गांधारी चरित्र संपूर्ण भाग ३, (९ ते १२)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


       गांधार देशीच्या सुबल राजाला एक सुलक्षणी,अद्वितीयरुप,चारित्र्य संपन्न अशी गांधारी नांवाची राजकन्या होती. ती बालपणापासुनच श्रध्दाळु, धार्मिक असुन भगवान महादेवावर नितांत श्रध्दा होती.महादेवांची भजन पुजन,उपासना करणे हे तिचे नित्याचेच काम! कडक व्रतसाधना केल्याने………………………….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! गांधारी !!!

!!!  गांधारी  !!

भाग  – ९.

           एके दिवशी द्रोणाचार्य धृतराष्र्टां ना म्हणाले,राजन! आपले सर्व पुत्र व पांडुपुत्र अस्रशस्र विद्येत पुर्ण पारंगत झालेत. अस्रसंचालनाच्या कलेचे प्रदर्शन समारंभ करण्याची अनुमती द्यावी.अनु मती प्राप्त झाल्यावर द्रोणाचार्यांच्या देखरेखेखाली या संचालनासाठी भव्य रंगभूमी,मोठे प्रेक्षक भवन,तयार करुन सर्व नगरवासीयांना व राजघराण्यातील सर्वांना सामुदायिक निमंत्रीत केले.

       ठरलेल्या दिवशी रंगभूमीकडे सारे हस्तिनापुर, राजघराण्यातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ,महाराज धृतराष्र्ट,महाराणी गांधारी कुंतीदेवी,सुना व इतर स्रिया आल्यात. रंगभूमी खचाखच भरले.संचलन प्रदर्शन सुरु झाले.

        धृतराष्र्टपुत्र व पांडुत्र युध्दवेश व शस्रसज्ज होऊन मैदानांत उतरलेत. त्यांनी आचार्यांची पुजा,नमस्कार करुन सर्व जेष्ठ, श्रेष्ठांना अभिवादन केले.रथ संचलन झाल्यावर,गदायुध्दाचे प्रदर्शन सुरु झाले.दुर्योधन व भीम दोघेही गदा युध्दात निष्णात!त्यांचे कौशल्य पाहुन सर्वजण उल्हासित झाले,पण हळुहळु हे प्रदर्शन युध्दाकडे वळणार असे चिन्ह दिसु लागले.गांधीरीच्या मनावर दडपण आले.कुंती श्वास रोखुन पाहत होती. अखेर द्रोणाचार्यांनी मध्यस्थी करून दोघांनाही रोखले.त्यानंतर अर्जुनाची अस्रविद्येतील पारंगता पाहुन सर्व प्रेक्षकगृह स्तिमित, अगदी थक्क झाले.कुंतीदेवीचा आनंद गगनात मावेनासा झाला.आणि गांधारी! ती अतिशय दडपणाखाली वरवर आनंद व्यक्त करीत होती.

     एवढ्यात प्रेक्षागृहातुन सुर्याप्रमाणे तेजस्वी तरुणाने प्रवेश केला व अर्जुनाने दाखवलेल्या अस्रविद्या तेवढ्याच कौश ल्याने करुन दाखवल्यात.दुर्योधनाने त्याचे कौतुक करुन अंगदेशीच्या सिंहा सनावर अभिषिक्त करुन त्याला आपले से केले.इकडे कुंतीदेवी अचानक बेशुध्द पडली. गांधारीला समजेना असे कां? आतां अंगराज कर्ण पांडवांचा विशेषतः अर्जुनाचा वैरी बनला. दुर्योधनाला आतां अर्जुनाच्या तोडीचा एक सहाय्यक मिळाला.राजभवनांत दुर्योधन,दुःशासन, शकुनी धृतराष्र्टांसह नवनवीन खलबते करुं लागली. असह्यपणे गांधारी सर्व पाहत होती,ती रोखु शकत नसल्यामुळे तिची घालमेल होत होती.

     महाराज धृतराष्र्ट अंध होते का?मुळीच नाही! ते मनाच्या अंःतचक्षुंनी एकमेव स्वप्न पाहिले ते म्हणजे,आपला जेष्ठ पुत्र दुर्योधन हस्तिनापुरचा अभिषिक्त सम्राट होणे! माणसं स्वार्था पोटी अंध होतात.पण कुरुंचा हा राजा राज्यस्वार्थाने मनांत अहोरात्र डोळसच राहिला,स्वप्न बघत राहिला ते एकमेव पुत्राच्या राज्यभिषेकाचं! कोणीही धृतरा ष्र्टाच्या कक्षात गेलं की, नुसत्या पदरवा वरुन कोण आलं? हे नांवानिशी पटकन ओळखत!हे कसे शक्य होते तर, सामान्यांना पंचेद्रिय असतात तर,या हस्तिनापुरच्या वरवर सौजन्य दाखवणा र्‍या महाराजांच्या ठीकाणी सहावे इंद्रिय होते,जे कुणालाच कधीही न दिसणारं! त्याचं नांव होतं….. “राज्यस्वार्थ”!

     त्यामुळे पांडुपुत्रांना कधीही धृतराष्र्टाबद्दल विशेष आदर वाटला नाही.परंतु गांधारीदेवीबद्दल मात्र, जेवढी कुंतीमातेविषयी जेवढी प्रेमाची आदर भावना होती, तसेच गांधारीवर होते व गांधारीनेही त्यांच्यावर निखळ प्रेम होते. सामान्य स्रीसारखं गांधारीनेही जीवनभर एक स्वप्न पाहिलं की, जेष्ठ पुत्र दुर्योधन  सन्मार्गाने,न्यायाने, नीतीने वागावे,पण तिचे हे स्वप्न कधीच साकार झाले नाही व होणारही नव्हते!कारण दुर्योधन माज लेल्या एकुल रानवराहासारखं त्याच मन व जीवन होत.शकुनीने त्याच्या मनात इतके विष पेरले की, कसेही करुन पांडवांना शिकस्त करणे……

             क्रमशः
   संकलन –  मिनाक्षी देशमुख.

भाग – १०.

!!!  गांधारी  !!!

                भाग – १०.

         कुरुकुलाच्या कीर्तीचंद्राला खग्रास ग्रहणासारखे ग्रासले ते एकाच व्यक्तीने…..गांधार राजपुत्र शकुनीने! तो नखशिखांत कुटील होता.आणि राजा धृतष्र्टाला सहावं इंद्रिय होत…. राज्य स्वार्थाचं! शकुनीलाही लाभलं होतं सहावं इंद्रिय कुटीलतेच! त्याच्या कुटील तेच वर्णन करायच तर, जसं विंंचवाचं काळकुट विष त्याच्या वाकड्या नांगीत भरलेलं असतं,तसच गांधारदेशीच्या या विंचवाच्या नसनसेतील कणाकणांत एक कुटीलतेचा नांगीवक्र विंचु भरलेला होता. तो होत्याचं नव्हतं करण्यांत अत्यंत निष्णात होता.खखर म्हणजे गांधारी सारख्या सत्शील भगिनिला एवढा कुटील,कपटी बंधु लाभावा हे तिचे दुर्देवच नव्हे का?

        पांडवांचे अध्ययन पुर्ण झाल्यावर ते दिग्विजयासाठी चारही दिशांना जाऊन अगणित संपतीसह विजय संपादन करुन आणलेली संपती धृतराष्र्टाला अर्पण केली.पांडवांच्या पराक्रमाणे हस्तिनापुर वैभवशाली व संपन्न राज्य बनले.पांडवांच्या उदार, सौजन्यपुर्ण व्यवहार,पराक्रम,कर्तबगारी ने त्यांची अतिशय प्रशंसा होऊ लागली. पांडवांचा उत्कर्ष व प्रजेतील वाढते प्रेम कौरवांना सहन होईना.धृतराष्र्टासहित दुर्योधन,दुःशासन,शकुनी,कर्ण मत्सराने व द्वेषाने तडफडु लागले.कर्ण वगळता ही चौकडी व दुष्ट कणकाने पांच पांडव व त्यांची आई कुंतीला ठार मारण्याची एक कपट योजना आखली.

       एके दिवशी धृतराष्र्ट गांधारीला म्हणाले, कुंतीदेवी व तिचे पुत्र अतिशय देवभक्त व श्रध्दाळु असल्यामुळे वारणा वतात भगवान शिवाची भरणारी सुंदर यात्रा पाहण्यासाठी त्यांना वारणावतात पाठवत आहे.आनंद उपभोगुन एक वर्षाने परत येतील. त्यांना राहण्यासाठी वारणावत नगराबाहेर एक अतिशय सुंदर व सर्व सुखसोयींनीयुक्त राजभवन, पुरोचन मंत्र्याच्या देखरेखेखाली बांधले जात आहे. आणि जवळ जवळ बांध काम पुर्ण होत आलेलं आहेच.हे सर्व धृतराष्र्ट अतिशय आपुलकीने सांगत होता जेणेकरुन गांधारीच्या मनांत किंतु निर्माण होणार नाही.

       तरीही गांधारीच्या मनांत शंका आलीच! पांडुपुत्रांसाठी आणि एका सुंदर राजभवनाची निर्मिती? कांही तरी तिला खटकत होते.ती पतीला समजा वत म्हणाली वडीलांच्या नंतर त्यांच्या पुत्रांनी हे राज्य आपल्या पराक्रमाने वाढवुन समृध्द केले ही जाणीव ठेवुन त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक करण्या ऐवजी,तुम्ही आणि तुमचे पुत्र आकसाने वागुन आपसांतील द्वेष,मत्सर वाढण्या स खतपाणीच घालत आहे.वेळीच रोखले नाही तर भयंकर रण माजुन सर्वनाश होईल.धृतराष्र्ट शांतपणे म्हणाला, या सर्व परिस्थितीची जाणीव आल्यामुळेच पांडव एक वर्ष दूर राहिले की,कदाचित हा तणाव कमी होईल.

         धृतराष्र्ट व चौकडीच्या योजने नुसार पांच पुत्रांसह कुंतीदेवी वारणावत नगरला निघुन गेले.कांही दिवस शांततेत गेले. आणि भयानक बातमी हस्तिनापुर ला येऊन थडकली.वारणावत नगरीतील लाक्षागृह राजभवन मध्यरात्री एकाएकी अग्निने संपुर्ण भडकुन त्या अग्नित कुंती देवी व तिचे पांच पुत्र जळुन खाक झाले

सारे हस्तिनापुर शोकाने व्याकुळ झाले. लोकांना दाखवण्यासाठी धृतराष्र्ट,दुर्यो धन,दुःशासन,कर्ण,शकुनी छाती पिटुन पीटुन मोठमोठ्याने रडले…..गांधारीला दुःख आवरेनासे झाले.नेत्रातुन अश्रुंची धार लागली. तिचे मन आक्रंदत होते. आतले मन विचारत होते, खरचं कुंती सह पांडव जळुन मेलेत की, जाळले गेले?कुंतीसह पांडवांची मृत्युनंतरची क्रीयाकर्मे उरकल्या गेली.गांधारीचे मन या घटनेवर विश्वास ठेवायला तयार नसले तरी हात मात्र जलांजली देत होते

            क्रमशः
       संकलन – मिनाक्षी देशमुख.

भाग – ११.

!!!  गांधारी  !!!

               भाग – ११.

       कांही दिवसांनी वार्ता आली की, पांचालदेशाच्या द्रुपद राजाने त्यांची कन्या द्रौपदीचे स्वयंवर मांडले असुन देशोदेशींच्या राज्यांना आमंत्रीत केले.”पण” होता,खाली पाणी भरलेले मोठे पात्र असुन वर फिरत्या मत्स्ययंत्रा च्या डोळ्यात पाण्यात पाहुन तिथे ठेव लेल्या धनुष्यबाणाने अचुक शरसंधान जो करेल त्याला द्रौपदी माळ घालेल. द्रुपद राजाचा ‘पण’ ऐकुन दुर्योधनासह सर्व कौरव राजकुमार उंची वस्रालंकार व युध्दवेष चढवुन प्रचंड सेनेसह पांचाल देशाकडे निघालेत.

      स्वयंवरांत दुर्योधनासह तिथे उपस्थि त सर्व राजे पराभूत झालेत. कर्णाने मात्र अचुक शरसंधान साधणार एवढ्यात द्रौपदी कडाडली “मी सुतपुत्राला वरमाला घालणार नाही”.दुःखातिशयाने व अपमानाने कर्ण जागेवर बसला.एवढ्यात प्रेक्षगृहातुन एक तेजस्वी तरुण ब्राम्हण कुमार समोर आला व धनुष्याला नम स्कार करुन लिलया धनुष्य उचलुन प्रत्यं चावर बाण चढवला व फिरत्या मत्स्य यंत्रातुन अचुक लक्षावेध करुन “पण” जिंकला.द्रौपदीने त्या सुंदर तरुणाला वर माला घातली. तो तरुण वीरश्रेष्ठ अर्जुन होता.या स्वयंवराला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उपस्थीत होते. इथुनच पांडवां ची व श्रीकृष्णाची निकटता वाढली,कारण कुंतीदेवी श्रीकृष्णाची आत्या होती.

        श्रीकृष्णाच्या उपस्थितीत द्रौपदी चा विवाह पांच पांडवांशी द्रुपद राजाने थाटामाटात लावुन दिला.पराभूत कौरव बंधु चडफडत हस्तिनापुरला परतले. अर्जुन…. अर्जुन धृतराष्र्ट फुत्कारला. त्याची घोर निराशा झाली.पांडव जिवंत आहेसे ऐकुन गांधारीला फार समाधान वाटले.आपल्या मुलांकडुन कुंती व तिच्या पुत्रांची हत्या घडली नाही ही दैवीकृपाच असावी असे त्या माऊलीला वाटले.गांधारीने सुटकेचा निःश्वास टाकला.पांडवांच्या हत्तेचे पातक निदान  घडले नाही याचे तिच्या मनाला सांत्वन मिळाले. विसावली गांधारी!

      द्रौपदीसारखे स्रीरत्न आपल्याला न मिळता पांडवांना प्राप्त झाले. त्यांच्या क्रोधाग्नित तेल पडुन आगीचा भडका उडाला.ही आग साधी राहिली नसुन भयंकर वणव्यात रुपांतर होणार होते. सूडाची भाषा बोलली जाऊ लागली. पांडुपुत्र जिवंत आहेत हे ऐकुन धृतराष्र्ट खुप अस्वस्थ झाला.वरवर जरी पांडव जिवंत असल्याबद्दल जिव्हाळा दाखवुन आनंद व्यक्त करीत होता तरी मनातुन त्याला अतिशय खेद वाटत होता.पण चडफडण्याशिवाय त्याच्या हाती कांही नव्हते.भीष्माचार्य,द्रोणाचार्य व सर्व श्रेष्ठींच्या सल्ल्यानुसार पांडवांना ससन्मानाने आणण्यासाठी विदुराला पाठवावे लागले.

       सारे हस्तिनापुर पांडवांच्या स्वागता साठी महाद्वारावर लोटले.गांधारी आपल्या सुनांसह आनंदाने त्यांच्या स्वागतासाठी सामोरी गेली.वधुवेषात सजलेली,अत्यंत सुंदर तेजस्वी, कांती मान द्रौपदीने वाकुन गांधारीला नमस्कार केल्यावर गांधारीने तिला आपल्या कवेत घेतले खरे,पण तिचे मन चुकचुकले….ही द्रौपदी… माझ्या मुलां चा मृत्यु तर नव्हे?….गांधारी अस्वस्थ झाली.तिचा आनंद उत्साह एकदम ओसरला.मन पालटले.तिच्या आज्ञे नुसार पांडुपुत्र,कुंती,द्रौपदीची सर्व व्यवस्था लावल्या गेली.राजमहालांत गांधारीपुत्र व कुंतीपुत्र एकत्रीत राहु लागली.पण त्यांच्यातील वैर मात्र आतुन धुसमसतच होते,ही पुढील भीषण घटनांची नांदी पाहुन गांधारीने धृतराष्र्टाला परोपरीने समजाऊ लागली की, कौरव पांडवांचे स्वतंत्र वेगळे राज्य देऊन सुखासमाधानाने राहावे.कुटील धृतराष्र्टाने सम्मती देऊन खांडवप्रस्थ घनदाट अरण्य अर्धे राज्य म्हणुन दिले.

          क्रमशः
   संकलन – मिनाक्षी देशमुख.

भाग – १२.

!!!  गांधारी  !!

                 भाग – १२.

        पांडवांना खांडवप्रस्थ म्हणुन दिलेले अर्धे राज्य? राज्य कसले? घनदाट अरण्य? म्हणे उत्तम राज्य? गांधारीची मती शून्यवत झाली.तिला समजेना पतीला कश्याप्रकारे समजवावे

जे मिळाले त्यावर समाधान मानुन कुंती सह पांच पुत्र,त्यांची पत्नी द्रौपदी खांडववनाकडे रवाना झाले.श्रीकृष्ण सुध्दा त्यांच्या सोबत होताच!श्रीकृष्ण म्हणजे साक्षात चिंतामणी!पांडवांची चिंता हरण करुन त्यांनी इच्छिलेले सर्व देणारा तो योगीराज!मग पांडवांना उणीव ती कशाची?

        श्रीकृष्णाच्या आज्ञेने, देवव्रताने आपला शिल्पकार विश्वकर्माला पाठवुन खांडववनाचे रुपांतर सुसज्य इंद्रप्रस्थ नगरीत करुन दिले.शिवाय मयासुराने इंद्रप्रस्थामधे अतिशय देखणे मयभवन बांधले. ते सर्व आनंदात राहत असल्या चे ऐकुन गांधारीला समाधान वाटले. कौरवांच्या द्वेषाचे कारण संपले,आतां शांतता नांदेल या भ्रमात ती होती.ती शांततेची स्वप्ने पाहत होती आणि इकडे कौरवांच्या मनांत अशांतता खदखदत होती.पांडवांना शून्यात फेकले,पण त्यांनी शून्यातुन नवी सुंदर सृष्टी निर्माण करुन वैभवाच्या,ऐश्वर्याच्या ब्रम्हात नांद तांना पाहुन कौरवांचा द्वेषाने व सुडाने भयंकर थयथयाट होऊं लागला.कुटील योजना आखण्याला पूर येऊ लागला.

       सर्व स्थिरस्थावर झाल्यावर युधिष्ठी राने राजसूय यज्ञ करण्याचे ठरविले.देशो देशीचे राजेमहाराजे,कौरवांकडील सर्व जेष्ठ, श्रेष्ठींना आग्रहाचे निमंत्रण दिले. पांडवांचे ऐश्वर्य,वैभव पाहुन सर्वांचे डोळे दिपुन गेले,पण दुर्योधन,दुःशासन, कर्ण,शकुनी इतकेच काय धृतराष्र्टाच्या मनातही द्वेषाचा वणवा पेटला.सूडाचा अंगार धगधगत होता.हा वणवा आतां विझणार तर नाहीच पण यात आहुत्या मात्र पडतील याबद्दल गांधारीला शंका येऊ लागली.त्यानुसार ती धृतराष्र्टाला समजवण्याचा पराकाष्टा करीत होती. पण त्याचे कलुषित मन पांडवांच्या उत्कर्षाने शांत होण्याऐवजी जास्तच भडकु लागले.त्यांत कपटी कुटील चौकडी द्वेषाचे इंधन टाकण्याचे काम व्यवस्थित पार पाडत होते.गांधारी जीव तोडुन भावा-भावांतील वैर विझवण्या साठी वारंवार सांगत!पण तिचे कोण ऐकतो?तिला भविष्यात दडलेल्या भीषण संकटांची चाहुल लागली.

      राजभवनात धृतराष्र्टासोबत कट कारस्थाने रचल्या जाऊं लागली.पांडव कोणत्या उपायाने नष्ट होतील? त्यांची संपत्ती कशी बळकवता येईल?पांडव शस्र अस्राने नष्ट होऊ शकणार नाही, अन्य उपाय कोणता?कपटनीतीनेच त्यांचा घात केल्या जाऊ शकतो. आणि सुचला उपाय शकुनीला… सुचला… द्युतक्रीडा…. द्युतक्रीडा… ठरले…ठरले.. चौकडींचे आनंदाने डोळे लकाकले.धृत राष्र्टाने या बेताला सहमती देऊन विदुरा ला पांडवांकडे पाठविण्याचे ठरविले.

       भीष्माचार्य,द्रोणाचार्य,विदुर यांना द्यूतक्रीडेचा कपटी निर्णय म्हणजे भवि ष्यात मोठा विनाश वाढुन ठेवलेला अस ल्याची त्यांना जाणीव झाली.त्यांनी खुप समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ!  त्यांच्या उपदेशाला न जुमानता इंद्रप्रस्था ला जाऊन युधिष्ठीराला द्यूताचे आव्हान देण्यासाठी विदुराला पाठवाण्याचे धृतरा ष्र्टाने ठरविले.गांधारीला कळल्याबरोबर कळवळुन धृतराष्र्टाला म्हणाली, महाराज! कां आपली बुध्दी विनाशाकडे नेताहात? द्यूत म्हणजे कपट! अशा कपटी द्यूतात पांडवांना पराभूत करुन घालवले तर,संपुर्ण कुळाचा विनाश होईल.तुम्ही दुर्योधनाला समज द्या किंवा त्याग तरी करा!ही चौकडी आपल्या घराण्याला आग लावत आहे.अजुनही नीट विचार करावा व भविष्यातील होणारा भिषण विनाश टाळावा! पण धृतराष्र्टाला पांडवांचे वैभव डाचत होते,सलत होते.आपल्या मुलांच्या रक्षण व समृध्दीसाठी पांडवांचा नाश होणे आवश्यक वाटत होते.त्याने आपला निश्चय कायम ठेवुन विदुराला इंद्रप्रस्थात पांडवांना आमंत्रीत करण्यास जाण्याची आज्ञा दिली.

              क्रमशः
      संकलन – मिनाक्षी देशमुख.

गांधारी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading