या लोकांत गेलेल्या सर्व मुलांची, नातवंडांची, वीरांची भेट घालुन दिल्यास आम्ही शोकरहित होऊन शांत,समाधानी होऊ.कुंतीने सुध्दा दुजोरा दिला.व्यास म्हणाले, मी तुमची इच्छा जाणली होती. आज रात्री तुम्ही सर्वजण गंगातटावर या तिथे सर्वांची तुम्हाला भेट घडेल.
गंगेतीरी सर्वजण जमले.व्यासांनी धृतराष्र्ट-गांधारीला दिव्य दृष्टी प्रदान केली.व्यासांनी गंगेत प्रवेश करुन आचमन केले.मंत्रोचार करुन कौरव पांडव व सर्व मृतवीरांना येण्याचे आव्हान केले, आणि काय आश्चर्य!गंगे तुन झगमगती शस्रे,रथ, वाहने पाण्या तुन प्रकट होऊ लागली.भीष्माचार्य,कर्ण द्रोणाचार्य,अभिमन्यु,पांडवपुत्रे,दुर्योधन, दुःशासन व सर्व कौरव वीर,इतर मृतवीर योध्दे, पाण्याबाहेर येऊन एकमेकांना भेटले. पुर्वीचे वैर,द्वेष संपला.जिव्हाळा व आनंद भरभरुन ओसांडत होता, आनंदोकोल्होळ माजला होता.
गांधारी,कुंती दोघीही अपुर्व मायेच्या गंगेत अक्षरशः न्हाऊन निघाल्यात, जो जिव्हाळा,प्रेम पुर्ण आयु ष्यभर दोघींनी इच्छिले, अखेर…अखेर!पण मरणोत्तर ही सफलता मर्त्य लोकां मधे सत्यत्वात आली नाही ती, निर्माण केलेल्या अद्भूत स्वप्नसृष्तीत साकार झाल्याने दोघींच्याही मनांत विलक्षण शांती समाधान मिळाले.
ती अद्भूत सृष्टी विसर्जीत करण्या पुर्वी, व्यास म्हणाले, ज्या क्षात्राणींना पतीबरोबर जायचे असेल,त्यांनी आप आपल्या पतीसह गंगेत उडी घ्यावी.हे ऐकताच जवळ जवळ सर्व स्रीयांनी पाण्यांत देह विसर्जित केले.गांधारीच्या सर्व सुना मोक्षमार्गी झाल्या.एक अद्भुत नाट्य संपले.
धृतराष्र्ट,गांधारी,कुंती या सर्वांची मने शांत झालीत.राजकर्तव्य जाणुन पांडव अनिच्छेने हस्तिनापूरकडे निघाले धृतराष्र्टासहित गांधारी,कुंतीनी आश्रम सोडुन हरीद्वारला येऊन कुटी बांधुन राहु लागले.इथे त्यांनी कडक तपोसाधना सुरु केली.धृतराष्र्टाने आहार सोडुन फक्त वायुभक्षण व मौनव्रत पत्करले. गांधारी फक्त पाणी सेवन करी.कुंंतीही उपवास करु लागली.तिघेही खुप दुबळे अशक्त होऊ लागले.संजय व तेथील ऋषीमुनी त्यांची शुश्रुषा करीत असे.
अखेरचा दिवस उजाडला. तिघेही अतिशय क्षीण झाले होते.गंगेत स्नान करुन आश्रमांत परतत असतांना वाटेत घनदाट अरण्यांत धृतराष्र्ट थांबला.त्याने याजकांद्वारे इष्टी करवुन घेतल्यावर तो अग्नि धृतराष्र्टाने आपल्या जवळ घेतला व सर्व याजक,पुरोहितांना वना बाहेर निघुन जाण्यास सांगीतले.धृतराष्टा ने पुजलेल्या अग्निचा अरण्यात त्याग करुन चौघेही थकुन एका ठीकाणी बसले असतां,भयंकर सोसाट्याचा वारा सुटुन आगीचा भडका उडाला.चारही बाजुने अरण्याने पेट घेतला.वणवा लागला.संपूर्ण जंगलच अग्निने वेढले गेले,तिघेही अत्यंत क्षीण,दुर्बल झाल्या मुळे पळुही शकत नव्हते.संजय असहाय्य होऊन काय करावे या विचारां त दिग्मुढ,हतबल होऊन पाहुं लागला. सर्वत्र अग्नीचे लोळ! मार्ग कुठेच दिसेना
धृतराष्र्टाने संजयला ताबडतोब निघुन जायला सांगीतले.बावरुन गेलेला संजय म्हणाला,राजन्!तुम्हाला असा मृत्यु येणे योग्य नाही,पण यांतुन सुटण्या चा मार्गही दिसत नाही.धृतराष्र्ट म्हणाला, संजया! आम्ही तिघांनी गृह स्थाश्रमाचा त्याग केलेला!हा पुजलेला अग्नि आम्हाला परमगती देणार आहे.तू येथुन बिनाविलंब पटकण पळुन जा! संजय मागे वळुन पाहत दूsर दूsर जाऊ लागला.
बसल्या जागी तिघांची भाव समाधी लागली,ध्यानधारणा,चित्त एकाग्र असतांनाच आगीच्या ज्वाळांनी तिघांनाही वेढले,दिसेनासे झालेत.कुंती, धृतराष्र्ट,गांधारी प्रचंड वणव्याच्या भक्षस्थानी पडलेत जळुन खाक झालेत.
अतिव शोकाने संजय मागे फिरला. प्रत्यक्ष नारदमुनी हा अद्भुत होम पाहत होते. ही हकिकत युधीष्ठिराला कळल्या वर पांडवांच्या शोकाला पारावार राहिला नाही.शेवटी कर्तव्य तर होतेच ना? त्यांच्या अस्थी आणुन क्रीयाकर्मे केलीत.असे संपले गांधारीचे जीवन!
उभे आयुष्य सुष्ट,दुष्ट अशा भिन्न संघर्षात ठामपणे उभी राहिलेली ही मन स्विनी अखेर अश्याप्रकारे शांत झाली. जी अंतरंगात सतत जळतच जीवन व्यतीत केलेली ही तपस्वीनी अखेर खर्या अग्निज्वाळांमधे लपेटुन भस्म झाली.
या राजमातेचे जीवन म्हणजे एक जिवंत वणवाच होता.
अशा या जगावेगळी पतिव्रता,त्याग मयी,सहनशील,आत्मसंयमी पतिव्रतेला कोटी कोटी प्रणाम!
!! समाप्त !!
संकलन – मिनाक्षी देशमुख.
–

