गांधारी चरित्र संपूर्ण भाग १, (१ ते ४)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


       गांधार देशीच्या सुबल राजाला एक सुलक्षणी,अद्वितीयरुप,चारित्र्य संपन्न अशी गांधारी नांवाची राजकन्या होती. ती बालपणापासुनच श्रध्दाळु, धार्मिक असुन भगवान महादेवावर नितांत श्रध्दा होती.महादेवांची भजन पुजन,उपासना करणे हे तिचे नित्याचेच काम! कडक व्रतसाधना केल्याने………………………….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! गांधारी !!!

!!! प्रस्तावना !!

        !!नमस्कार!!

      पौराणिक विषय म्हटले की, आजकाल नाक मुरडल्या जाते.आपल्या  अवती भवती एवढ्या ज्वलंत समस्या असतांना आजच्या २१व्या शतकात पटत नाही व रुचतही नाही.त्यात असलेली काव्यत्मकता,तात्विकता, नाट्यपुर्णता अनुभवलेली नसते.ज्यांची अशी मते आहेत त्यांना पौराणिक कथां चे कांही महत्व असुं शकते हे कधीच कळणार नाही का? त्या कथांत अनेक मानवी भावनांचे झरे झुळझुळतांना यातील व्यक्तिरेखा,कांही विचारांची, भावनांची प्रतिकेही असुं शकतात.

       कुंती राजकन्या व सर्व साधनसपन्न असुनही आयुष्याच्या सुरुवातीपासुनच पुरुषांकडुन छळल्या गेली.दौपदी याज्ञसेना साक्षात यज्ञातुन झालेली अग्निपुत्री पण तिच्याही नशीबी पांच पती,वनवास आला.अशा बर्‍याच स्रीयांचे उदाहरण समोर आहेत, पण त्या अजिंक्य राहुन अजरामर झाल्यात ते त्यांच्या कर्तुत्वाने,त्यागाने,एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पन करुनच आहुती द्यावी लागली.

      या पार्श्वभूमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न करीत आहे,त्यात मुख्य अडचण आहे साधन सामुग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण असले तरी, परंपरेने पुर्वजांनी संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने जीवन मुल्यांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने तीचे कार्य महत्वाचे मोलाचे असणारच!

       सुसंस्कृत, लहान वयातच शिव धारणा करुन, ‘वर’ मिळवणारी,लावण्य वती,विचारवंत,कर्तव्याची जाण असले ली राजकन्या! डोळस असुनहु जन्मभर बाह्य सृष्टीसौंदर्य पाहण्यापासुन विन्मुख झालेली,आजुबाजुला होत असलेल्या अन्यायाने मनाला तडा गेलेला, होत असलेल्या अन्यायाला वैतागुन,न्यायाने राहण्यासाठी पती,पुत्राला सतत समजा वुन सांगुन परावृत्त करणारी,विरोध करणारी, विरोधही लटका पडतो हे पाहुन दुःखी,निराश होऊनही नैतिक मुल्यांवर पुनरुत्थान व्हावे यासाठी ठाम असणारी, भोवती अन्यायी, अधर्मी असलेल्या पती-पुत्रांना सन्मार्गावर आणण्यासाठी कठोर प्रयत्न करुनही आपल्या पती पुत्रांना सन्मार्गा वर आणण्यासाठी प्रयत्न करुनही शेवटी निराशाच पदरी पडली.वातावरण सर्वस्वी प्रतिकुल! अशा परिस्थितीत सांपडलेल्या गांधारीचे दुःख,वेदना,व्यथा अधिक गहिर्‍या होत्या.म्हणुनच जगातल्या पतिव्रता स्रियांमधे गांधारीचे स्थान सर्वोच्च आहे.

      अशा या विविध रुपांत मला भावलेली,दिसलेली गांधारी चित्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे.याआधी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा,संतचरित्र्य… जसेः- श्रीकृष्ण,कर्ण,द्रौपदी,सीता,कुंती, भीष्म,संत तुकाराम,अश्वत्थामा,मंदोदरी, अहिल्या,तारा,श्रीगणेश,संत एकनाथ, संत नामदेव,संत ज्ञानेश्वर,सावित्री, दत्तात्रय, समर्थ रामदास,स्वामी विवेकानंद, संत जनाबाई, श्रीपाद वल्लभ इत्यादींना आपण दाद देऊन भरभरुन कौतुक केल्यामुळेच मला लिहिण्याची स्फुर्ति मिळाली. पुढेही असाच लोभ व आशिर्वाद असावा…

         मिनाक्षी देशमुख.

!! गांधारी !!!

               भाग – १.

           गांधार देशीच्या सुबल राजाला एक सुलक्षणी,अद्वितीयरुप,चारित्र्य संपन्न अशी गांधारी नांवाची राजकन्या होती. ती बालपणापासुनच श्रध्दाळु, धार्मिक असुन भगवान महादेवावर नितांत श्रध्दा होती.महादेवांची भजन पुजन,उपासना करणे हे तिचे नित्याचेच काम! कडक व्रतसाधना केल्याने महादेव प्रसन्न होऊन शंभर पुत्रांचे तिने वरदान मिळवले. इतक्या लहान वयात अशी अलौकीक साधना करणारी ही एकमेव राजकन्या!

        साक्षात मतीदेवताच जणुं अवतर ली! रुप लावण्य,उत्तम शुभलक्षणें, साधना उपासना, विचारीपणा या सर्व गुणांची चर्चा इतर देशातही असामान्य  राजकन्या म्हणुन गांधारीची सुकिर्ती सुगंधीत फुलांप्रमाणे सर्वत्र पसरुं लागली. हा सुगंध हस्तिनापुरातही पसरला.हस्तिनापुरचे राज्य म्हणजे भारताचे सार्वभौम साम्राज्य. तेथील सम्राट धृतराष्र्ट देखणा,पराक्रमी व बलवान होता. पण जन्मांध असल्या मुळे राज्यकारभार भीष्माचार्यच पाहत होते. धृतराष्र्ट वैभवसंपन्न राज्याचा शासक असला तरी,जन्मांध,मनाने अत्यंत चंचल वृत्तीने अस्वस्थ, अतिरेकी, मनाचा कल दूष्टत्वाकडे झुकलेला,अशा राजाला विचारी,विवेकी व पतीला योग्य सल्ला देऊन सुमार्गावर आणणारी पत्नी असणे आवश्यक आहे.हा सारासार विचार करुन गांधारीच योग्य पत्नी होऊ शकेल हा विचार करुन तिला मागणी घालण्याचा विचार भीष्माचार्यांनी निश्चित केला व खास हुशार दूत गांधार देशी सुबलराजाकडे रवाना केला.

         सुबलराजाला दूताकरवी भीष्माचार्यांनी सम्राट धृतराष्र्टासाठी गांधारीला मागणी घालुन, निर्णय कळविण्याचे सांगीतल्यावर, राजा सुबल चे मन विचार चक्रात गुंतुन गेले,मोठाच पेच समोर उभा राहिला.हस्तिनापुर राज्य म्हणजे भारतातील मोठे साम्राज्य राजा धृतराष्र्ट सुंदर,नौजवान,पराक्रमी, बलवान व बुध्दीमान! शिवाय भीष्मा सारखे श्रेष्ठ,रणझुंजार,पराक्रमी आणि कर्तुत्ववान शासनकर्ते धृतराष्र्टाच्या पाठीशी उभे! गांधारीला यापेक्षा चांगला ‘वर’ कोणता असुं शकणार? पण जन्मां धळा… आंधळा…. पित्याचे मन कळवळले,हेलावले!

     आपली सुस्वरुप,सुंंदर,सुशील शालीन, विचारी कन्या अंध राजाला जन्मभरासाठी अर्पन करायची? दुसरे मन म्हणाले,एक अंधत्व सोडले तर,हा विवाह नामांकित कुळाशी,मोठ्या सम्राटाशी होऊन गांधारी सम्राज्ञी होईल. शेवटी दुसर्‍या मनाचा विजय झाला. राजा सुबलने गांधारी-धृतराष्र्टाच्या विवाहास होकार कळविला.दूत ही आनंदवार्ता घेऊन वेगवान गतीच्या रथा तुन हस्तिनापुरला रवाना झाला.

      अंतःपुरात गांधारीला जेव्हा सेविका करवी हस्तिनापुरचे सम्राट धृतराष्र्टाशी विवाह निश्चित झाल्याचे कळल्यावर तिचे तारुण्यसुलभ मन आनंदाने मोहरुन आले.गांधारीने सेविकेस त्यांचे वर्णन विचारल्यावर,सेविका सांगु लागली,धृतराष्र्ट सुंदर,देखणा,तरुण, एका ऐश्वर्यसंपन्न,वैभवशाली साम्राजाचा सम्राट आहे.वर्णन ऐकुन गांधारी लाजुन एका सुंदर स्वप्न मंदिरात प्रवेशीत असतां नाच, सेविका पुढे म्हणाली, पण!राजपुत्र जन्मांध आहेत.मनमंदिराच्या उंबरठ्यात पडणारे पाऊल मागे पडले. स्वप्नमंदिर कोसळले,कुणीतरी घणाचे घाव घालीत आहेसे वाटले.तिचे हसणारे फुलणारे मोठाले डोळे एकदम मिटले. अश्रु गालावरुन ओघळु लागले.

             क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमु

!!!  गांधारी  !!!

               भाग – २

        गांधारीने मनाला स्वस्थ केले व येणार्‍या अंधकारमय भविष्याला सामोरे जाण्यासाठी दोन अश्रु ढाळुन मनाचा निग्रह केला व सेविकेला  एक रेशमी पट्टी आणायला सांगीतले,मिटल्या डोळ्यावर पट्टी बांधुन अश्रु पुसले व हसर्‍या चेहर्‍याने सेविकेला गांधारीचा या विवाहास होकार कळविण्यास सांगीतला.गांधरीने पट्टी बांधलेली बघुन मैत्रीणी,सेविकांनी पट्टी बांधण्याचे कारण विचारल्यावर,गांधारी अत्यंत गंभीरपणे म्हणाली, होणारा पती राजा धृतराष्र्ट अंधत्वामुळे नेत्रसुख घेऊ शकत नाहीत तर मी सुध्दा घेणार नाही. राजकन्येचा निर्णय ऐकुन सर्वजण स्तंभीत झाले.राजाराणी कळवळुन गेले सारे अंतःपुर व्याकुळ झाले.

       एका शुभदिनी गांधारीचा भाऊ शकुनीने सजवलेल्या भव्य रथात वधु वेशातील लक्ष्मीसारखी सुंदर व तेजस्वी दिसत असलेल्या गांधारीने आई-वडील व सर्व आप्तजनांचा दुःखी मनाने निरोप घेऊन मोठा लवाजमा व सशस्र सैनिकां सह हस्तिनापुरला जाण्यासाठी रथारुढ झाली आणि हस्तिनापुरला बातमी पाठवली.

        स्वतः भीष्माचार्य आणि सर्व जेष्ठ श्रेष्ठ पुरुष, गांधार देशाची राजकन्या आणि हस्तिनापूरच्या भावी सम्राज्ञीचे स्वागत करण्यासाठी सर्वजण हस्तिना पुरच्या सीमेवरील महाद्वाराजवळ जमा झालेत.शकुनीने रथ थांबवल्यावर भीष्माचार्य स्वतः स्वागतासाठी उत्सुकते ने पुढे येऊन राजकन्येला पाहिले असतां तिच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी पाहुन शकुनीला कारण विचारल्यावर, अभिमा नाने शकुनीने सांगीतले, महाराज धृतराष्र्ट अंध असल्यामुळे जे सुख ते उपभोगु शकत नाही ते सुख माझी बहिण गांधारी उपभोगणार नाही,हा तिचा आजन्म निश्चय असुन तिचे जिवन भराचे व्रत आहे, केवढा हा त्याग?

        गांधारीचे अपूर्व स्वरुप,तिचा आजन्म निश्चय पाहुन भीष्माचार्यांचे मन आनंदाने,आदराने भरुन आले.या अलौकिक पतीव्रतेला त्यांनी मनोमन वंदन केले आणि आपण केलेली धृतराष्र्टासाठीची निवड अचुक असल्या चे त्यांना समाधान वाटले.भावी हस्तिना पुरच्या सम्राज्ञीची भव्य मिरवणुक मोठ्या थाटात राजभवनाकडे निघाली. कांही दिवसानंतर एका शुभ मुहुर्तावर धृतराष्र्ट-गांधारीचा विवाह इतमानाने थाटामाटात संपन्न झाला.शकुनीने हुंडा म्हणुन भरपुर संपत्ती दिली.भीष्मांनीही तेवढ्याच ऐश्वर्याने आणि सन्मानाने शकुनीचा मानपान केला.

       गांधारीने शुभपदाने धृतराष्र्टाची पत्नी व सम्राज्ञी म्हणुन उंबरठा ओलांडु न प्रवेश केला.तिने आपल्या सेवाभावी स्वभावाने आप्तजन,गुरुजन,त्रृषीमुनींचे मन जिंकुन घेतले.धृतराष्र्ट अंध असल्या चा तिला कधीच विषाद,उद्वेग वाटला नाही उलट अंध पतीचे सेवा विशेष आनंद मनोभावे करीत.अंधपतीशी संसार करणे म्हणजे एकप्रकारचे सतीचे वाण होते.एवढ्या लहान वयातही गांधारी कसोटीला पुर्ण उतरली.

       एकदा महर्षी व्यास भारतभ्रमण करीत करीत हस्तिनापुरला आलेत.राज भवनात धृतराष्र्टाची भेट झाल्यावर ते गांधारीच्या महाली आलेत.गांधारीने त्यांचे यथोचित सत्कार व मनोभावे पुजा केली.गांधारीच्या सात्विक आतिथ्याने व सेवेने प्रसन्न होऊन “वर”  मागण्यास सांगीतल्यावर, नम्रपणे ती म्हणाली, भगवान महादेवाकडुन मला १०० पुत्रांचा वर मिळाला, ते सर्व पुत्र बुध्दीमान व पराक्रमी व्हावेत व मिळाले ल्या वरदानाप्रमाणे १०० पुत्रांची माता व्हावी. तथास्तु! असा आशिर्वाद देऊन निघुन गेले.

            क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

!!!  गांधारी  !!

                भाग – ३.

          गांधारीचे जीवन सुरळीत सुरु झाले.कांही दिवसांनी गांधारी गर्भवती झाली.राजघराण्यांतील सर्वांना,स्वतः तिला खुप आनंद झाला. ९ महिने,१०महिने,झाले, वर्ष उलटले तरी प्रसुती चे कांही चिन्ह दिसेना.गांधारीचा आनंद मावळला.चिंतेने तिचे मन पोखरु लागले दुसरेही वर्ष संपु लागले.अशाच मनःस्थि तीत असतांनाच,धृतराष्र्टाचे धाकटे बंधु पांडुराजा,जे कंदम त्रृषीच्या शापामुळे आपल्या दोन्ही पत्नीसह हिमालयात राहत होते. त्यांची जेष्ठ पत्नि कुंतीला महर्षी दुर्वासांनी दिलेल्या मंत्रसामार्थ्याने  एका सुंदर युधीष्ठीर नांवाच्या पुत्राला जन्म दिल्याची बातमी मिळाली. वास्तविक कुंती गांधारीच्या नंतर गर्भवती झाली होती,पण गांधारीच्या आधी पुत्र झाल्याने तिला विशाद वाटुन मन त्रस्त झाले.मनात शंका निर्माण झाली की, हा गर्भ खरा की खोटा?अशा  विचित्र दुःखद विचाराने या नाजुक अवस्थेत मानसिक ताण असह्य होऊन ती मुर्च्छीत पडली.राजवैद्यांच्या उपचारा ने ती शुध्दीवर आली पण सहनशक्तीचा अंत होत आला.जावेला पुत्ररत्न झाले व मी तीच्या आधी गर्भवती होऊनही मला पुत्रप्राप्ती कां नाही? या विचाराने मना वरचा ताबा जाऊन विचारांची धारा वाकड्या मार्गाने जाऊ लागले.

       एके दिवशी संतप्त गांधारीने आपल्या महालात कोणालाही न कळविता स्वतःच्या पोटावर आघात केले.त्या आघातामुळे एक मोठा कडक मांसपिंड बाहेर आला. या मांसपिंडाचे काय करावे? शेवटी गुप्तपणे दूर फेकुन देण्याचा विचार ती करुं लागली.गांधारी च्या मनातील खळबळ महर्षी व्यासांना अंतर्ज्ञानाने समजल्याबरोबर सत्वर धावत येऊन म्हणाले, बेटी! तु या मांस पिंडाचे काय करणार होतीस? केवढा अनर्थ घडणार होता? रडत गांधारी म्हणाली, भगवान! देवी कुंतीला माझ्या नंतर गर्भवती होऊनही तीला तेजस्वी पुत्र झाला व मला मात्र निराशाच!

       दोन वर्ष होऊनही,१०० पुत्रांचे वरदान साक्षात महादेवांकडुन मिळवुन पुत्रप्राप्ती न झाल्याने अतिशय निराश होऊन पोटावर आघात केला तर हा मांसपिंड आला म्हणुन तो दूर कुठेतरी फेकुन देणार होते. त्यावर व्यास गंभीर पणे म्हणाले, महादेवाचे वरदान व माझा आशिर्वाद कधीही असफल,खोटा होऊ शकणार नाही.

       व्यासांनी तीला तुपाने भरलेले १०० कुंड आणायला सांगीतले. त्या मांसपिंडावर व्यासांनी थंड पाण्याचा शिडकाव केल्याबरोबर चमत्कार घडला त्या मांसपिंडाचे अंगठ्याच्या पेराएवढे छोटे छोटे तुकडे होऊं लागले.ते तुकडे व्यासमुनी एकाका कुंडात भरुन प्रत्येक कुंड बंद करुं लागले.१०० कुंड भरल्या वरही एक तुकडा शिल्लक राहिल्यामुळे गांधारी उल्हासित होऊन म्हणाली,मी जर कांही चांगले कर्म,तप,दान,गुरुजनां ची सेवा केली असेल तर, एक कन्या झाल्यास मला विशेष आनंद होईल असे ती व्यासांना म्हटल्यावर,ते म्हणाले,१०० पुत्रांचा भाग झाल्यावर हा उरलेल्या भागाला दौहित्र्याचा भोग असुन या अंशापासुन तुला सुंदर,शीलवती कन्या होईल असे सांगुन आणखी एक तुपाचा घडा मागुन त्यात हा उरलेला अंश टाकुन सर्व घड्यांची झाकणें बंद करुन दोन वर्षे वाट पहायला सांगीतले.दोन वर्षानंतर प्रत्येक कुंडातुन एकएक बालक बाहेर येईल येवढे सांगुन व्यास हिमालयाकडे तपस्यासाठी निघून गेले.

                क्रमशः
   संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गांधारी  !!

                भाग – ४.

     दोन वर्षे पुर्ण झाल्यावर ती कुंडे परिपक्व झालीत.एकेका कुंडातुन एक एक बालक बाहेर येण्याची चिन्हे दिसु लागली.पहिल्या कुंडातुन पहिला बालक बाहेर आलेला पाहुन उत्सुकतेने व आनंदाने त्या बालकाला न्याहाळु लागली तोच त्याच्या रडण्याचा आवाज थेट गाढवांच्या रेंकण्या सारखा आल्याने आजुबाजुची गाढवे पण रेंकु ओरडु लागले. या ओरडण्याने राजधानीत नाद-प्रतिध्वनी उमटुन चमत्कारीक हाःहाकार माजला. गिधाडे बीभत्स स्वर काढु लागली.कावळे कर्कश ओरडुं लागले.चारही दिशांतुन हिंस्रपशुंच्या क्रुर गर्जना ऐकु येऊ लागल्या.सर्व दिशांनी भयानक दाह होत आहेसे भासु लागले.

       पहिल्या बालकाच्या जन्मानंतरची ही सर्व लक्षणें अत्यंत अशुभ वाटत होती.गांधारी व्याकुळ झाली.धृतराष्र्ट अस्वस्थ झाले.अपशकुन होत असलेले पाहुन दोघेही भयभीत झालेत.सर्व राज पुरोहित व धर्मात्मा विदुर आल्यावर धृतराष्र्टाने अत्यंत उद्गिनपणे विचारले, हे भेसुर आवाज काय सुचित करतात? काय सांगतात ही लक्षणे? सर्व पुरोहित निःस्तब्धपणे खाली मान घालुन बसलेत किंचित उत्साहाने धृतराष्र्टाने त्यांना विचारले,जरी पांडुपुत्र युधीष्ठीर जेष्ठ असला तरी माझा हा पहिला पुत्र राज्यावर बसु शकेल का?

          धृतराष्र्टाचा प्रश्न ऐकुन,धीर धरुन सर्वजण एकमताने म्हणाले,राजन आपल्या जेष्ठ पुत्राचा जन्म झाल्याबरो बर सर्व दिशांतुन अपशकुन झालेत,ही अवलक्षणे असे दर्शवतात की, आपला हा जेष्ठ पुत्र संपुर्ण कुळाचा भयंकर संहार करणारा आहे.आपल्याला दुसरी ९९ मुलं आहेत,आपण आताच त्याग करणे योग्य होईल.त्याला नष्ट करावे, ज्यामुळे शांतता प्रस्थापीत राहिल अन्यथा या मुलामुळे मात्र भयंकर संकटे ऊभे राहतील. पुरोहित वर्गांनी आपला निर्णय ऐकवुन निघुन गेलेत.

        धृतराष्र्टाने सर्व ऐकल्यावर संतापा ने त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्यात.अर्थातच पुरोहितांचे म्हणने त्यांना पटले नाहीच! बालकाला उचलुन प्रेमाणे गांधारीच्या मांडीवर ठेवुन म्हणाले, गांधारी! हा आपला प्रथम पुत्र दुर्योधन! गांधारीचे मन दोलायमान झाले हा उत्कर्ष की? विध्वंश? आनंद की?दारुण दुःख? तीच्या डोळ्यातुन अश्रु वाहुं लागले. मन द्विधा झाले, शेवटी पतीच्या मताला,पटले नसुनही मान्यता द्यावीच लागली.पुत्र जन्मोत्सवानिमित्य सनई चौघडे वाजु लागले.

      गांधारी १०० पुत्र व एका सुंदर कन्या दुःशालीची माता झाली.गांधारीची सर्व मुलें रुपाने सुंदर व प्रकृतीने सुदृढ होती. भीष्मांच्या देखरेखेखाली सर्व राजपुत्रांचे योग्य लालन पालन व वेदविद्या व अस्रविद्याचे अध्ययन सुरु झाले.मुलं कलाकलानं मोठी होत तारुण्यात प्रवेशली.सर्वांची लग्ने लहानपणीच झालीत. लाडक्या दुःशालीचा विवाह पराक्रमी राजा जयद्रथाशी झाला. गांधारी-धृतराष्र्टाचे जीवन आनंदात व्यतीत होऊ लागले.

हस्तिनापुरचा हा बलाढ्य कौरववंश इतमामात व ऐश्वर्यात वाढत होता.तर दुसरा राजवंश हिमालयाच्या परिसरांत शतश्रृंग पर्वतावर निसर्गाच्या कुशीत उमेदिने वाढत होते.धृतराष्र्टाचा धाकटा भाऊ पांडुराजा किंदम त्रृषींच्या शापा मुळे कुंती व माद्री या दोन पत्नींसह पर्वतीय आश्रमांत सन्यस्त जीवन व्यतीत करीत होते.कुंतीचे पुत्र युधीष्ठिर, भीम, अर्जुन तर माद्रीचे नकुल व सहदेव हे पांच देवरुप पुत्र उत्तम सुलक्षणांनी संपन्न होते.त्यांचा सर्वांगीन विकास, उत्तम शिक्षण  व सुसंस्कारांसाठी तेथील  त्रृषीमुनींनी पांडुपुत्रांच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था केली.

             क्रमशः
  संकलन – मिनाक्षी देशमुख.

गांधारी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading