
गांधार देशीच्या सुबल राजाला एक सुलक्षणी,अद्वितीयरुप,चारित्र्य संपन्न अशी गांधारी नांवाची राजकन्या होती. ती बालपणापासुनच श्रध्दाळु, धार्मिक असुन भगवान महादेवावर नितांत श्रध्दा होती.महादेवांची भजन पुजन,उपासना करणे हे तिचे नित्याचेच काम! कडक व्रतसाधना केल्याने………………………….
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! गांधारी !!!
!!! गांधारी !!
भाग – ५.
गांधारीची सर्वच मुलं हुशार, पराक्रमी होती,पण दुर्योधनाचा स्वभाव मत्सरयुक्त,द्वेषपुर्ण व इतरांचा उत्कर्ष सहन न होणारा असल्यामुळे त्याच्या सुडबुध्दीचा व विषार विचारांचा प्रभाव सर्व भावांवर पडत असल्यामुळे गांधारी च्या मनाला सतत डाचतत असे,कारण ही शंभर पुत्रांची सेना सन्मार्गा ऐवजी कुमार्गाकडे वळु पाहत होती.शिवाय तिचा भाऊ शकुनीच्या कुटील शिकव ण्यावर मुलांचा पटकन विश्वास बसत होता.गांधारीला शंका येई आपलाच भाऊ मुलांना विनाशाकडे नेणारा सुत्र धार तर नसेल ना? गांधारी मुलांना योग्य वळण,शिक्षण चांगला ऊपदेश करीत असे,पण दुर्योधन व शकुनी तिच्या शिकवणीवर पाणी फेरीत व्यर्थ करीत.
मुलांच्या उत्कर्षाच्या दृष्टीने शकुनी ला अनेकवेळा आडवळणाने गांधारदेशी परत जाण्यास सांगीतले,पण अंध धृतराष्र्ट दुर्योधनाच्या व शकुनीच्या कुटील डावात सामील असल्यामुळे शकुनीला राजाश्रयच असल्यामुळे, गांधारी किंवा इतरही लोकं त्याला जाण्याची जबरदस्ती करुं शकत नव्हते. तो परत न जाण्यामागे बरेचसे प्रवाद प्रचलित आहेत.पैकी भीष्मांनी गांधार देशावर आक्रमण केला होता तो सूड घेण्यासाठी हस्तिनापुरात राहतो.दुसरी आख्यायिका नुकतीच वाचनात आलेली अशी आहे की, गांधारीच्या पत्रिकेत विधवायोग असल्यामुळे पुरोहितांच्या सल्ल्याने तिचे लग्न गाढवाशी लावले व नंतर गाढवाला मारुन टाकले अशा प्रकारे ती विधवा झाली.नंतर तिचा विवाह धृतराष्र्टाशी झाला.ही गोष्ट हेरां करवी भीष्माचार्यांना कळल्यावर,त्यांनी गांधारीला खोदुन खोदुन विचारल्यावर तीने कबुल केले.
हे ऐकुन भीष्मचार्यांना आपल्याला फसवल्याबद्दल व आपल्या प्रतिष्ठीत कुळाला डाग लावल्याबद्दल भयंकर संताप आला.व रागाच्याभरात शकुनी सह त्याचे ११भाऊ, (आई-वडील) राजा राणीचं अख्ख कुटुंब बंदी बनवुन हस्तिनापुरच्या कारागृहात टाकले.आणि धर्माला अनुसरुन त्यांना फक्त एक मुठी भात खायला देत,जेणेकरुन उपासमारी ने तडफडुन मरावे, दिवसेंदिवस ते सर्व अशक्त होऊ लागलेत. राजा सुबल पुत्रांना म्हणाले,आपण सर्वानी मरण्या ऐवजी एकाने तरी सूड घेण्यासाठी जिवंत राहावे म्हणुन आपपाल्या हिश्या चा भात एकाने खावा.शेवटी सूड घेण्या साठी शकुनीने जिवंत राहण्याचे ठरले. त्याप्रमाणे
सर्वांच्या वाटणीचा भात त्याला मिळाला व बाकीच्यांचा अन्नाशिवाय तडफडुन मृत्यु झाला.राजा सुबलने मरतेवेळी एक लोखंडी कांब शकुनीच्या पायावर मारुन त्याला लंगडे केले.जेणेकरुन त्याच्या प्रत्येक लंगडत्या पावलागणिक सूडाचा अग्नि प्रज्वलीत राहुन सतत प्रयत्नशील राहावा.
परंतु ही आख्यायिका मला तरी पटत नाही.भीष्माचार्यासारखी महान विभुती अश्या शुद्र मार्गाने जाऊन,ऊपा शी ठेवुन पुर्ण परिवाराची हत्या करतील ते एका मोठ्या साम्राज्याचे सर्वेसर्वा होते. रणझुंजार,लढाऊ,शूर होते. बरं! क्षणभर आपण खरं जरी मानले तरी गांधार राज्य व इतर जवळचे नातलग, मंत्री, यांनी पुर्ण परिवार गायब असतांना कोणीच कशी चौकशी केली नाही?हे अचंबित करणारे वाटते. हे सर्व कांही जरी असले तरी शकुनी जळूसारखा हस्तीनापुरच्या साम्राज्याला चिकटला हे मात्र खरे! सूडाच्या भावनेने म्हणा किंवा त्याच्या घातक मनोवृत्तीने दुर्योधनाला हाताशी धरुन कुटील कारस्थाने सुरुच ठेवले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गांधारी !!
भाग – ६.
सर्व कौरव – पांडवांमधे शकुनी हा किकर काट्यासारखा खोलवर रुतुन बसला होता.अंध धृतराष्र्ट व महाराणी गांधारी,तसेच तिचे शंभर पुत्र या सर्वांना आपल्या बोटावर थयथय नाचवीत होता.या सर्वात कहर म्हणजे कणक नांवाचा कुटील राजनितिज्ञाची जोड मिळाली.दुर्योधनाने तर दुःशासनाला आपली पडछायाच बनवली.या चौकडी चा प्रयत्न अंगराजपद देऊन अंकीत केलेल्या दिग्विजयी कर्णाला आपल्या कुटील डावात ओढण्याचा, सामील करण्याचा होता, पण कर्णाला हे पटले नाही. सरळ युध्दाचे आव्हान देऊन समोरासमोर समरांगणात युध्द करावे,हा सल्ला अर्थातच त्यांना पटणे शक्य नव्हतेच
गांधारी पतिव्रता होती,त्याचबरोबर निडर व न्यायनिष्ठुरही होती.ती नेहमीच सत्य,नीती आणि धर्माची पक्षपाती असुन अन्यायाचे समर्थन कधीच करत नसे.स्वतःच्या महालात विषन्य मनःस्थि तीत विचाराधीन असतांना,राजभवना च्या महाद्वाराशी कांही त्रृषीमुनींसह एक तपस्विनी स्री पांच देखण्या मुलांसह आले आहेत, महाराणींनी सर्व राजस्रियां ना सोबत घेअन वर्धमान महाद्वाराजवळ येण्याबद्दल महाराजांचा निरोप व आज्ञा घेऊन द्वारपाल आला.
धृतराष्र्टाच्या आज्ञानुसार गांधारी च्या आजेसासु सत्यवती, राजमाता अंबीका व अंबालिका व इतर सुनांसह गांधारी महाद्वाराकडे निघाली.तिकडुन भीष्म,धृतराष्र्ट,संजय, विदुर आणि राज धानीतील सर्व जेष्ठ,श्रेष्ठ व राजवेष धारण केलेले गांधारीचे शंभर पुत्र महा द्वाराजवळ जमा झालेत. सर्व राजपुरुष व स्रीयांनी महर्षींना वंदन करुन आपापले स्थान ग्रहण केले.भीष्माचार्यां नी त्रृषींची पुजा केल्यावर एका जेष्ठ त्रृषीने सर्वांना संबोधीत केले की,किंदम त्रृषीच्या शापामुळे महाराज पांडु देवी कुंती व माद्री आणि पांच पुत्रांसह वनवासी होऊन सन्यस्त जीवन शतशृंग पर्वतावर आमच्या सोबत व्यतीत करत होते.हे पांचही पुत्र आचार विचारा संपन्न आणि सुसंस्कारी आहेत.
एका मोहाच्या क्षणी किंदम त्रृषीच्या शापामुळे सतरा दिवसापुर्वी पांडुराजाचे निधन झाले.माद्रीदेवीने सहगमन केले.त्या दोघांचे क्रीयाकर्म करुन त्रृणमुक्त होण्याच्या दृष्टीने त्यांच्या अस्थी आणल्यात.तसेच कुंतीदेवी पांच पुत्रांसह आपल्या आश्रयाला आल्यात. एवढे सांगुन सर्व मुनीवर निघुन गेलेत.
समोर होते फक्त अस्थीची पेटी,कुंती व तिचे पांच पुत्र! भीष्म विदुर शोकमग्न होऊन पांडुपुत्रांना आवेगाने आपल्या कवेत घेतले.गांधारी,सत्यवती, अंबालिका यांनी आवेगाने कुंतीला अलींगन देऊन ओक्सीबोक्सी रडुं लागल्यात.सारी राजधानी शोकसागरांत बुडुन गेली.ए कमेकांचे सांत्वन करीत पांचही पुत्रांना घेऊन कुंती राजभवनात आली.बारा दिवस हस्तिनापुर व राज भवन दुखवट्यात मग्न होते.श्राध्दादी कर्मे,दानधर्म राजघराण्याच्या इतमानाने पार पडल्यात.
महर्षी व्यास, आई सत्यवतीकडे येऊन म्हणाले, आई! आतां सुखाचे दिवस संपलेत.यापुढे अनिष्ट काळ येऊन जगावर, विशेषतः कुरुसाम्राजावर अन्याय,अधर्माचे राज्य सुृरु होणार!कौरवांच्या दुष्टपणामुळे मोठा नरसंहार होईल तो तू पाहु शकणार नाहीस,सहन होणार नाही.त्यामुळे योगमार्गाचा आश्रय घेऊन वनात जाणेच योग्य राहिल. व्यासांच्या सुचनेनुसार सत्यवती आपल्या सुना अंबा,अंबालिका भरजरी वस्रालंकाराचा त्याग करुन शेवटचा निरोप घ्यायला गांघारीकडे आल्यात.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गांधारी !!!
भाग – ७.
अंबिकेने आपली सुन गांधारीला अश्रुभरल्या नयनाने कवेत घेऊन न्याय व सत्याच्या मार्गावर चालण्याचा उपदेश व सांत्वन करुन आवेग ओसरल्यावर तिघींनीही तिचा निरोप घेतला.नंतर अखेरचा निरोप घेण्यासाठी धृतराष्र्टा कडे आल्यात.त्याने कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त न करतां कोरडेपणे रुक्षतेने निरोप दिला.संपुर्ण राजपरिवार दुःखी होऊन या तीन योगीनींना निरोप देत होती.हळुहळु तिघीही दृष्टीआड होऊ लागल्या.
गांधारीच्या मनांत हे सर्व पाहुन विचारांचे काहुर उठले, आपल्याच मुलां च्या दुष्कृत्यामुळे नरसंहार होणार का? पृथ्वी ओस पडणार कां?आणि आपल्यालाही असच जोगीतीच्या रुपात वनवास पत्करावा लागेल का?अशाच मनःस्थीतीत कांही दिवस संपले.आणि बातमी आली की,सत्यवती,अंबालिका अंबा यांचे वनात देहावसान झाले.गांधा रीच्या जीवनात विलक्षण निराधारपणा ची पोकळी निर्माण झाली.पती पहावा तर डोळ्याने तर अंध आहेच पण मनात सुध्दा अंधःकार,मत्सरी व दिर्घद्वेषी!आणि बलवान पण दुष्कर्मी! सन्मानाची एवढीही खुणदेखील कुठे दिसत नव्हती.
गांधारीचा जीव तडफडु लागला. तिने निश्चय केला… धर्म,न्याय,नीती सोडुन चालणार नाही.पती दुष्ट मार्गा कडे जरी वळला तरी पतिव्रता धर्माला अनुसरुन परावृत्त करुन न्याय मार्गावर आणायचा आटोकाट प्रयत्न करायचा आणि मातेचे कर्तव्य म्हणुन पुत्रांच्या दुष्कृत्याला,कपटीपणाला कडाडुन विरोध करणें गरजेचे आहे.तिच्या मनात भयानक वादळ उठले.तिला समजुन चुकले आपले नशीब खडतड असुन भयंकर मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.आपण कितीही प्रयास केला तरी आपवे पातीव्रत्य व मातृत्वाने हळुवार पणे प्रेमाची फुंकर घालुन संजीवनी देणारे अमृत तर ठरणार नाहीच,उलट कडाडणार्या विजेप्रमाणे प्रखर व दाहकच ठरणार! खर म्हणजे असे व्हायला नकोय,पण काय घडणार हे मात्र भविष्यच ठरवेल!
गांधारीचे १०० व कुंतीचे पांच पुत्र कलाकलाने वाढत होते.राजकुमारा च्या दर्जाने सर्वांचे पालनपोषण व संवर्धन भीष्माचार्यांच्या देखरेखेखाली चालु होते.गांधारीचे मुलांवर बारीक लक्ष असे.दुर्योधन,दुःशासन आणि शकुनीच्या मनांत भीम,अर्जुनाबद्दल कमालीचा द्वेष व आकस सतत जागृत असे.नेहमी तिघांचे नेहमी गुप्त खलबते चालत असे गांधारीला कामाच्या व्यापातुन या गोष्टीं कडे पुरेसे लक्ष देऊ शकत नव्हती.
सर्वात कपटी,धूर्त व कारस्थानी गांधार देशाचा राजपुत्र आणि गांधारीचा सख्ख्या भाऊ शकुनी हा महाभारताचे युध्द घडवुन आणण्यास जबाबदार समजल्या जातो. पांडवांविरुध्द दुर्योधना चे सतत कानात विष भरुन कालवल्या मुळे भावांभावामधे युध्दाची ठीणगी पडली.शकुनीच्या कपटी स्वभावाबद्दल जरी आपल्याला तिरस्कार वाटत असला तरी,केवळ द्युताच्या बळावर पांडवांचे राज्य जिंकण्याची शक्ती व बुध्दी त्याचेकडेच होती हे वास्तव नाकारुं शकत नाही.महाराणी गांधारी विष्णुभक्त तर शकुनी कट्टर शिवभक्त होता.त्याला उलुका व विक्रासुर नांवाचे दोन पुत्र होते.उलुकाने गांधारदेशी परतण्यासाठी शकुनीला अनेकवेळा विनंती केली परंतु हट्टी शकुनी हस्तिना पुर सोडायला तयार नव्हता,कारण भीष्मांनी गांधार देशावर आक्रमण करुन पाडाव केला तेव्हाच कुरुवंशाचा विनाश,नायनाट करण्याची प्रतिज्ञा केल्यामुळेच तो हस्तिनापुरात राहत होता.वास्तविक शकुनीच्या मनांत पांडवांबद्दल फारसा आकस नव्हताच पण भीष्मांनी युध्दामधे गांधार देशाचे मोठे नुकसान तर केलेच शिवाय गांधारी चा विवाह दृष्टीहिन धृतराष्र्टासोबत केल्याचा राग कायम मनामधे असल्या मुळे भीष्मांचा व संपुर्ण वंशाचा नायनाट करण्याची त्याने प्रतिज्ञा केली.शकुनी द्युतामधे निपुन होता.त्याच्याजवळचे फासे जरासंधाच्या,कुठे कुठे उल्लेख आहे त्याच्या वडीलांच्या मांडीच्या हाडा पासुन बनविल्याची आख्यायिका प्रसिध्द आहेत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गांधारी !!!
भाग – ८.
एकदा सकाळीच दुर्योधनाने गांधारीला सांगीतले,आम्ही १०५ भाऊ गंगाकाठी प्रमाण कोटीतिर्थावर मौज मजा करण्यास जात आहोत.१०५ भाऊ? गांधारी विष्षन्नतेने उद्गारली! हा एकोपा आहे? की, कांही वेगळे?तिच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली,कांही तरी खटकले,पण तेवढेच!ती नेहमीच्या व्यापात गढुन गेली.संध्याकाळी दुर्योधन, दुःशासन व शकुनी विजयाच्या जल्लोषा त अतिशय आनंदात इतर भावांसह परतले आणि पांडवबंधु मात्र चारच!
थोड्याच वेळात गांधारीला बातमी मिळाली,भीमसेन सांपडत नाहीय!भीम पोहायला पाण्यात ऊतरला,नंतर परत वर आलाच नाही. कुंतीदेवीच्या महाला त वाढत चाललेले दुःख व कौरवांच्या महालातुन दुर्योधन,दुःशासन,शकुनी यांच्या हसण्याचा वाढत चाललेला जल्लोष पाहुन, दुर्योधनाने १०५ भाऊ म्हणुन उच्चारलेल्या कडवट शब्दांतील अर्थ गांधारीला उमगला.तीने धृतराष्र्टा ला हे सर्व सांगीतले,पण त्याच्या वृत्तीती ल कोरडेपणा तिला जाणवला.असह्य झाले तीला सर्व! दुर्योधनाला तीने ठासुन विचारल्यावर,त्याचे उडवाउडवी चे उत्तर व शकुनीचे कुत्सित हसने ऐकुन यांनी कांहीतरी कुटील कपट कारस्थान केल्याबद्दल तिची खात्री झाली.
कुंतीदेवीचे करुण रडणे व चार भावांची तडफड पाहुन गांधारी खुप अस्वस्थ झाली.सात दिवस संपले तरी भीमसेनचा पत्ता नाही.आठव्या दिवशी भीमसेन पाताळातील नागलोकांतुन अतिशय तेजस्वी,बलसंपन्न शस्रसंपन्न होऊन परतला.गांधारीला हायसे वाटले. दुर्योधन,दुःशासन,शकुनींना त्यांचा डाव फसल्याने सुडाच्या भावनेने ते बेभान झालेत. भीम त्याच्यावर बितलेल्या प्रसंगाबद्दल सांगतो की, प्रणामकोटी तीर्थावर सर्वजण खेळणे व मौजमजा, खाणेपिणे सुरु असतांनाच त्या त्रिकुटाने भीमाला खाण्यातुन विष देऊन त्याच्या सह जलक्रीडा करत करत त्याला खोल डोहाकडे घेऊन जातात.भीमावर विषा चा अमंल चढल्यामुळे भीमावर मुर्च्छीत झाला.तिघांनी त्याला खोल पाण्यात बुडवुन टाकले.भीमाचा आपल्या मार्गा तील काटा काढल्याच्या आनंदात सर्व राजधानीत परतले.
परंतु दैवगती वेगळीच होती.भीम बेशुध्दावस्थेत पाण्याच्या तळाशी नाग राजाच्या राजधानीत पोहोचला असतां अनेक नागांनी त्याच्यावर हल्ला करुन दंश केल्यामुळे भीमाच्या अंगात भिनले ले विष उतरुन सावध झाला.त्याला नाग राजासमोर उभे करण्यात आले.नागराज पांडुपुत्र म्हणुन भीमाला ओळखले.नाग राजाने भीमाला प्रभावी दिव्य रसायणे पाजुन व अस्रशस्र देऊन बलसंपन्न केले. सात दिवसांनंतर भीम अत्यंत तेजस्वी व सामर्थ्यवंत होऊन परतला.
महाराणी गांधारी हे सारं ऐकुन सुन्न झाली.ज्याच्या हत्याचा आपल्या मुलांनी कट केला तोच आज बलसंपन्न होऊन परत आला.या कारस्थानाचा सूड भीम नक्की घेणारच!सूडाला प्रतिसूड!तेवढ्यात बातमी आली की,दुर्योधनाने भीमाच्या प्रिय सारथ्याला गळा दाबुन ठार केले.दुष्ट कारस्थानांची परंपरा सुरु झाली.गांधारी हे सर्व बंद मिटल्या डोळ्याने पाहत,ऐकत मनातल्या मनांत जळते असते.उपाय सुचत नाही,केलेल्या प्रयत्नांना कोणीही जुमानत नाही.
गांधारी व कुंती राजपुत्रांना आचार्य द्रोण अस्रशस्र विद्येत पारंगत व तरबेज करतात.कौरव पांडव सर्व विद्या व तत्वज्ञानात निष्णात होतात.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
–


